बराबर पर्वत – इतिहास आणि धर्माची साक्ष

1
2201

देशभरात प्राचीन शंकराची अनेक देवस्थाने आहेत. परंतु, सर्वात प्राचीन मंदिराचा प्रश्न येतो, तेव्हा मगध प्रांतातील बराबर पर्वतांमध्ये वसलेले सिद्धेश्वर मंदिर सर्वात अग्रणी ठरते. हे सिद्धनाथ यात्रेसाठी देखील प्रसिद्ध आहे. आजही अस्तित्वात असलेली महाभारत काळातील ही एक कलाकृती असून, आजही त्याच्या प्राचीन शिल्पकृतीमध्ये दर्शविलेल्या प्रार्थनेच्या परंपरेस चालवीत आहे. हे नऊ स्वयंभू शिवलिंगांमधील सर्वात पहिले आहे. याच्या पूजेच्या परंपरा शंकराचा महान भक्त वनासुराशी संबंधित अआहेत, यामुळे याला वनेश्वर महादेव असे देखील म्हटले जाते. या मंदिरास जाण्यास भरपूर पायऱ्या आहेत.

बराबर पर्वत भारतातील सर्वात प्राचीन ऐतिहासिक पर्वतांमधील एक आहेत. बराबर पर्वताच्या 1100 फूट उंचीमुळे त्याला मगधचा हिमालय असे देखील म्हणतात. येथे सात अद्भुत गुहा बनविलेल्या आहेत. इंग्रजांच्या काळात यांचा शोध लागला होता. या सातमधील चार गुहांना बराबर गुहा असे म्हटले जाते, तर उर्वरित तीन गुहांना नागार्जुन गुहा असे म्हटले जाते. हे भारतातील गुहांपैकी सर्वात प्राचीन अशा दगड कापून बनविलेल्या गुहांपैकी एक आहेत. पर्यटकांच्या दृष्टीने ही जागा अत्यंत महत्त्वाची आहे. हे पर्वत प्राचीन काळापासून प्रवाशांसाठी सदाहरित अशा आश्रयस्थानांसाठी प्रसिद्ध आहेत. एका दंतकथेनुसार, या गुहा संत आणि तपस्वींसाठी एका सुरक्षित परिसरात ध्यानधारणा करण्यासाठी बनविलेले होते.

one-of-the-barabar-caves

सम्राट अशोकाच्या राजवटीदरम्यानच्या गया जेहानाबाद सीमेवर वसलेल्या या गुहा कर्ण चौपर गुहा, सुदामा गुहा, लोमस ऋषी गुहा आणि नागार्जुनसमवेत सात रचनांनी बनलेल्या आहेत. आश्चर्य म्हणजे, कर्ण छप्पर गुहा, सुदामा गुहा, लोमास ऋषी गुहा एकाच दगडात कोरलेल्या आहेत. या अद्भुत गुहा प्राचीन काळातील वास्तुशिल्पाचे कौशल्य दर्शवितात. या गुहांमध्ये एकाच आवाजाचे अनेक प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येतात, ज्याच्यामुळे पर्यटकांचे छान मनोरंजन होते.

सुदामा गुहा

Barabar Sudama cave
सुदामा गुहा सम्राट अशोकाच्या राज्याभिषेकच्या 12व्या वर्षी बनविण्यात आली होती. ऋषीमुनींसाठी ही गुहा निर्माण करण्यात आली होती. या गुहेत एका गोलाकार कमानदार कक्षेत एक चौकोनी मंडप आढळून येतो.

लोमस गुहा

lomas Cave
लोमस ऋषींची प्रसिद्ध गुहा देखील सम्राट अशोकाद्वारे बनविण्यात आली होती. या गुहेत मिश्र वास्तुशिल्प आहे आणि हा एक तत्कालीन भारतीय कारागीरांच्या उत्कृष्ट हस्तकौशल्याचा एक नमुना आहे. कमानदार संरचना असलेली ही गुहा त्या काळाच्या लाकडी वास्तुशिल्पाची प्रतिकृती दर्शविते. प्रवेशद्वाराकडे असलेली हत्तींची रांग नागमोडी प्रवेशासह आतील दिशेत स्तूपाप्रमाणे पुढे जाते. मुख्य गुहेच्या आतील बाजूस अनेक गुहा आहेत, ज्यात जाने जवळजवळ अशक्यप्राय आहे.

कर्ण चौपर गुहा

Vadathika cave
कर्ण चौपर गुहेस सुप्रिया गुहा असे देखील म्हटले जाते. या गुहेची निर्मिती सम्राट अशोकाच्या राज्याभिषकच्या 19व्या वर्षी झाली होती. त्या दगडांवर कोरलेल्या राजाज्ञा आजही दिसून येतात. त्या राजाज्ञानुसार या पर्वताला सलातिका असे देखील म्हटले जाते. या गुहा मिश्र वास्तुशिल्पाचे एक उत्पादन आहे. गुळगुळीत पृष्ठभागासह येथे एक वेगळा चौरस कक्ष आढळतो.

वापिका गुहा

Vapiyaka cave
या पर्वतांमध्ये वसलेल्या वरील सात गुहांपैकी एका गुहेत उल्लेख केलेली तथ्ये सूचित करतात की त्याला योगानंद नावाच्या एका ब्राम्हणाने बनविलेले होते. मंदिराच्या आतील परिसरात केलेल्या कोरीवकामात असे दिसून येते की हा प्राचीन प्रांत शंकराच्या समर्पणाचा प्रांत होता. दुसऱ्या एका दृष्टीकोनातून, प्राचीन काळी मगध प्रदेशावर कौल संप्रदायाची अधिसत्ता होती आणि ही जागा त्यांच्या कामाचे केंद्र होते. याचे मूळ सुमारे ख्रिस्तपूर्व 600 वर्षे इतके होते. याला महाराज दशरथांनी आजिविकेच्या अनुयायांना समर्पित केले होते.

विश्व जोप्री
या गुहा दोन आयताकृती कक्षांनी बनलेल्या आहेत, जेथे दगडात कोरलेल्या अशोक पायऱ्या चढून पोहोचले जाऊ शकते.
नागार्जुन गुहा
नागार्जुन गुहा लहान असून त्या बराबर गुहेच्या समोर अलीकडील काळात बनविलेल्या आहेत.
गोपिका गुहा आणि वापिया गुहा ख्रिस्तपूर्व सुमारे 232 वर्षांदरम्यान महाराज दशरथांनी आजिविका संप्रदायाच्या अनुयायांना समर्पित केले होते.

Gopika Cave

बराबर पर्वतांमध्ये वसलेल्या या गुहांना भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित स्थान म्हणून जाहीर केले आहे. आजही लोक या प्रचंड खडकाला पाहण्यास गर्दी करतात, ज्यात कोरून या गुहा बनविण्यात आल्या होत्या. पर्यटक येथे पिकनिक करण्यासाठी वरचेवर येतात. वर्षभर येथे भक्त आणि पर्यटक येत असतात, पण श्रावण महिन्यात आणि वसंत पंचमी, महाशिवरात्री आणि अनंत चतुर्दशीच्या प्रसंगी येथे येणाऱ्या लोकांच्या संख्येत अनेक पटीने वाढ होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here