पश्‍चिम बंगालमधील ५ प्रसिद्ध हेरिटेज कॅफेज

0
1089

पश्‍चिम बंगाल म्हणजे काही सर्वोत्तम कॅफेजच माहेरघरच. वंगबंधूंसाठी कॅफे शॉपची त्यांची अशी खास संकल्पना आहे. उत्तम कॉफी किंवा चहाच्या बंगाली प्रेमावर इथे काहीसा ब्रिटिश अमल दिसतो. असे कॅफे इथे फार लोकप्रिय आहेत.

पश्‍चिम बंगालमधील काही प्रसिद्ध कॅफेजची माहिती

Indian Coffee House

इंडियन कॉफी हाऊस, कोलकाता

कोलकात्याचा अड्डा सेंटर म्हणून प्रसिद्ध असलेलं हे कॉफी शॉप १९३६ मध्ये कॉलेज स्ट्रीटवर सुरू झालं. इथली कोल्ड कॉफी आणि फिश कटलेट ग्राहकांमध्ये फारच लोकप्रिय आहे. इथे कायमच गप्पांचा अड्डा जमवून बसलेल्यांची गर्दी असते.

Flury’s

फ्लरीज, कोलकाता

श्री. आणि श्रीमती जे. फ्लरी या स्विस दाम्पत्याने १९२७ मध्ये या कॅफेची सुरुवात केली. हे कोलकात्यातील सर्वोत्त्कृष्ट वेस्टर्न ब्रेकफास्ट कॉफी शॉप आहे. कोलकात्याच्या मध्यवर्ती भागात वर्दळीच्या पार्क स्ट्रीट एरियामध्ये असलेल्या फ्लरीजमध्ये सर्वोत्तम कॉफी आणि चहा मिळते. त्यांचे केक, पेस्ट्रीज आणि डोनट्स तर जिभेवर अगदी विरघळून जातात. फ्लरीजमध्ये गेल्यावर तुमचं नशिब बलवत्तर असेल तर तुम्हाला तिथे काही सेलिब्रिटिजही दिसू शकतात.

Kookie Jar

कूकी जार, कोलकाता

या सिटी ऑफ जॉयमध्ये गेल्या २८ वर्षांपासून कूकी जार हे मिष्टान्नप्रेमींचं आवडतं ठिकाण आहे. या कॅफेमध्ये गेल्यावर मोचा बिस्कीट, चॉकलेट मूस, लेमन टार्ट, चिकन एन्व्हलप आणि मशरुम पॅटीस नक्की चाखून पहा. हे सगळेच पदार्थ पुन्हा पुन्हा खावेसे वाटतील, असे आहेत.

Glenary’s

ग्लेनरीज, दाजिर्लिंग

१९११ मध्ये सुरू झालेला ग्लेनरीज कॅफे त्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये लाल आणि पांढर्‍या चौकडीचे टेबल क्लॉथ घातलेल्या टेबलावरचा चहा आणि नाश्ता यासाठी ओळखला जात होता. इथे मिळणारा दार्जिलिंग चहा, कॉफी, क्रीम रोल, पेस्ट्रीज, ऍपल पाय, ब्राऊनी आणि स्कोन्ज लोकप्रिय आहेत.

Paris Kalimpong

पॅरीस कॅलिपॉंग, कॅलिपॉंग

हा कॅफे अगदी निसर्गरम्य परिसरात वसला आहे. आत पाऊल ठेवण्याक्षणी इथलं इंटेरिअर तुम्हाला सुखावून जातं. कॉफी, ग्रीन टी, फ्रेंच पेस्ट्रीज, ब्रेड्स, ब्रोच, किश आणि लेमन चीज केक ही त्यांची खासियत आहे. पॅरिसमधील रम्य संध्याकाळचं बरंच कौतुक केलं जातं. पण, पश्‍चिम बंगालमधील संध्याकाळही तितकीच रम्य व्हावी, याची काळजी या कॅफेमध्ये घेतली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here