फिल्‍मी सफर: बॉलीवूडच्‍या माध्‍यमातून प्रवास

0
648

बॉलीवूड चित्रपट मनोरंजनासोबतच असंख्‍य भावना सुद्धा प्रदान करतात. ते आपल्‍याला प्रेम, द्वेष करण्‍याकरिता, काळजी घेण्‍याकरिता आणि ट्रेनने प्रवास करण्‍याकरिता सुद्धा प्रेरित करतात. जर तुम्‍ही बॉलीवूड चित्रपट पाहत मोठे झाले असाल, तर तुम्‍ही निश्चितच मान्‍य कराल की चित्रपटामधील जलदगतीने चालणा-या ट्रेनपेक्षा दुसरा चांगला “प्रॉप” कोणताच नाही.  भारतीय ट्रेन्‍स या चित्रपट निर्माते, तसेच चित्रपटप्रेमींच्‍या नेहमीच जिवलग सोबती राहिले आहेत.

Filmy escape: Travel through Bollywood

काही संस्‍मरणीय चित्रपटांची यादी, जी तुम्‍हा दिलवाले दुल्‍हनिया ले जायेंगे: अमरिश पुरीचा लोकप्रिय संवाद कोण विसरू शकतो, “जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी”, जो आपटा रेल्‍वे स्‍थानकावर शूट करण्‍यात आला होता. जेव्‍हाजेव्‍हा बॉलीवूडमधील ट्रेन्‍सचा उल्‍लेख होतो, तेव्‍हातेव्‍हा या चित्रपटाच्‍या सुरेख सीनची नेहमीच आठवण येते. ला ट्रेन्‍ससोबतच्‍या त्‍यांच्‍या प्रवासासह आनंदमय प्रवासावर घेऊन जाईल आणि काय माहित, तुम्‍ही कदाचित त्‍यामधून प्रेरित होऊन पुढील ट्रेन ट्रिपसाठी तुमच्‍या बॅग्‍ज पॅक कराल.

Filmy escape: Travel through Bollywood

चेन्‍नई एक्‍सप्रेस: रोहित शेट्टीच्‍या या चित्रपटामध्‍ये हास्‍यजनक प्रसंगांसोबतच अस्‍तव्‍यस्‍त टि्वस्‍ट्स सामावलेले आहेत, पण चित्रपटामध्‍ये आणखी एक सुरेख ट्रेन सीन सामावलेले आहे. अरे! चित्रपटामधील ट्रेन सीक्‍वेन्‍स कशाप्रकारे विसरू शकतो, जो डीडीएलजेकरिता मानवंदना म्‍हणून शूट करण्‍यात आला होता, जेथे मीनाने (दिपिका पदुकोण) काजोलची भूमिका साकारली आहे आणि तिला आपण ट्रेन पकडण्‍यासाठी धावताना बघतो. आणखी एक सीन राहिला का? होय, मीना व राज यांच्‍यामधील अंताक्षरीच्‍या रूपातील संवाद.

Filmy escape: Travel through Bollywood

जब वी मेट: शाहीद व करीना अभिनीत या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाने आपल्‍याला गीत व उत्‍तर भारताच्‍या नयनरम्‍य स्‍थळांच्‍या प्रेमात पाडण्‍यास भाग पाडले. मुंबईसारख्‍या गजबजलेल्‍या शहरातील ट्रेनमधून भटिंडापर्यंतचा प्रवास सादर करत, जब वी मेट चित्रपटाने आपल्‍याला प्रवास करण्‍याकरिता आणि बॉलीवूड व अर्थातच ट्रेन्‍सच्‍या प्रेमात पडण्‍यास भाग पाडले.

