Simplifying Train Travel

माजुली बेट – पूर्वेकडील नष्ट होत चाललेले सौंदर्य

अफाट अशा ब्रम्हपुत्रेच्या उरामध्ये जणू कवटाळल्याप्रमाणे असणारे, अप्पर आसाम मधील सुबानसिरी आणि खेरकेतीया या दोन नद्यांमध्ये सुंदरपणे पसरलेले माजुली अत्यंत आश्चर्यकारक आहे. इथल्या रमणीय प्रदेशात अस्सल आणि जादुई जुन्या काळाची मोहिनी आहे. जिथे आयुष्याच्या धावपळीत कुणाला वेळ मिळत नाही तिथे थोडे थांबण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी आणि जीवनाचा आनंद लुटण्यासाठी माजुली एक आठवण करून देणारी गोष्ट म्हणून समोर येते.

ग्राम शोधक व्हा – साध्या गोष्टींच्या सौंदर्याबद्दल आपल्याला विश्वास वाटून तो दृढ व्हावा यासाठी माजुलीमध्ये संस्कृती, कला आणि निसर्ग एकत्र येतात. तुम्ही खुल्या मनाच्या स्थानिक लोकांना भेटून मनोरंजक कथांची देवाणघेवाण करू शकता. ते तुम्हाला आजूबाजूच्या सुंदर ठिकाणीदेखील घेऊन जाऊ शकतात.

On a birding trail

पक्षांच्या किलबिलाटाने सुरुवात – हळुवार प्रार्थनेमध्ये पक्ष्यांच्या मंजुळ गाण्यांच्या आवाजासह माजुलीची सकाळ उजाडते. इथे पक्ष्यांचे कळप नदीभोवताली राहतात, हिरव्यागार कुरणांवर सूर्यस्नान करतात आणि गुरांसह मस्ती करतात.

Get lost in the wilderness

अरण्यांमध्ये हरवून जा – दूरवर पसरलेली स्वयंप्रकाशी पिवळ्या मोहरीची शेते पाहताक्षणी मनात पुढील विचार येण्याला एक संधीही न मिळता तुम्ही गाणे गाता-गाता नाचू लागाल. सभोवताली वन्यप्रदेशांनी व्यापलेले, वाऱ्याची थंड झुळूक आणि चमकता सूर्य तुम्हाला पूर्णपणे प्रभावित करेल.

आदिवासींचे जीवन जवळून अनुभवा – आसाममधील बहुधा सर्वात रंगीबेरंगी जमातींपैकी एक असणाऱ्या मिशिंग जमातीतील लोकांना भेटा. मिशिंग ही जमात लोकप्रिय अशा ‘गाडू’ चादरी बनविण्यातील त्यांच्या कौशल्याबद्दल प्रसिद्ध आहेत.

Monasteries and Monasteries

मठ – नव-वैष्णववादी चळवळीच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असणाऱ्या माजुलीमध्ये श्रीमंत शंकरदेवांना सन्मान म्हणून अनेक सत्रास (मठ) आहेत. अनीती सत्र, दखनपत सत्र आणि बेंगीनी सत्र हे तेथील काही लोकप्रिय सत्रास आहेत.

Brahmaputra Cruising

ब्रह्मपुत्रा क्रूज – विशाल ब्रह्मपुत्रा नदीत नौकाविहार करणे हे तेथील सर्वोत्कृष्ट अनुभवांपैकी एक आहे. पब्लिक फेरीच्या कडेवर बसणे, आणि पूर्ण फुलणाऱ्या निसर्गाची उत्कृष्टता पाहणे म्हणजे परमानंद आहे.

कसे जायचे?

जोऱ्हातमधील नेमती घाटावरून फेरी राईडने माजुलीला जाता येते. माजुलीची लपलेली रहस्ये शोधण्यासाठी तुम्ही सायकलद्वारे सुद्धा जाऊ शकता. जवळचे रेल्वेस्थानक जोऱ्हात आहे, जे गुवाहाटीपासून 7 तासांच्या रेल्वे प्रवासाच्या अंतरावर आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत