लिटल युरोप – वसाहती कालखंडामधील हुगळी वारसा!

0
393

जवळपास एक शतकानंतर, वास्‍को द गामा भारताच्‍या पश्चिम किनारपट्टीवर उतरला आणि हुगळी जिल्‍ह्यामध्‍ये सध्‍या असलेल्‍या हुगळी नदीच्‍या काठी युरोपियन वसाहती विकसित होऊ लागल्‍या. त्‍यांनी भव्‍य बांधकाम केली आणि त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या भाषाशैलीमध्‍ये स्‍थानिक भाषा, खाद्यप्रकार आत्‍मसात केले.

चला पाहूया बंगालमधील युरोपियन इतिहास

Portuguese remnants in Bandel

बांदेलमधील पोर्तुगीज अवशेष

  • पोर्तुगीजांची मजबूत पकड – पोर्तुगीज हे बंगालमध्‍ये स्‍थायिक झालेले पहिले युरोपियन होते, तसेच त्‍यांना बंगालमध्‍ये पहिले ख्रिस्‍ती चर्च बांधण्‍याचा मान सुद्धा मिळाला आहे. विविध धर्मातील लोक बांदेलमधील या ऐतिहासिक चर्चला भेट देतात. बांदेल चीज हे कदाचित बंगालमधील पोर्तुगीज खाद्यप्रकाराचा शेवटचा अंश असेल.

Dutch remnants in Chinsurah

चिन्‍सुराहमधील डच अवशेष

  • डच वारसाचे अवशेष – चिन्‍सुराह हे एकेकाळी श्रीमंत डच व्‍यापार बंदर होते. ब्रिटीशांनी एडवर्ड सातच्‍या सन्‍मानार्थ क्‍लॉक टॉवर बांधले, डच दफनभूमी व सुसाना अॅना मरिना यांचे थडगे हे येथील प्रमुख आकर्षण आहेत.

Danish remnants in Serampore

श्रीरामपूरमधील डॅनिश अवशेष

  • डॅनिश उत्‍साह – १८१८ मध्‍ये बांधण्‍यात आलेले श्रीरामपूर कॉलेज त्‍याच्‍या भव्‍य दालनासह डॅनिश श्रीरामपूरच्‍या गौरवशाली दिवसांची आठवण करुन देतो. श्रीरामपूरमध्‍ये दोन दफनभूमी आहेत, ज्‍या डॅनिश काळाची आठवण करुन देतात.

Chandannagore strand

फ्रान्‍सचा भाग – चंदननगरमध्‍ये आजही फ्रेंच वारसा सामावलेला आहे आणि येथील अनेक शाळा आजही तिसरी भाषा म्‍हणून फ्रेंचचे ज्ञान देतात. शहरामध्‍ये नंदादुलाल टेम्‍पलसह विविध मंदिरांचा भरणा आहे. हुगळी काठी असलेल्‍या वसाहती इमारती आजही सर्वात सुंदर विस्‍तारीकरण मानल्‍या जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here