मेघालयमधील शिलॉंग हे सौंदर्य व नैसर्गिक वारसा लाभलेल्या काही स्थळांपैकी एक आहे. उंचच उंच डोंगर, खोल अरूंद द-या, त्यामधून जाणारे ढग, धबधबे यांचे विहंगमय दृश्य तुम्हाला अचंबित करेल, हरित वनराई आनंद प्रदान करेल आणि संस्कृती तुम्हाला समृद्ध करेल. नुकतेच “भारताचे लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण” म्हणून पुरस्कारप्राप्त, शिलॉंग शहराने “पूर्वेकडील स्कॉटलंड”चा वारसा जपला आहे.
या उन्हाळी सीजनमध्ये या लोकप्रिय थंड हवेच्या ठिकाणाला भेट दिल्यानंतर काही आल्हाददायी व भेट दिली पाहिजेच अशा स्थळांची माहिती पुढीलप्रमाणे:
- युमिअम तळे – बारापाणी (बिग वॉटर) म्हणून प्रसिद्ध असलेले, युमिअम तळे हे निसर्गरम्य स्थळ आहे, जे विहंगमय दृश्याचा अनुभव देते. शिलॉंगच्या उत्तरेकडे जवळपास १५ किमीच्या अंतरावरील डोंगरांमध्ये वसलेल्या, या तळ्याची निर्मिती १९६०च्या सुरूवातीला युमिअम नदीवर धरण बांधण्यातून करण्यात आली. धरण भारताच्या ईशान्य भागातील पहिल्या जलविद्युत प्रकल्पासाठी ओळखले जाते.
तळे वॉटर स्पोर्टससाठी प्रसिद्ध आहे आणि कायाकिंग, वॉटर सायकलिंग/स्कूटिंग व बोटिंग सारख्या सुविधा प्रदान करते. तळ्याच्या अवतीभोवती विशाल गवती मैदान व हिरवेगार पालवीचे आच्छादन असलेले डोंगर आहेत. प्रचंड हरित विस्तार व निळसर पाण्याचे मिश्रण अचंबित करणारे अनुभव प्रदान करते. एक रेस्टॉरण्ट आहे, जेथे स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येऊ शकतो आणि रात्रीच्या वेळेसाठी निवासाची सुद्धा सोय होऊ शकते.
- रूट ब्रिज – ढगांचा निवास असलेले शहर व पवित्र वनांची भूमी, मेघालय हे स्वच्छ व सुंदर गावे, प्रदीर्घ लेण्या, आणि नैसर्गिक रूट पूलांची सुद्धा स्थळ आहे. शिलॉंगच्या वनांमध्ये कुठेतरी पूलांची निर्मिती केली जात नाही, तर ते आपोआप तयार होतात. हे पूल जवळपास ५० माणसांचे वजन पेलू शकतात आणि पूल नैसर्गिक असल्यामुळे काळानुरूप त्यांची शक्ती विकसित होत जाते. काही रूट पूल शंभर वर्षे जुनी आहेत. द्विमजली रूट पूल हा मेघालयचा अभिमान आहे. शिलॉंगपासून ९० किमी अंतरावर असलेल्या रिवाई गाव, मोलीनॉंग येथे तुम्हाला अनेक नैसर्गिक रूट पूल पाहायला मिळू शकतात. मोलीनॉंग हे आशियामधील सर्वात स्वच्छ गाव आहे.
- गेरो हिल्सचे वन्य सौंदर्य – शिलॉंगला देण्यात येणा-या भेटीमधील प्रमुख आकर्षण म्हणजे गेरो हिल्स. जैवविविधता व वन्य सौंदर्याने संपन्न अशा, गेरो हिल्समध्ये गेरोमधून खळखळून वाहणा-या सिमसँग नदीच्या गढूळ पाण्याचा समावेश आहे आणि ही नदी बांग्लादेशमध्ये जाते, जेथे तिला सोमेस्वरी नावाने ओळखले जाते. नदीच्या काठी प्राचीन वने व शांतमय टेकड्या आहेत. पावसाळी सीजनमध्ये, ढग द-याखो- यातून वाहतात.
- मोफ्लंग पवित्र वन – स्थानिक रहिवाशांद्वारे शुभ मानले जाणारी, मोफ्लंगच्या पवित्र वनांची मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाते आणि येथे पर्यटकांची मोठी रेलचेल असते. वनस्पती व प्राणी समूहाच्या संपन्न रेंजसह, येथे अत्यंत दुर्मिळ अशा औषधी वनस्पती, रुद्राक्ष वृक्षे आणि वनराई व पाइन्स आहेत. उभे असलेले खडक व दगड असलेले एक ठिकाण आहे, जेथे स्थानिक रहिवाशी समाज व ध्यान म्हणून धार्मिक विधी करतात. वन संधारणाचे हे अनोखे व परिपूर्ण स्थळ निश्चितच पाहिले पाहिजे.
- शिलॉंग चेम्बर क्वायर – मेघालयचे अलौकिक शोध व अभिमान, शिलॉंग चेम्बर क्वायर हे मेघालयमधील शिलॉंगमध्ये स्थित आहे. २००१ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रतिभावान लोकांच्या समूहाने त्याच्या अद्भुत संगीत कौशल्यांसह फक्त भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपली छाप निर्माण केली आहे. म्हणून, जेव्हा तुम्ही शिलॉंगला भेट द्याल आणि जर तुम्हाला संधी मिळाली, तर सांस्कृतिक ऐक्याचा हा परिपूर्ण देखावा पाहायला विसरू नका.
- ल्यू डूह मार्केट (बारा बझार) – ही व्यापक बाजारपेठ ईशान्य भागामधील सर्वात रोचक स्थानीय बाजारपेठांपैकी एक आहे. हजारो खासी लोक त्यांच्या गावांमधून झुंडाच्या रूपात येथे येतात आणि आदिवासी टोपल्यांपासून, मासे पकडण्याचे जाळे व एडिबल फ्रॉग्सपर्यंत प्रत्येक गोष्टीची विक्री करतात. उत्पादन अत्यंत सेंद्रिय, ताजे असण्यासोबतच डोळ्यांकरिता पर्वणी आहेत. आरोग्यासाठी उत्तम अशा विविध रंगांच्या भाज्या आहेत. मासे विभाग तुम्हाला आकर्षून घेतो आणि मांस व चिकन क्षेत्रे सुद्धा तितकीच गजबजलेली असतात. आणि सर्वोत्तम बाब म्हणजे, या महिला-केंद्रित खासी मार्केटमधील वस्तूंच्या किंमती खूपच स्वस्त आहेत. तुम्हाला अनेक स्थानिक विक्रेते शहराच्या रस्त्यांवर लोणचे, लसूण, मसाले व मासे यांची विक्री करताना पाहायला मिळतील, ज्यामधून शहराचा अस्सल स्वाद व अंतरंग दिसून येतात.
Beautiful !!! I am a stamp collector. For me it’s a joy !!!
Thank you !!!