ऋषीकेश – भारताची साहस राजधानी

0
1417

१९९० मध्ये ऋषीकेश हे ठिकाण ‘जगातील योग राजधानी’ बनले, कारण ते आश्रम आणि ध्यानधारणा शिबिरांचे प्रमुख केंद्र होते. यातले बहुतेक उपक्रम शहराच्या उत्तर भागात चालायचे, कारण या भागात घनदाट जंगले आणि शेजारून खळाळत वाहाणारी पवित्र नदी पाहायला मिळते. मात्र, ऋषीकेश आता अध्यात्म, योग आणि मनोबल विस्ताराच्याही पलीकडे ओळखले जाते. आज पर्यटक थरार, साहस आणि मजा अनुभवण्यासाठी ऋषीकेशला भेट देतात आणि हे प्राचीन शहर त्यांच्या अपेक्षा पूर्णही करते.

ट्रेकिंग आणि कॅम्पिंग

Rishikesh Trekking

ऋषीकेशमधील साहस उपक्रम ट्रेकिंग आणि कॅम्पिंग सहलीपासून सुरू होतात. प्रतिष्ठित गिर्यारोहण संस्था ‘नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनेयरिंग’ या ठिकाणी वसलेले असून ते उत्तरकाशी या तीर्थ क्षेत्रापासून जवळ आहे, जिथे तांत्रिकृष्ट्या परिपूर्ण मार्गदर्शक पर्यटकांना या दरीखोऱ्यांची आनंददायी सफर करून आणण्यासाठी सज्ज असतात.

या ठिकाणी सर्वत्र शिवालिक रांगा पाहायला मिळत असल्यामुळे ट्रेकिंगही करता येते. ऋषीकेशमधील घनदाट जंगलांतून चंद्रशिलासारख्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या कित्येक ट्रेकिंग ट्रेलसाठी जाता येते. ऋषीकेश हे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि कौर पाससारख्या प्रसिद्ध ट्रेकचे मुख्य तळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याशिवाय कन्यापुरी, नीलकंठ महादेव आणि झिलमिल गुफा ही या ठिकाणी ट्रेकिंगसाटी उपलब्ध असलेली ठिकाणेही भटक्यांना आकर्षित  रतात.

व्हाइट वॉटर राफ्टिंग

Rishikesh White Water Rafting

ऋषीकेशमधील गंगेचा प्रवाह हरीद्वारसारखा शांत आणि संथ नाही. साहसी पर्यटक नदीच्या या रौद्रावताराचा व्हाइट वॉटर खेळांसाठी फायदा घेतात. कौडियाला ते ऋषीकेश हा मार्ग राफ्टिंगसाठी सर्वोत्तम मानला जातो. कौडियालाच्या रिव्हर राफ्टिंग पट्ट्याला फोर प्लस हा दर्जा देण्यात आला असून हा पट्टा चाळीस किलोमीटरचा आहे. या दरम्यान मरिन ड्राइव्ह, रोलर कोस्टर, गोल्फ कोर्स, क्लब हाउस, डबल ट्रबल, हिल्टन, टर्मिनेटर, थ्री ब्लाइंड माइस, क्रॉसफायर इत्यादी लोकप्रिय रॅपिड्स अनुभवता येतात. सप्टेंबर ते एप्रिलदरम्यान हे रॅपिड्स जास्त चांगल्या प्रकारे अनुभवता येतात.

रॅपलिंग

Rishikesh Rappelling

ऋषीकेशच्या उत्तरेकडे नदीकाठी अद्भुत आकाराचे दगड पाहायला मिळतात. रॉक क्लायम्बिंग करताना सर्वोच्च दर्जाची सुरक्षा साधने वापरली जातात आणि रॅपलिंगसाठी मोठ्या आकाराच्या दगडांचा आधार घेतला जातो. रॅपलिंग हा साहस प्रकार आहे, ज्यात चढणारा हार्नेस आणि दोरीच्या सहाय्याने उंच दगडावरून खाली घसरत येतो. षीकेशला येणाऱ्या पर्यटकांमध्ये हा साहस प्रकार खूप लोकप्रिय आहे.

बंजी जंपिंग आणि रिव्हर क्लिफ जंपिंग

Rishikesh Bungee Jumping

ऋषीकेशमध्ये देशातील सर्वाधिक उंचीवर वसवलेले बंजी जंपिंग बेस आहे. मोहन छत्ती ठिकाणी १० ते १५ सेकंदांची फ्री- फॉल अनुभवता येते व त्यानंतर रबराची दोरी तुम्हाला ओढून गंगेच्या पात्रात लक्षणीय भर घालणाऱ्या हल नदीच्या कित्येक फुट उंचीवर आणून सोडते. हल नदीकडे तोंड करून कंसाकृती कमान बांधण्यात आली आहे. न्यूझीलंडमधील साहसी वीर डेव्हिड अलार्डियस यांनी हा प्लॅटफॉर्म बांधला आहे. त्याशिवाय एक किलोमीटर लांबीची फ्लाइंग फॉक्स लाइन इथे आहे, जी आख्ख्या आशिया खंडातील सर्वाधिक लांबीची फॉक्स लाइन आहे. त्याशिवाय ८० मीटर लांबीचा मोठा झुलाही इथे आहे.

वाचून थक्क झालात ना? मग, या ठिकाणाला भेट द्या आणि या साहस प्रकारांची मजा घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here