रेल्वे प्रवासात मिळणारे स्थानिक खाद्यपदार्थ

0
608

आपल्या देशात रेल्वे प्रवास हा फक्त निसर्गरम्य असतो असे नाही, तर त्याबरोबर प्रत्येक राज्यातील खास खाद्यपदार्थही चाखायला मिळतात. दिल्ली मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला मथुरेचे पेढे, आग्र्याचा पेठा माहीत असतो, पण इतरही कित्येक रुचकर खाद्यपदार्थ आहेत, जे तुम्हाला माहीत नाहीत.

१) रतलाम स्थानकावरचे पोहे – हे स्थानक कच्चा कांदा आणि शेवेबरोबर सर्व्ह केल्या जाणाऱ्या पोह्यांसाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा पुढच्या भेटीत स्थानकावर उतरून त्यांची चव चाखायला विसरू नका.

२) खरगपूरचे आलू दम – खगरपूर रेल्वे स्थानक वाफाळत्या आलू दमसाठी प्रसिद्ध आहे. पुढच्या वेळेस या स्थानकाला भेट द्याल तेव्हा विक्रेत्याला तुमच्या आलू दमवर जास्त मसाला टाकायला सांगण्याचे विसरू नका.

३) अबू रोड स्थानकवर रेशमी रबडी – निसर्गसौंदर्यबरोबर माउंट अबू आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे रबडी. दूध आणि सुक्यामेव्यापासून बनवलेली ही गोड रबडी या रेल्वे स्थानकाचे आकर्षण आहे.

४) मदुर स्थानकावर मदुर वडे – गरम चहा आणि मदुर वडे हे प्रवाशांचे आवडते समीकरण आहे.

५) सीएसटीचा वडापाव – अस्सल भारतीय, मसालेदार चवीचा वडा छत्रपती शिवाजी टर्मिनसवर चाखायला मिळतो. हा पदार्थ मुंबईकर तसेच प्रवाशांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

६) मलईदार लस्सी – अमृतसर रेल्वे स्थानकावर पंजाबची खासियत असलेली मलाईदार गोड लस्सी मिळते.

७) माल्डा आमसोत्तोचा आंबा – हे शहर आंबा आणि तितक्याच स्वर्गीय चवीच्या आमसोत्तो किंवा आमपापडासाठी प्रसिद्ध आहे. या स्थानकावर त्यांची चव घ्यायला विसरू नका.

८) आणंद येथे ताजे, फ्लेवर्ड दूध – हे शहर देशातील दुग्धजन्य उत्पादनांचा सर्वात मोठा ब्रँड अमूलचे माहेरघर असून त्यांचे वेगवेगळ्या स्वादातील दूख आवर्जून चाखा.

९) बुर्डवान येथील मिहीदाणा – तांदळासारख्या छोट्या दाण्यांचा, तळून साखरेदा पाकात बुडवलेले मिहीदाणा बुर्डवानचा अभिमान आहे. हे चवदार मिष्टान्न बंगालचा वारसा असून रेल्वे स्थानकांवर उपलब्ध आहे.

१०) कालीकत येथील रंगीबेरंगी कोझीकोड हलवा – कोझीकोड हलवा आणि सोबत केळ्याचे चिप्स ही या पदार्थाची खरी चव घ्यायची पद्धत. कालीकत रेल्वे स्थानकावर अस्सल हलवा खायला मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here