मुंबईतील सर्वात जुने गणपती मंडळ

0
2447

गणपती बाप्पा मोरया! हा मंत्र महाराष्ट्रातील अनेक हृदयांमध्ये आनंदीआनंद भारून टाकतो. गणपती पूजेच्या परंपरांचा मनःपूर्वक आनंद लुटावयाचा असल्यास, तुम्हाला या शहरातील सांस्कृतिक पूजा मंडळांना भेट द्यावी लागेल. मुंबईतील सर्वात जुन्या पूजा मंडळांची आम्ही येथे यादी देत आहोत.

केशवजी नाईक चाळ, गिरगाव – 125 वर्षे

Keshavji Naik Chawl
ही शहरातील सर्वात पहिली सार्वजनिक गणपती पूजा होती, जी 1893 मध्ये सुरु झाली होती. हे मंडळ त्याच्या पर्यावरण-अनुकूल उत्सवासाठी आणि लहान गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. लाउडस्पीकर, ढोल-ताशाविनाची ही पूजा एक पारंपारिक प्रथा येथे दिसून येते. मागील 4 पिढ्यांपासून एकाच कुटुंब यथील मुर्त्या बनवित आले आहे. येथील आयोजन समिती नियमितपणे भजन कार्यक्रम, मुलांसाठी स्पर्धांचे आयोजन करीत आले आहे. या मंडळाला भेट देण्यासाठी सर्वात व्यस्त कालावधी म्हणजे सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंतचा असतो.
नजीकचे रेल्वे स्थानक: चर्नी रोड

चिंचपोकळी चिंतामणी, चिंचपोकळी – 98 वर्षे

Chinchpoklicha Chintamani
चिंचपोकळी चिंतामणी (चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ) 1920 मध्ये स्थापित झाले होते, आणि ते मुंबईतील दुसरे सर्वात गुणे गणेशोत्सव मंडळ आहे. येथील पूजा समिती गरीब आणि गरजूंना मदत करण्याबरोबरच, रक्तदान आणि नेत्रदान शिबिरांसारख्या अनेक सामाजिक कल्याण उपक्रमांसाठी समर्पित आहे. हे मुंबईतील एक सर्वाधिक विश्वसनीय आणि शिस्तबद्ध मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे.
नजीकचे रेल्वे स्थानक: चिंचपोकळी

मुंबईचा राजा, गणेश गल्ली – 90 वर्षे

Mumbaicha Raja
पेरू चाळच्या सभोवती राहणाऱ्या युवांनी 1928 मध्ये “लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ” सुरु केला होता. लोकमान्य टिळकांनी या सामाईक मंचाद्वारा सामान्य जनतेस एकत्र आणण्याच्या आणि त्यांच्यात स्वातंत्र्य लढ्याची ज्योत पेटवण्याच्या विचारांनी हा उत्सव सुरु केला होता. हा उद्देश ध्यानात ठेवूनच, 1945 मधील काही लालबाग सार्वजनिक मंडळाच्या मुर्त्यांनी सुभाष चंद्र बोस सात घोड्यांवर स्वार झाल्याचे प्रस्तुत केले होते.
नजीकचे रेल्वे स्थानक: चिंचपोकळी

लालबागचा राजा, लालबाग – 84 वर्षे

Lalbaugcha Raja
मुंबईतील एक सर्वात प्रसिद्ध आणि सर्वाधिक गर्दी खेचणारे असे सार्वजनिक गणपती मंडळ आहे, लालबागचा राजा. मूर्ती 11 दिवसांसाठी सार्वजनिक दर्शनासाठी ठेवली जाते, आणि त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या पवित्र दिवशी याचे विसर्जन करण्यात येते. येथे दोन रांगा असतात- नवसाची रांग आणि मुख दर्शनाची रांग. नवसाची रांग ही अशा लोकांसाठी असते, ज्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण करून घ्यावयाच्या असतात. या रांगेत तुम्ही त्या मंचापर्यंत जाऊन लालबागच्या राजाच्या चरणांना स्पर्श करू शकता. दुसरी रांग मुख दर्शनासाठी बनविलेली असते. म्हणजेच, मंचाकडे न जाता तुम्हाला केवळ मूर्तीचे दर्शन होते.
नजीकचे रेल्वे स्थानक: करी रोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here