गर्भावस्थेत ट्रेनने प्रवास करणे कितपत सुरक्षित आहे?

0
1439

गर्भावस्थेत प्रवास करणे टाळणे उत्तम असते, कारण फार काळापर्यंत एकाच ठिकाणी बसून राहण्याच्या असुविधेचा सामना करावा लागतो. तथापि, जीवनात सर्व काही मनाजोगे होत नाही. आजच्या गतिमान जगात गर्भवती महिलांसाठी प्रवास टाळणे अशक्य ठरू शकते. जरी आपल्याला गर्भावस्थेदरम्यान ट्रेनमधील प्रवासाविषयी वारंवार प्रश्न विचारले जात असले, तरी देखील आपल्याला यापासून एक चांगले सूचक मिळते. त्यामुळे एकनिष्ठ अशा रेल्वे प्रवाशांनी केलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देण्याचे आम्ही ठरविले आहे.

गर्भावस्थेत ट्रेनने प्रवास करणे कितपत सुरक्षित आहे?
कोणत्याही गर्भवती महिलेसाठी ट्रेनचा प्रवास सर्वाधिक सुरक्षित मार्ग असतो. रस्त्यावरील प्रवासात रस्त्यात उंचवटे असतात, अचानक वळणे असतात आणि अचानक थांबल्यामुळे पुढे ढकलले जाते (ब्रेक्स लावल्यामुळे). काही एअरलाईन्स गर्भवती महिलांना प्रवासाची अनुमती देत नाहीत (स्वास्थ्याच्या समस्येमुळे). त्यामुळे, त्यांच्या सुविधाजनक गतीमुळे माता आणि बाळ दोघांसाठी उत्तम असते. तथापि, प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करणे अत्यावश्यक असेल.

मी कोणत्या श्रेणीचा पर्याय स्वीकारावा?

Train travel during pregnancy
गर्भावस्थेतील नंतरचे टप्पे (6 महिन्यानंतर), हिसके बसणे किंवा अचानक हालचाल माता आणि गर्भाच्या आरोग्यासाठी चांगले नसते. तसेच, आरामासाठी आईला भरपूर जागा लागते. त्यामुळे अशा प्रवासासाठी एसी 3 किंवा 2 टियर कोच अचूक पर्याय ठरतात. त्यामुळे, एखाद्या गर्भवती महिलेसोबत प्रवास करताना प्रवासाच्या तारखेच्या बऱ्याच अगोदर योजना करण्याची गरज असते. तुम्ही केवळ खालचा बर्थ घेण्याची खात्री करा, जेणेकरून गर्भवती महिलेला वर चढावे लागणार नाही.

प्रवासादरम्यान मी कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात?
एखाद्या प्रवासात जड सामान उचलणे एक विशेष कटकट असते. परंतु, कोणत्याही प्रकारचे सामान उचलण्यापासून किंवा वाहून नेण्यापासून गर्भवती महिलेला रोखले पाहिजे. अखेरच्या क्षणी गोंधळ टाळण्यासाठी स्टेशनवर पुरेसे वेळ आगाऊ पोहोचण्याची खात्री करा. मातेने प्रत्येक पायरी काळजीपूर्वक चढली आणि उतरली पाहिजे, खास करून गर्दी असलेल्या स्टेशन्सवर. तसेच, माता अधिक झुकणार नाही याची देखील काळजी घ्या. जास्त झुकल्याने पोटावर दाब पडतो, जो बाळासाठी चांगला नसतो.

प्रवासात मी कोणता आहार घ्यावा?

Tips-to-travel-during-Pregnancy_3
एखाद्या प्रवासासाठी अचूक आहार गरजेचा असतो. कितीही घ्यावेसे वाटले तरी देखील, रेल्वे स्टॉल्स किंवा फेरीवाल्यांकडून खाणे घेऊ नका. नेहमी चांगला आहार पुरविणाऱ्याकडे आहार बुक करा आणि कमी मसालेदार आणि घरगुती आहाराची मागणी करा. तुम्हाला फारच भूक लागली, तर काही फळे खा (ते अगोदरपासून कापून ठेवलेले नसतील याची खात्री करा). स्वतःला सजलीत ठेवण्यासाठी पॅकेज्ड पाण्याच्या बाटल्या खरेदी करा आणि सोबत ठेवा.

गर्भावस्थेत एकटे प्रवास करणे मी का टाळावे?
गर्भावस्थेतील उत्तरार्ध काळ अतिशय अवघड असतो आणि आरोग्याच्या अनेक समस्या अचानक उद्भवू शकतात. अशा वेळी तुमच्याबरोबर नेहमी एखादा जोडीदार असणे अत्यावश्यक असते. सामान उचलण्यापासून तुम्हाला वॉशरूमपर्यंत नेण्यासाठी एखाद्या जोडीदारावर तुम्हाला अवलंबून राहावे लागेल. अशा प्रवासात पुरेशी विश्रांती घेण्याची आणि कोणतीही कृती तुमच्या गर्भावर विपरीत परिणाम करणार नाही याची खात्री करण्याची तुमची जबाबदारी असेल.

इतर टिपा

Tips-to-travel-during-Pregnancy_4

  • मातेने आरामदायक स्थितीत बसले पाहिजे.
  • लांबचा प्रवास करताना बैठकीच्या एकाच स्थितीत फार काळ राहू नका. शक्य असेल तेव्हा आडवे पडा.
  • ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये वेळोवेळी थोड्याफार फेऱ्या मारल्या पाहिजेत. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो.
  • नेहमी जरुरी आणि लिहून दिलेली औषधे सोबत ठेवा. ती लवकर मिळू शकतील अशा रीतीने सोबतच्या बॅगेत ठेवा.

चिंतामुक्त रहा, एकदम चिंतामुक्त.
प्रवास करताना सर्व चिंता दूर ठेवा. मागे टेकून बसा आणि बाळासोबत प्रवासाचा आनंद लुटा. एखादे मधुर संगीत ऐका आणि आराम करा. प्रवासात चघळत राहण्यासाठी तुमच्या आवडीचे चॉकोलेट्स किंवा अल्पहाराचा थोडा साठा सोबत ठेवू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here