मुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळे

0
2980
Marathi blog

गणपत्ती बाप्पा मोरया! ही घोषणा महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. या उत्सवामध्ये संगीत, परंपरा, खाद्यपदार्थ यांचा तर समावेश आहेच पण त्याचबरोबर मुंबई व संपूर्ण महाराष्ट्रभरातील वातावरण मंगलमय होऊन जाते. पण तुम्हाला जर खरोखर या सुंदर उत्सवाची परंपरा जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला आधुनिक मंडळांच्या भपकेबाजपणा आणि रोषणाईपासून थोडे दूर जाऊन काही ऐतिहासिक गणेश पूजांना भेट द्यावी लागेल. तर अशा पवित्र प्रसंगी, आम्ही तुमच्यासाठी मुंबईतील सर्वात जुन्या गणेश मंडळांची यादी घेऊन आलो आहोत ज्यांना तुम्ही भेट दिलीच पाहिजे.

केशवजी नाईक चाळ, गिरगाव126 वर्षे

Ganesh chaturthi in Mumbai

जेव्हा बाळ गंगाधर टिळकांनी पहिल्यांदा गणेश चतुर्थी एक सार्वजनिक उत्सवाच्या स्वरूपात साजरी केली तेव्हा पहिल्याच वर्षी म्हणजेच 1893 मध्ये याची स्थापना झाली, ही शहरातील पहिली सार्वजनिक गणेश पूजा आहे. मंडळाच्या उत्सव साजरा करण्याच्या पर्यावरणपूरक पद्धतीमुळे आणि लहान गणेश मूर्तीमुळे हे मंडळ लोकप्रिय आहे. ना लाऊडस्पीकर, ना ढोलताशा, इथली पूजा म्हणजे एक मूळ स्वरूपातील पारंपारिक उत्सव आहे. आयोजन समिती सातत्याने भजनाचे कार्यक्रम आणि लहान मुलांसाठीच्या स्पर्धा घेते. मंडळाला भेट देण्याची चांगली वेळ म्हणजे सायंकाळी 5 ते रात्री 11 होय.

चिंचपोकळीचा चिंतामणी, चिंचपोकळी99 वर्षे

old ganpati mandals

चिंचपोकळीचा चिंतामणी (चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ) ची स्थापना 1920 मध्ये केली गेली. हे मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने गणेशोत्सव मंडळ आहे आणि हे मुंबईच्या सर्वात मोठ्या मंडळांपैकी एक आहे. चिंचपोकळी सार्वजनिक मंडळ हे लालबाग मधील सर्वात लोकप्रिय मंडळांपैकी एक आहे आणि चिंतामणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी प्रचंड संख्येने भाविक इथे येतात. पूजा समितीद्वारे रक्तदान तसेच नेत्रदान यांसारख्या अनेक सामाजिक कल्याण उपक्रमांना हातभार लावला जातो तसेच गरीब आणि गरजूंना मदतही केली जाते.

मुंबईचा राजा, गणेश गल्ली91 वर्षे

मुंबईच्या कापड उद्योगाच्या किंवा कापड गिरण्यांच्या मुख्य भागात बसलेल्या लालबागमधील पेरू चाळीभोवताली राहणाऱ्या तरुणांनी 1928 मध्ये लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचीस्थापना केली. लोकमान्य टिळकांनी सामान्य जनतेला एकत्र आणून या सामूहिक मंचाच्या माध्यमातून त्यांच्यात स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा उत्पन्न करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरूवात केली. मनामध्ये हेच ध्येय बाळगून, 1945 मध्ये लालबाग सार्वजनिक मंडळाने सुभाषचंद्र बोस सात अश्वांचे अश्वारोहण करत आहेत असे दर्शवणारे मूर्तीपूजन केले. ही संकल्पना इतकी लोकप्रिय झाली की मंडळाला उत्सवाचा कालावधी 45 दिवसांपर्यंत वाढवावा लागला.

लालबागचा राजा, लालबाग85 वर्षे

मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय गणपती मंडळांपैकी हे सर्वाधिक भक्तांना आपल्याकडे आकर्षून घेणारे मंडळ म्हणजे लालबागचा राजा होय. इथे बाप्पांची मूर्ती 11 दिवसांसाठी असते आणि अनंत चतुर्थीच्या पवित्र दिवशी तिचे विसर्जन केले जाते. भक्तांची अशी एक श्रद्धा आहे की हा एक नवसाला पावणारा गणपती आहे आणि उत्सवादरम्यान प्रत्येक वर्षी 15 लाखाहूनही अधिक भक्तमंडळी बाप्पाचे दर्शन घेतात. बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांना रांगा लावून 24 तासांहून अधिक काळ वाट पहावी लागते आणि जर तुम्ही रांगेमध्ये उभे असाल तर दर्शन घेण्यासाठी 4 तासांहून जास्त वेळ थांबण्याची तयारी मात्र नक्की ठेवा.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here