तुम्ही भेट घेतलीच पाहिजे अशी 5 वाईन पर्यटनाची स्थळे

0
702

22 देशांमध्ये भारतीय वाईनच्या निर्यातीसह भारतातील वाईनचे उत्पादन हळूहळू आपले अस्तित्व सिद्ध करत आहे. काश्मीर, पंजाब, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू अगोदरपासूनच उत्कृष्ट वाईन बनवीत आहेत. बेंगलोर आणि नाशिकचे निसर्गरम्य विनयार्ड्स मुख्य वाईन पर्यटन स्थळे आहेत. वाईन टूर आणि टेस्टिंगची संकल्पना अजून भारतात नवी आहे, तथापि सुला फेस्टसारख्या कार्यक्रमांना प्रचंड गर्दी होते.

भारतातील मुख्य वाईन पर्यटन स्थळांवर एक नजर टाकूया.

Wine tours in Nashik
नाशिक: नाशिकला ‘वाईन कॅपिटल ऑफ इंडिया’ असे म्हटले जाते. येथे 30 पेक्षा अधिक वाईनरीज आहेत आणि सर्वोत्कृष्ट दर्जाचे वाईन बनविले जाते. येथील विनयार्ड्स रिसोर्ट्स देखील आहेत! त्यामुळे तुम्हाला विनयार्ड्सच्या मध्ये जागे होऊन अजस्त्र अशा सह्याद्री श्रेणीस पाहण्याची संधी मिळू शकेल. सोमा वाईन व्हिलेज विनयार्ड, सुला विनयार्ड, मोएट अँड चंदोन आणि यॉर्क विनयार्ड हे वाईन टेस्टिंग रूम्स आणि रेस्टॉरंटस यांनी सुसज्ज आहेत.

Wine tourism in Igatpuri
इगतपुरी: इगतपुरी येथील एक बुटिक व्हेलोन विनयार्ड आहे जे फ्रेंच शैलीत वाईन बनविते. श्वास रोखून लावण्यासारखे दृश्य आणि सुंदर स्थान याला सप्ताहांती सुट्यांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनविले आहे. येथे तलावाच्या समोर असलेल्या एका साऊथ एशियन रेस्टॉरंटसह एक हॉटेल देखील आहे.

Wine tourism in Baramati
बारामती: रोटी, बारामती येथील फोर सीजन्स वाईनरी पर्यटकांसाठी एक निखळ मेजवानीच आहे. पुण्याहून 100 किमी अंतरावर असलेली ही वाईनरी एका पर्वतावर वसलेली आहे आणि पाहुण्यांच्या निवासासाठी फ्रेंच शैलीतील प्रासाद आहे.

Wine tourism in Akluj
अकलूज: महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील अकलूज फ्रटेली विनयार्ड्सशी संबंधित विनयार्ड्सच्या प्रचंड विस्तारासाठी प्रसिद्ध आहे. वाईनच्या इटालियन शैलीसाठी सुपरिचित, फ्रटेलीने आपले नाव स्थापित केले आहे आणि अनेक पर्यटकांच्या मनावर आपले नाव कोरले आहे.

Wine tourism in Nandi Hills
नंदी हिल्स: आरामदायक अशा नंदी पर्वतांमध्ये वसलेले ग्रोव्हर विनयार्ड्स कर्नाटकातील वाईन उद्योगातील एक अत्यंत सुपरिचित नाव आहे. वाईनच्या फ्रेंच प्रकारासाठी परिचित असलेल्या या विनयार्डने भारतात आणि विदेशात अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.
नोंद घ्या:
मोबाईल कनेक्टीव्हिटी अत्यंत निकृष्ट आहे.
जवळपास कोणतेही औषधाचे दुकान नसल्यामुळे औषधे सोबत घेऊन जा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here