तुम्हा सर्वांना तिकीट रद्द करण्याबाबत जाणून घ्यायचे आहे न?

0
3600
Marathi railway blog

मला खात्री आहे की जर तिकीट रद्द करून पैसे परत मिळाल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित झाले असाल. कारण जेव्हा तुम्हाला वारंवार तिकीट रद्द करावे लागले असेल, तेव्हा तुम्हाला तिकीट रद्द करण्याच्या नियमांबाबत माहिती नव्हते. म्हणूनच रेलयात्री वर आम्ही सोप्या आणि साध्या पद्धतीने नियम स्पष्ट करत आहोत. हे नियम पुढीलप्रमाणे आहेत…

कन्फर्म झालेले तिकीट किंवा RAC तिकीट असलेल्या यात्रींना स्वतःचे तिकीट स्वतःच रद्द करावे लागते. आणि प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या यात्रींची अंतिम यादी तयार करताना त्यांची पुष्टी झालेली नसेल तर त्यांचे तिकीट आपोआप रद्द होते आणि त्यांना संपूर्ण परतावा दिला जातो. रेल्वे निघण्याच्या 48 तास गोदर तिकीट रद्द केल्यास त्याबाबतचे तिकीट रद्द करण्याचे शुल्क येथे दिलेले आहे:

स्लीपर वर्गासाठीचे तिकीट रद्द करण्याचे शुल्क: प्रति प्रवासी INR 120 (कन्फर्म तिकिटांसाठी), INR 60 (RAC किंवा WL तिकिटांसाठी) दराने.
3 AC वर्गासाठीचे तिकीट रद्द करण्याचे शुल्क: प्रति प्रवासी INR 180 (कन्फर्म तिकिटांसाठी), INR 60 (RAC किंवा WL तिकिटांसाठी) दराने
2 AC वर्गासाठीचे तिकीट रद्द करण्याचे शुल्क: प्रति प्रवासी INR 200 (कन्फर्म तिकिटांसाठी), INR 60 (RAC किंवा WL तिकिटांसाठी) दराने.

1 AC वर्गासाठीचे तिकीट रद्द करण्याचे शुल्क: प्रति प्रवासी INR 240 (कन्फर्म तिकिटांसाठी), INR 60 (RAC किंवा WL तिकिटांसाठी) दराने.

तिकीट आंशिक रद्द करणे म्हणजे काय असते आणि त्याचे नियम काय आहेत?
IRCTC Marathi blog
आंशिक रद्दीकरणामध्ये 1 किंवा 2 व्यक्तींचे तिकीट रद्द करून इतरांचे तिकीट वैध ठेवता येते. समजा तुम्ही एकाच अर्जामध्ये 5 यात्रींचे तिकीट बुक केले आहे. आता 2 यात्रींसाठीचे तिकीट कन्फर्म आहे, 1 यात्रीचे RAC तिकीट आहे आणि इतर 2 यात्रींचे तिकीट प्रतीक्षा यादीमध्ये आहे असे असल्यास आंशिक रद्दीकरणामध्ये RAC तिकीट किंवा प्रतीक्षा यादीत तिकीट असलेल्या यात्रींचे तिकीट रद्द करता येते, आणि कन्फर्म तिकीट असलेले 2 यात्री प्रवास करू शकतात आणि प्रवासादरम्यान त्यांच्या जागेवर बसू शकतात.

रद्दीकरणानंतर मला परतावा कसा मिळेल?

तुम्ही तुमचे तिकीट प्रवासाच्या किती वेळेपूर्वी (किती तासांपूर्वी) रद्द केले आहे यावर तुमचा परतावा आधारित असेल.

119 दिवस ते रेल्वे निघण्यापूर्वी 48 तास

या परिस्थितीमध्ये, प्रवाशांनी निवडलेल्या क्लासवर आधारित, रद्दीकरण शुल्क 120240 रुपये वजा करून पूर्ण परतावा मिळतो.

रेल्वे निघण्यापूर्वी 12 तास

जर तुम्ही 48 तासांची मुदत पार केली असेल तर, तुमच्या तिकिटाच्या रक्कमेतील थोड्या प्रमाणातील रक्कम परतावा म्हणून तुमच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा करू शकता. मात्र, तिकिटाच्या मूळ रक्कमेचा 25% भाग किंवा रद्दीकरण शुल्क (जो जास्त असेल तो) वजा केला जाईल.

