Simplifying Train Travel

चंदिगढमधील 5 सांस्कृतिक वारशाची भोजनालये

अलीकडच्या काळात चंदिगढमध्ये पाककलेसंबंधी दृश्यात बरीच प्रगती दिसून येते. अत्यंत महागड्या रेस्टॉरंट्सपासून रस्त्यांवरील स्टॉल्सपर्यंत, शहरात खवय्यांसाठी बरेच काही आहे! या शहरात तुम्ही मनसोक्त खाऊ शकाल अशा काही पर्यायांवर नजर टाकूया.

Sindhi Sweets
सिंधी स्वीट्स: सेक्टर 17 च्या बाजारात वसलेले हे स्थान, तुमची लाळ गळणारा चना भटुरा आणि मातीच्या पारंपारिक भांड्यात दिल्या जाणाऱ्या थंडगार गोड लस्सी यांच्यासह दिवसाची सुरुवात करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. येथील बुंदीचे लाडू चाखून पाहिल्याशिवाय तुमची क्षुधाशांती होऊच शकणार नाही.

Nik Baker's
निक बेकर्स: युरोपियन शैलीचे बेकरी-वजा-कॅफे सुमारे एक दशकापासून स्थानिक लोकांचे अत्यंत आवडते ठिकाण बनले आहे. यात अनेक प्रकारचे क्विन्चेस, टारटस, पेस्ट्रीज आणि केक्स मिळतात. त्यांच्या फ्रुट पंचचा स्वाद घेणे त्यात भरलेल्या ताजी मोसमी फळे, साय आणि साखरेच्या पाकमुळे अनिवार्य बनून जाते! पास्ता आणि मटण चीज बर्गर तर इतर खास पदार्थांमध्ये आवर्जून आढळतात.

Pal Dhaba
पाल धाबा: सेक्टर 28 मध्ये वसलेला हा एक सर्वात जुना धाबा आहे, पण त्यात त्या खटिया नाहीत बरं का! येथे आरामदायक बैठक आहे आणि अस्सल पंजाबी खाणे वाढले जाते. येथील चिकन, डाल मखनी, कढाई पनीर आणि आलू पराठा क्षुधेसह आपल्या मनाला देखील संतुष्ट करतात.

Sethi Dhaba
सेठी धाबा: हे मध्यरात्री भूक लागणाऱ्या निशाचर आत्म्यांसाठी एक सर्वस्वच आहे! हे चंदिगढ-अंबाला राजमार्गावर (झिराकपूरजवळ) वसले आहे. मुख्य शहरापासून फक्त 20 मिनिटांचे ड्राईव्ह. तुम्ही येथे मात्र सर्वत्र खाट पाहू शकता आणि एक खरा पंजाबी अनुभव देत मेनुसाठी डफली प्रस्तुत असतो. वेलची असलेला चहा, मिस्सी रोटी, सरसों का साग आणि मक्के दी रोटी येथील खास पदार्थ आहेत.

Monica's
मोनिकाज: याच्या दृश्याकडे पाहू नका! सेक्टर 8 च्या बाजारात असलेले मोनिकाज दिसण्यास फारसे आकर्षक नसले तरी देखील येथील स्वादिष्ट केक्स व पेस्ट्रीज आपल्याला वेड लावतील. मोनिकाजमधील लाल वेल्वेट केक आणि चॉकोलेट केक चुकविल्यास निश्चितच तुम्हाला पश्चाताप होईल!


One thought on “चंदिगढमधील 5 सांस्कृतिक वारशाची भोजनालये

  1. rockhousepkl17

    very good list of all the main restaurants and dhabas of chandigarh
    If you want a good dining at Panchkula with some booze and party anvironment. cometoRockhouse.

    Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत