चंदिगढपासून अंतिम क्षणाचे पावसाळी निसर्गस्थाने

0
856

तुम्ही जर चंदिगढच्या नजीक कुठेही राहत असाल, तर आपले सामान बांधून निघण्यासाठी पावसाळा ही उत्तम वेळ आहे. धूसर पर्वतांपासून मनमोहक धबधब्यांपर्यंत, उंच अशा झाडांपासून धुकेयुक्त वातावरणापर्यंत सर्व स्वर्गीय अनुभव आपण चंदिगढच्या 100-150 किलोमीटर्सच्या क्षेत्रात घेऊ शकतो. तुमच्या प्रवासाला विशेष बनविण्यासाठी येथे काही निवडक स्थानांची यादी दिलेली आहे.

मोरनी पर्वत, हरियाणा

Morni Hills
चंदिगढपासून 45 किलोमीटर अंतरावर पंचकुला जिल्ह्यात मोरनी पर्वत एक विलक्षण स्थान आहे. या आकर्षक पर्वतीय स्थानावर तीन तलाव (किंवा ताल) आहेत, बडा टिक्कर, टिक्कर ताल आणि छोटा टिक्कर. श्वास रोखणाऱ्या दृश्यांव्यतिरिक्त, तेथे मोरनी किल्ला (किंवा मीर जफर आली किल्ला) नामक एक प्राचीन किल्ला देखील आहे, ज्याची प्राचीन संरचना थक्क करून सोडते.

परवानू, हिमाचल प्रदेश

Parwanoo Cable Car
शिवालिकच्या गिरिपादाच्या मध्ये वसलेले हे स्थान पावसाळ्यात सप्ताहांताला तरोताजा होण्यासाठी जाण्यास उत्तम आहे. टिंबर ट्रेल एक महत्त्वाचे आकर्षण आहे, जेथे केबल कार पर्वतांमधील रिसॉर्ट्सना जोडते. रोपवेचा 2 किलोमीटरचा प्रवास काही मिनिटातच पवसाळ्यात चिंब भिजलेल्या वृक्षांचे रमणीय दर्शन घडवितो. समुद्रपातळीच्या 5,000 फूट उंचावर घनदाट वनराई, कमी उंचीवरील ढगांचे आवरण आणि एकदम ताज्या पर्वतीय हवेसह परवानू पावसाळ्यात जिवंत होऊन उठते. साहस, विलास आणि मनोरंजन या सर्व गोष्टींचा येथे एकाच ठिकाणी अनुभव घेतला जाऊ शकतो.

कसौली, हिमाचल प्रदेश

Kasauli
ओक आणि चेस्टनट वृक्षांनी झाकलेले निसर्गसौंदर्य, परवडण्याजोग्या खर्चात असलेल्या वसाहती दरम्यानच्या शैलीच्या हॉटेलच्या खोल्या कसौलीला पर्यटकांसाठी एक लोकप्रिय स्थान बनवीत आहेत. तसेच, येथे आशियातील सर्वात जुनी आसवानी देखील आहे. त्यामुळे, खुल्या हवेतील रूफ कॅफेज आणि पर्वत शिखरांवर स्थिर असणाऱ्या ढगांचे दृश्य, हिरवळीवरील दवबिंदू, आणि तुमच्या केसांना स्पर्शून जाणारी थंड हवेची झुळूक तुम्हाला स्वर्गीय अनुभूती मिळवून देईल. पावसाळ्याच्या मोसमात सर्वांचे प्रिय असलेली आणखी एक गोष्ट म्हणजे गरम-गरम चहाच्या झुरक्यासोबत अनुभवायचा येथे अतिशय प्रसिद्ध असलेला बंदसामोसा (लोणीने भरलेला बन, ज्यात एक सामोसा भरलेला असतो) होय.

मुघल सराई, दोराहा, पंजाब

Mughal Sarai Doraha
मुघल सराई, जो रंग दे बसंती किल्ला (आरडीबी किल्ला) नावाने अधिक लोकप्रिय आहे, चंदिगढपासून 86 किलोमीटर्सवर आहे. वास्तुशिल्पाचा हा अप्रतिम नमुना मुघल सम्राट जहांगीर यांनी मुघल प्रवाशांसाठी विश्राम स्थान म्हणून बनविला होता. अत्यंत हिरव्यागार अशा परिदृश्यात एक प्रचंड किल्ल्याची कल्पना करा. पावसाच्या स्पर्शाने ही जागा निश्चितच रोमँटिक बनून जाते.

चैल, हिमाचल प्रदेश

Chail
निसर्गाच्या कुशीत जाऊन शांत सप्ताहांत घालवू इच्छिता? मग सिमला सोडा आणि त्याच्या पलीकडचा विचार करा. चैलला चला! उंच अशा देवदार आणि पाईन वृक्षांनी व्यापलेले चैल ट्रेकर्ससाठी स्वर्गच आहे. तेथे असताना भेट द्यायलाच हवीत अशी इतर क्षेत्रे आहेत, साधुपूलमधील चैल अभयारण्य आणि चैल गुरुद्वारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here