रेल्वे निघण्याच्या 4 तासांपूर्वी किंवा रेल्वे प्रवाशांची अंतिम यादी (चार्ट) तयार करत असताना

बहुदा रेल्वेची अंतिम प्रवासी यादी ही प्रवास सुरु होण्याच्या 4 तासांपूर्वी तयार केली जाते. आणि प्रवास करणाऱ्या यात्रींना सीटचे पुनर्वाटप करण्याची भारतीय रेल्वेला ही अंतिम संधी असते. म्हणून, जेव्हा तुम्ही रेल्वे निघण्याला 12 तासांपेक्षा कमी अवधी असताना ते अंतिम यादी तयार करण्यापूर्वीच्या कालावधीत जर तिकीट रद्द केले तर तिकिटाच्या मूळ रकमेच्या 50% किंवा रद्दीकरण शुल्क (जे अधिक असेल ते) वजा केले जाईल.

इतर कोणत्या परिस्थतींमध्ये स्वयंचलितरीत्या परतावा मिळतो?

अशा काही परिस्थिती आहेत, ज्यामध्ये भारतीय रेल्वे WL तिकिटांव्यतिरिक्त, इतर तिकिटांच्या संपूर्ण रक्कमेचा स्वयंचलितरीत्या परतावा करते.

रेल्वे रद्द होणे: जर तुमची रेल्वे काही कारणाने रद्द झाली, तुम्हाला तिकीट रकमेचा संपूर्ण परतावा मिळतो.

रेल्वे उशिराने धावणे: जर रेल्वे तुमच्या गंतव्य ठिकाणी 3 किंवा अधिक तास उशिरा जात असेल तर तुम्ही तिकीटाच्या संपूर्ण रक्कमेच्या परताव्याची मागणी करू शकता. अशी मागणी करण्यासाठी तुम्हाला स्टेशन व्यवस्थापकाच्या कार्यालयात TDR नोंद करावा लागतो. जर तुम्ही रेल्वेमध्ये चढलात तर तुमचा TDR ग्राह्य धरला जाणार नाही आणि रद्द केला जाईल.

रेल्वे मार्ग बदलणे: तिसऱ्या परिस्थितीमध्ये जेव्हा रेल्वेचा मार्ग बदलला जातो आणि तुमहाला बदललेल्या मार्गाने प्रवास करायचा नसेल, तर 72 तासांच्या आत तुम्हाला स्टेशन व्यवस्थापकाच्या कार्यालयात पुन्हा TDR ची नोंद करावी लागेल.

इतर कोणत्या परिस्थतींमध्ये तिकिटाचा आंशिक परतावा केला जातो?

इतर अशा परिस्थिती आहेत जेव्हा तुम्हाला तिकिटाच्या फरकाचा परतावा दिला जातो. या परिस्थिती पुढीलप्रमाणे आहेत.

AC काम करत नसेल (वातानुकूलित क्लासमध्ये) जर तुम्ही तुमचे सीट वातानुकूलित क्लासमध्ये बुक केले आहे आणि तुम्हाला असे आढळून आले की AC मध्ये बिघाड (किंवा काम करत नाही) झाला आहे. तुम्हाला TTE ला हे सांगावे लागेल. तपासणी केल्यानंतर, AC ची दुरस्ती केली जाईल, परंतु जर AC काम करत नसेल तर, TTE तिकिटातील (तुम्ही निवडलेल्या क्लास आणि स्लीपर क्लास मधील) फरकाच्या रकमेचा परतावा करेल.

कमी दर्जाच्या क्लासमधील सीट मिळणे: जर तुमचे सीट कन्फर्म झाले आहे आणि ते कमी दर्जाच्या क्लासमधील असेल तर, तुम्ही बुक केलेला क्लास आणि प्रत्यक्षात तुम्हाला मिळालेल्या सीटच्या क्लासमधील तिकिटाच्या रकमेच्या फरकाचा परतावा मिळण्यासाठी तुम्ही मागणी करू शकता.

आम्हाला माहिती आहे, काही ठराविक नियम जे तुमच्या उदाहरणांमध्ये लागू झाले असतील पण जर ते इथे आमच्याकडून सुटले असतील, तर मग वाट कशाची पाहता, तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला विचारा किंवा असे नियम आमच्या निदर्शनास आणू द्या. तुमची मदत करण्यास आम्हाला नक्कीच आनंद होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here