Simplifying Train Travel

हत्तींसाठी पावसाळ्यातील स्पा – केरळमधील निरंतर असा वारसा

“पश्चिमी घाटांचे सुपुत्र” म्हणून ओळखले जाणारे सभ्य पशू, म्हणजेच हत्ती हे केरळच्या संस्कृतीचे इतपत अविभाज्य घटक आहेत कि त्यांना राज्य पशूचा दर्जा देण्यात आला. राज्य-अनुमोदित जलसा असू दे किंवा धार्मिक माहात्म्य असो, देवाच्या स्वत:च्या देशातील कोणताही सण हत्तींच्या रंगीबेरंगी मिरवणूकीशिवाय अपुरे असतात.

या महान प्राण्याच्या अशा माहात्म्यामुळे, या पाळीव हत्तींसाठी गुर्वायुर येथे विशेष “स्पा” बांधण्यात आले आहे याचे आश्चर्य वाटू नये, जेथे जुलै महिन्यामध्ये या प्राण्यांचे भरपूर लाड केले जातात. चला याशी संबंधित काही रूचीपूर्ण गोष्टींना उलगडू –

Anakotta (Punnathur Kotta Elephant Yard)
• गुर्वायुरमधील एका मंदिराचे प्रशासक, गुर्वायुर देवसम, यांनी हत्तींना आराम मिळावा व अकरा महिन्यांच्या मंदिरातील सेवेनंतर त्यांचे आरोग्य पूर्ववत व्हावे यासाठी 1985 मध्ये हत्ती कायाकल्प मेळावा सुरू केला.

• ईश्वरचरणी भक्तगणांद्वारे हत्ती अर्पण करणे ही इथली सर्वसामान्य प्रथा आहे, मंदिराला त्यांच्यासाठी जागा बनवावी लागली जेथे त्या सर्वांची देखभाल करता येईल आणि याप्रकारे त्यांनी पुन्नथूर कोट्टा हत्ती आवाराला एका औपचारिक महालात म्हणजेच एका पशुसंग्रहालय परिवर्तित केले आणि त्याचे पुन:नामकरण अनकोट्टा असे केले, ज्याचा थोडाफार अर्थ “हत्तींचा वाडा” असा होतो. मंदिराच्या मैदानापासून जवळपास तीन किलोमीटरच्या अंतरावर असून, अनकोट्टा एक 10 एकराचे आवार आहे ज्यात जवळपास 50 -60 हत्तींना ठेवले गेले आहे.

• दर वर्षी जुलै महिन्यात, या हत्तींचा कायाकल्प केला जातो. जलाशयात ते आरामात डुंबून रहातात व त्यांचे माहूत नारळाच्या किशीने रगडून त्यांना मसाज करतात.

Monsoon spa for elephants
• अनकोट्टाला, सर्व कामे काळजीपूर्वक आणि प्रेमाने केली जातात. पशुसंग्रहाशी एक क्रियाकल्प केन्द्र संलग्न असून ते या विशालकायांना विस्तृत स्पा सेवा पुरवते. या महिन्यादरम्यान, या प्राण्यांना ना केवळ स्नान आणि मसाज थेरपी दिली जात तर उच्च पोषकतत्वे असलेले खाद्यही दिले जाते जे आयुर्वेदिक बलवर्धक औषधीयुक्त असते.

Monsoon Spa for elephants
• थेरपी, विशेषत: खाद्य योजन, दिग्गज विशेषज्ञांच्या देखरेखीत केले जाते जेणेकरून दिलेले उपचार हत्तींसाठी संपूर्ण लाभदायी असतील याची खातरजमा होईल.
इथे हत्तींसाठी हा एक पूर्णपणे लाड करून घेण्याचा काळ असतो व ते त्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगतात.

सूचना – अनकोट्टा (पुन्नाथुर कोट्टा हत्ती आवार) हे दक्षिणेकडील राज्य केरळमधील कोचीच्या उत्तरेला जवळपास 52 मैलावर (80 किलोमीटर्) आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत