मुन्‍नारचे भेट दिलीच पाहिजे असे ८ धबधबे

0
1026

मुन्‍नार हे पश्चिम घाटाच्‍या पर्वतरांगामधील समद्रसपाटीपासून जवळपास ५,२०० फूट किंवा १,६०० मीटर उंचीवर असलेले छोटेसे पण विलक्षण असे थंड हवेचे ठिकाण आहे. काही भव्‍य धबधब्‍यांचा समावेश असलेल्‍या मुन्‍नारला भेट देणे संस्‍मरणीय ठरेल. मुन्‍नारमध्‍ये आल्यावर पाहिलेच पाहिजेत असे काही भव्‍य धबधबे पुढीलप्रमाणे:

Attukal Waterfalls

अट्टुकल धबधबा: हा धबधबा मुन्‍नारपासून ९ किमी अंतरावर असलेल्‍या पल्‍लीवसल येथे आहे. सभोवतालच्‍या टेकड्यांचे दृश्‍य आणि आणि उंच डोंगरावरून पडणा-या पाण्‍याचा खळखळ आवाज तुमच्‍या मनात संस्‍मरणीय आठवणींची निर्मिती करतात. साहसी पर्यटकांसाठी धबधब्याच्‍या उतारावरील ट्रेकिंग ही आणखी एक अॅक्टिव्हिटी आहे.

Lakkam Waterfalls

लक्‍कम धबधबा: मुन्‍नार ते मारायूर (मुन्‍नार शहरापासून ५ मिनिटांच्‍या अंतरावर) मार्गावर असलेला हा धबधबा ‘वागा’ झाडांनी वेढलेला आहे. या झाडांवर सुंदर लाल रंगाची फुले येतात. एराविकुलम पठारावरील अनेक धबधब्यांपर्यंत पोहोचताच येत नाही. मात्र, तिथल्याच या धबधब्याला अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभले आहे. त्यामुळे हा धबधब पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षून घेतो.

Chinnakanal Waterfalls

चिन्‍नकनाल धबधबा: दैवी नदी देवीकुलममधून उगम पावणारा, चिन्‍नकनाल धबधबा निसर्गरम्‍य पर्वतरांगांमधील सुंदर हरित वनांमध्‍ये वेढलेला आहे. हा धबधबा मुन्‍नारपासून फक्‍त १५ किमी अंतरावर आहे.

Nyayamakad Waterfalls

न्‍यायमकड धबधबा: हा भव्‍य धबधबा मुन्‍नार ते राजमाला (मुन्‍नारपासून १० किमी) मार्गावर आहे. १,६०० मीटर उंचीवरून पाणी खाली पडते आणि धबधबाच्‍या आसपास असलेल्‍या हरित वनांना पोषण प्रदान करते. हे सुप्रसिद्ध ट्रेकिंग व सहलीचे ठिकाण आहे. पावसाळ्यानंतर न्‍यायमकडला भेट देणे योग्‍य ठरेल.

Kuthumkal Waterfalls

कुथुमकल धबधबा: जर तुम्‍ही मुन्‍नारला भेट दिली, तर तुमच्‍या परिवारासोबत या सुंदर सहलीच्‍या ठिकाणी उत्तम वेळ घालवायला विसरू नका. हा धबधबा मुन्नारपासून २४ किमी अंतरावर आहे. उंचावरून वेगाने येणारे पाणी खाली असलेल्या दगडांवर जोरजोरात पडल्याने पाण्याचे तुषार उडतात. त्यामुळे हा धबधबा धुक्याने आच्छादल्यासारखा वाटतो.

Thoovanam Waterfalls

थूवनम धबधबा: मुन्नार शहरापासून जवळपास ६० किमी अंतरावर असलेल्या चिन्नर वन्यजीव अभायरण्यात पंबर नदीमधून उगम पावणा-या या सुंदर धबधब्‍यापर्यंत डोंगराळ जंगलातून ट्रेकिंग करूनच पोहोचता येऊ शकते. आलमपट्टी वन क्षेत्राच्या चेकपोस्टपासून सुरू होणारा हा ट्रेक जवळपास एक तासाचा आहे. या मार्गावर विविध वनस्पती आणि पक्ष्यांमुळे निसर्गाचे अप्रतिम रूप दिसते.

Cheeyappara Waterfalls

चीयप्परा धबधबा: मुन्नारपासून ४० किमी अंतरावर असलेला हा धबधबा अदिमाली व नेरियामंगलम दरम्‍यानच्या कोची-मदुराई महामार्गावर आहे. सात लहान धबधब्यांचा सुंदर देखावा इथे आहे. समुद्रसपाटीपासून जवळपास १,००० फूटांवर असलेल्या या धबधब्यापर्यंत जवळपासच्या शहरांमधून सहजपणे पोहोचता येते. या परिसरात सुरक्षित तरीही साहसी ट्रेकिंग करता येईल.

Valara Waterfalls

वालरा धबधबा: अदिमाली व नेरियामंगलमदरम्यान असलेला हा धबधबा मुन्नारपासून ४२ किमी अंतरावर आहे. वालरा धबधबा केरळ वीज मंडळाच्या थोट्टियार हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पाजवळ आहे. हा धबधबा सुंदर व नयनरम्य हरित वनांमध्ये विविध धबधब्यांची एक साखळीच निर्माण करतो. जवळपास १,००० मीअर उंचीवरून पडणारे लहान धबधबे म्हणजे एक आनंददायी दृश्यच!

मुन्नारला कसे यावे?

  • रेल्‍वे: मुन्‍नारला जोडणारे प्रमुख रेल्‍वे स्‍टेशन्‍स आहेत एर्नाकुलम (१३० किमी) व अलुवा (१४० किमी).
  • रस्‍त्‍याने: मुन्‍नार हे रस्‍त्‍याने कोचीनपासून १३० किमी अंतरावर आहे. इथे पोहाचण्‍याकरिता 3 तास लागतील (राष्‍ट्रीय महामार्ग-४९चा वापर करा). कोठामंगलम व अदिमलीदरम्‍यान तुम्‍ही चहाच्‍या मळ्यांमधील चायपत्‍तीचा गोड सुगंध अनुभवू शकता. याव्‍यतिरिक्‍त, मार्गावर सुंदर वने व निसर्गरम्‍य धबधबे पाहायला मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here