भालुकपोंग – तवांग एक्सिसमधील 5 लपलेली रत्ने

0
825

अरुणाचल प्रदेश सामर्थ्यशाली हिमालय पर्वते, वनराई आणि नद्यांसारख्या रत्नांनी नटलेले आहे. अरुणाचलमधील तवांग, झिरो खोरे आणि इटानगर येथील काही प्रेक्षणीय स्थळांकडे त्यांच्या अवर्णनीय सौंदर्यामुळे पर्यटक आकर्षित होत आहेत. भालुकपोंग – तवांग एक्सिसवर अविस्मरणीय ठरू शकणारी पाच ठिकाणे आपणास आढळतील.

तेंगा दरी

Tenga Valley
तेंगा दरीमध्ये आपण ट्रेकिंग, नदी ओलांडणे आणि रिव्हर राफ्टिंग यांच्यासारख्या अनेक मैदानी उपक्रमांचा आनंद लुटू शकतो. तेंगा बाजारपेठ बाकू (तिबेटीयन पोशाख), स्टोन ज्वेलरी आणि इतर पारंपारिक हस्तकौशल्ये खरेदी करण्यासाठी उत्तम स्थान आहे. नाग मंदिरला भेट देण्यास विसरू नका.

बोंबडिला आणि दिरांग दरी

Bomdila Monastery
बोंबडिला हे समुद्रपातळीपासून 7000 फूट उंचावर असलेले आणि सुमारे 6500 लोकांची वस्ती असलेले एक छोटे शहर आहे. आपण येथे बौद्ध मठास भेट देऊ शकतो किंवा सफरचंदाच्या बागांमधून एखादा फेरफटका मारू शकतो. दिरांग बोंबडिलापासून 2 तासांच्या अंतरावर आहे. नदीकिनारी असलेल्या शेतजमिनींसह सपाट प्रदेश आपल्याला निश्चितच संमोहित करतो. बोंबडिला आणि दिरांग या दोन्ही ठिकाणी खरेदीसाठी छान दुकाने आहेत. इथे असताना दिरांगच्या गरम पाण्याच्या झऱ्यांना भेट देण्यास विसरू नका.

सेला पास

Sela Lake
प्राचीन काळी सेला पास हा भारत आणि चीन या देशांमधील व्यापाराचा एक महत्त्वपूर्ण मार्ग होता. या खिंडीत क्वचितच सूर्यप्रकाश असतो आणि तापमान -100 सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. छायाचित्राप्रमाणे दिसणारा सेला तलाव आणि गोम्पा मुळीच चुकवू नका.

जसवंत गढ

Jaswant-Garh

 

 

 

 

 

 

 

 

 

 

येथे माननीय कप्तान जसवंत सिंह यांचे स्मारक असून प्रत्येक भारतीयाने इथे आवर्जून भेट द्यावीच असे हे स्थान आहे. भारतीय सेनेचे अधिकारी जसवंत सिंह यांचे या ठिकाणी स्मारक बनविण्यात आले आहे, ज्यांना 1962 च्या युद्धात चिनी सैन्याला सफलतापूर्वक रोखल्यामुळे चीनी सैन्याने त्यांना फाशी दिली होती. भारतीय सैन्याद्वारा देखभाल केल्या जाणाऱ्या एका छोट्या वस्तुसंग्रहालयाला आपण भेट देऊ शकतो आणि मोफत सामोसासोबत चहाचा आनंद लुटू शकतो!

जंग

Jung Town
8000 फूट उंचीवर वसलेले हे एक लहान शहर आहे. पर्यटक येथील जंग धबधबा, स्थानिक मठ आणि बाजारपेठेस (चीनी वस्तू विकत असलेल्या) भेट देऊ शकतात. जंगमधील रेस्टॉरंट्समध्ये चवदार असे मोमोज मिळतात.
प्रवासाच्या टिप्स

  • दिल्ली, गुवाहाटी किंवा तेजपूरमधील राज्य कार्यालयामधून इनर लाईन परमिट घ्या.
  • स्थानिक बाजारपेठेत किमतींमध्ये घासाघीस करण्यास संकोच करू नका.
  • मद्यावरील करात सूट आहे, त्यामुळे विविध प्रकारच्या वाईन्स आणि हार्ड ड्रिंक्सचा स्वाद चाखण्यास विसरू नका.
  • सर्वात नजीकचे रेल्वे स्टेशन: रंगपरा (भालुकपोंगपासून 46 किमी)”

 

Originally written by Bhagyashree Pancholy. Read here.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here