Filmy escape: Travel through Bollywood

बर्निंग ट्रेन: होय, हा १९८०च्‍या दशकातील दिग्‍गज सिता-यांचा समावेश असलेला चित्रपट ट्रेनसंबंधित ड्रामा व दु:खद घटना दर्शविणारा आतापर्यंतचा एकमेव चित्रपट आहे. अचंबित करणारी बाब म्‍हणजे, आपल्‍या अर्थव्‍यवस्‍थेवरील रेल्‍वेचा मोठा प्रभाव पाहता, रेल्‍वेला मानवंदना देण्‍याकरिता बॉलीवूडने बराच काळ घेतला. जरी बॉलीवूड क्षेत्रामध्‍ये आता ट्रेन्‍स सीक्‍वेन्‍स दर्शविले जात असले, तरी हा चित्रपट सामान्‍यतेच्‍या संदर्भात खूपच अग्रस्‍थानी आहे, कारण हा चित्रपट ट्रेनमधील रेलयात्रींच्‍या दररोजच्‍या वैयक्तिक कथा व ट्रेन प्रवासाशी संबंधित काल्‍पनिक ड्रामाला दर्शवितो.

Filmy escape: Travel through Bollywood

दिल से: चित्रपटाची कथा अत्‍यंत गंभीर होती, पण त्‍यामध्‍ये ट्रेन्‍सशी संबंधित फक्‍त गाणे चित्रीत करण्‍यात आले होते, ज्‍यामुळे बॉलीवूडमधील ट्रेन सीक्‍वेन्‍समध्‍ये अधिक भर पडली. शाहरुख खान व मलायका अरोरा यांनी चालत्‍या ट्रेनच्‍या छतावर नृत्‍य सादर केले, ज्‍यामुळे सर्व देश त्‍यांच्‍या नृत्‍याच्‍या प्रेमात पडला. डोंगराळ प्रदेशाचे मूळ नैसर्गिक सौंदर्य व चहाचे मळे ट्रेन्‍सच्‍या माध्‍यमातून सुरेखरित्‍या दर्शविण्‍यात आले आहेत.

Filmy escape: Travel through Bollywood

बजरंगी भाईजान: मुन्‍नीने एकही शब्‍द बोलता आमचे मन जिंकून घेतले. नाही का? पण, या चित्रपटाने अशी कामगिरी केली, जी इतर चित्रपटांमध्‍ये क्‍वचितच दिसून येते. चित्रपटाने दोन प्रतिस्‍पर्धी – भारत व पाकिस्‍तानला एकत्र आणले. अटारी रेल्‍वे स्‍थानक आणि भारत व पाकिस्‍तान यांच्‍यामधील ट्रेनचे सीन यांबाबत शब्‍दांमध्‍ये वर्णनच करता येऊ शकत नाही.

Filmy escape: Travel through Bollywood

स्‍वदेश: ऑस्‍कर-नामांकित चित्रपट या यादीमध्‍ये असलाच पाहिजे. प्रवास, प्रेम, तत्‍त्‍वज्ञान व शाहरूख खान हे या सुपरहिट चित्रपटाचे खास आकर्षण होते. पण, तुम्‍हाला तो सीन आठवतो का, ज्‍याने लाखोंच्‍या मनाला स्‍पर्श केला, तो म्‍हणजे, जेव्‍हा मोहन भागवत ट्रेनने प्रवास करतो आणि त्‍याला वास्‍तविक भारतीय स्थितीची माहिती मिळते आणि तो भारतात राहण्‍याबाबतच्‍या आपल्‍या निर्णयामध्‍ये बदल करतो? खरचं, प्रत्‍येक “स्‍वदेशी”साठी प्रेरणादायी चित्रपट, नाही का?

Filmy escape: Travel through Bollywood

परिनीता: विद्या बालन व सैफ अली खान अभिनीत “परिनीता” चित्रपटाने “कास्‍तो मजा है रेलयमा” गाण्‍यामध्‍ये डोंगराळ प्रदेशांच्‍या निसर्गरम्‍य सौंदर्याला दर्शविले आणि ट्रेनमधून प्रवास करताना लहान मुलांचे हे आवडीचे गाणे बनले.

तर मग, आणखी एका कथेच्‍या निर्मितीसाठी तुम्‍ही ट्रेन प्रवासावर का जात नाही – यावेळी खास तुमच्‍यासाठीच?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here