भारतातील ५ अनोखे चर्च

0
1761

भारत ही अनेक धर्मांची भूमी आहे. जरी ख्रिश्‍चन धर्मांच्‍या लोकांची संख्‍या कमी प्रमाणात असली, तरी देशाच्‍या कानाकोप-यापर्यंत काही उल्‍लेखनीय चर्च पसरलेले आहेत. भारतातील बहुतेक चर्चवर वसाहती काळाचा प्रभाव दिसून येतो. जर तुम्‍ही भारतातील कोणत्‍याही शहराला भेट दिली, तर तुम्‍हाला त्‍या शहरामध्‍ये किमान एकतरी चर्च पाहायला मिळेलच. पण, येथे आम्‍ही भारतातील अनोख्‍या व उल्‍लेखनीय चर्चबाबत बोलत आहोत.

Rosary-Church-Hassan

१. रोझरी चर्च, हसन, कर्नाटक: ‘‘सबमर्ज चर्च’’ म्‍हणून प्रसिद्ध असलेले, हे चर्च फ्रेंच धर्मप्रसारकांद्वारे १८६० मध्‍ये बांधण्‍यात आले. हेमवती नदीच्‍या काठी स्थित, चर्च नेहमीच्‍या विटा व गारांसोबतच अंडी व जिगरीच्‍या मिश्रणासह बांधण्‍यात आले. पण, त्‍याच्‍या बांधकामाला अवघे शतक झाल्‍यानंतर, गोरुर धरण बांधण्‍यात आले. प्रत्‍येक पावसाळ्यामध्‍ये, धरण ओसांडून भरून वाहू लागल्‍यानंतर या भागातील पाण्‍याची पातळी वाढते आणि म्‍हणूनच चर्च अर्धवट पाण्‍यामध्‍ये बुडालेले दिसते. पावसाळी हंगामाला जोर आला असताना, या चर्चचे फक्‍त कळसच दिसते.

Basilica-of-Bom-Jesus-Goa

२. जेसिलका ऑफ बॉम जिसस, बेन्जिनिम, गोवा: हे चर्च वसाहती कालखंडामध्‍ये गोव्‍यामध्‍ये ख्रिश्‍चन धर्माचा प्रसार केलेले, एकनिष्‍ठ स्‍पॅनिश धर्मप्रसारक, सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचे पार्थिव असण्‍याकरिता सुप्रसिद्ध आहे. चर्चचा पाया २४ नोव्‍हेंबर १५९४ रोजी रचण्‍यात आला. चर्च ‘‘बॉम जिसस’’ किंवा बाळ येशूशी समर्पित आहे. जेव्‍हा सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे निधन झाले, तेव्‍हा त्‍यांचे पार्थिव या चर्चमध्‍ये आणण्‍यात आले आणि कास्‍केटमध्‍ये ठेवण्‍यात आले. जगभरातील ख्रिस्‍ती भाविक दशकातून किमान एकदा सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्‍या अवशेषाचे दर्शन घेण्‍याकरिता चर्चमध्‍ये येतात.

Our-Lady-of-Dolours-Church-Trichur

३. आवर लेडी ऑफ डोलर्स चर्च, त्रिचूर, केरळ: आपणांपैकी अनेकजणांना माहित नाही की हा भारतातील सर्वात मोठे चर्च असण्‍यासोबतच आशियातील तिसरे सर्वात उंच चर्च आहे. १८१४ मध्‍ये सिरो-मलबार (मलबारमधील सीरियन्‍स) कॅथलिक्‍सद्वारे बांधण्‍यात आलेले, हे चर्च १९२९ मध्‍ये त्‍याच्‍या विद्यमान उंचीमध्‍ये पुन्‍हा बांधण्‍यात आले. चर्चमध्‍ये अकरा वेदी व सुंदर अंतर्गत सजावटीसह दुहेरी मजली मार्गिका आहे.

Medak-Cathedral-Medak-Telangana

४. मेडक कॅथेड्रल, मेडक, तेलंगणा: हा आशियामधील सर्वात मोठा डायोकेस चर्च असून जगातील (वेटिकननंतर) दुसरा सर्वात मोठा चर्च आहे. कॅथेड्रल २०० फूट लांब व १०० फूट रुंद आहे. ब्रिटीश वेस्‍लेयन मेथडिस्‍ट्सद्वारे २५ डिसेंबर १९२४ रोजी स्‍थापन करण्‍यात आलेला, चर्च ब्रिटेनमधून आयात करण्‍यात आलेल्‍या मोझेक टाईल्‍सच्‍या सहा वेगवेगळ्या रंगांमध्‍ये सजवण्‍यात आले आहे. या चर्चचे छत ध्‍वनीरोधक असून त्‍याला आकर्षक कमानी स्‍टाइलचे रूप देण्‍यात आले आहे.

Moravian-Church-Leh-Jammu-Kashmir

५. मोरावियन चर्च, लेह, जम्‍मू व काश्‍मीर: हे चर्च ११,००० फूट उंचीवर स्थित असल्‍यामुळे ‘‘भारतातील सर्वात उंच चर्च’’ म्‍हणून ओळखले जाते. पूर्व जर्मनीमधून आलेल्‍या मोरावियन धर्मप्रसारकांद्वारे १८८५ मध्‍ये स्‍थापण्‍यात आलेले, चर्च प्रांतामधील सर्वात जुन्‍या इमारतींपैकी एक आहे. हे चर्च लडाखी मुलांसाठी शैक्षणिक केंद्र बनले आहे आणि चर्चद्वारे एक शाळा सुद्धा चालवली जाते. जरी चर्च १३१ वर्षे जुने असले, तरी चर्चला आधुनिक रूप देण्‍यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here