रेल्वे स्थानकांद्वारा भारताचे ओझरते दर्शन

1
1084

देशभरातील रेल्वे स्थानक एक ‘उत्तम भारत’ दिसण्यासाठी, त्यांची सजावट होत आहे, संस्कृतीच्या मुल्यांची पुनः परिभाषा आणि स्वच्छता होत आहे. हा बदलाचा मंत्र रेल्वे स्थानकांसाठी काम करताना दिसून येत आहे, ज्यात आजपर्यंत डोळ्यात खुपणाऱ्या गोष्टी देखील सामील आहेत.

Chennai Railway station

1. चेन्नई सेन्ट्रल रेल्वे स्थानक – थंड पडलेल्या भिंती आणि निरस सजावट आता लोकांचे स्वागत करत नाही, आणि याचे श्रेय एनआयएफटी, चेन्नईच्या विद्यार्थ्यांना जाते. या कला रचनेत तामिळनाडूचे लोक, कला, संस्कृती आणि निसर्गचित्रे यांचे विषयसंबंधी प्रतिनिधित्व सामील आहे.

Borivali station

2. बोरिवली रेल्वे स्थानक – मेक अ डिफरन्स (एमएडी) नामक एका एनजीओने 500 स्वयंसेवकांसह या रेल्वे स्थानकाला एक पूर्णपणे चैतन्यमय चेहरा दिला आहे.

Borivali station

मुंबईत बोरिवली क्षेत्राचे गुणविशेष दर्शवित, येथील सर्व गोष्टींना एक उत्साही रूपांतरण दिले आहे – थेट जिना आणि भिंतींपासून ओव्हरहेड ब्रिज आणि तिकीट काउंटरपर्यंत.

Sawai Madhopur railway station

3. सवाई माधोपुर रेल्वे स्थानक – या रेल्वे स्थानकाच्या भिंतींवर नामशेष होत असलेल्या लोककलेचा शृंगार देण्यात आला आहे. या स्थानकाला ‘टुरिझम-फ्रेंडली स्टेशन’ म्हणून देखील मान्यता मिळाली आहे.

Sawai Madhopur station

याच्या रूपांतरणाच्या प्रकल्पासाठी वर्ल्ड वाइड फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ) द्वारा निधी प्राप्त झाला असून, त्यात चित्रे, भित्तीलेख आणि मोठ्या चित्रांबरोबर वन्य जीव आणि वनराईच्या दृश्यांचा देखील समावेश आहे.

King Circle railway station

4. किंग्ज सर्कल रेल्वे स्थानक, मुंबई – एके वेळी सावलीमध्ये असणारे, किंग्ज सर्कल आता चमकदार, विस्तृत आणि रंगीत स्वरुपात दिसून येते. स्वच्छता आणि रंगकामातील 2000 पेक्षा अधिक लोकांच्या समावेशामुळे, या स्थानकावर सामाजिक संदेश देखील आढळून येतात.

Bhubaneswar railway station

5. भुवनेश्वर रेल्वे स्थानक – बकुळ फाउंडेशनच्या पुढाकाराने, या स्थानकाच्या निस्तेज भिंती आता एक रंगीत सूचितार्थ देतात. ओदिशाच्या विविध जिल्ह्याच्या समृद्ध संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 13 विभिन्न पॅनल्ससह, हे स्थानक आता ‘कला स्थानका’ सारखे दिसत आहे.

Aligarh railway station

6. अलीगड रेल्वे स्थानक – काहीशा भिन्न अशा रचनांसह हे स्थानक अतिशय रंगीत आणि आकर्षक चेहऱ्यासह दिसत आहे. या स्थानकाचा प्रत्येक भाग आधुनिक कला आणि पारंपारिक रचना यांचे संगम दर्शवित, सुंदर आणि स्वच्छ दिसते.

खरंच, असे प्रयत्न रेल्वे स्थानकांच्या सौंदर्यीकरणाच्या कल्पनेसह भारतीय शहरांच्या वारशाविषयी माहितीचा देखील प्रसार करतांना दिसून येतात.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here