उडुपीमधील शोध न घेतलेले समुद्रकिनारे

0
1270
Beaches in south India

तुम्हाला जर समुद्रकिनारी सुट्या शांततेत घालवायची तीव्र इच्छा असेल, तर उडुपीमध्ये त्यासाठी सुरेख किनारे आहेत, जे खरोखरच निसर्गाचे चमत्कार आहेत आणि कमी पर्यटकांमुळे सौंदर्य अबाधित राखून आहेत. मग, तुम्ही कर्नाटकला भेट देण्याची योजना करीत असाल, तर या समुद्रकिनाऱ्यांना मुळीच चुकवू नका.

मालपे समुद्रकिनारा-

Beaches in south India

हा उडुपी शहरापासून सर्वात नजीक असलेला समुद्रकिनारा आहे (6 किमी अंतरात वसलेला आहे). मालपे समुद्रकिनाऱ्यावर अतिशय कमी गर्दी असते, परंतु सप्ताहांतावर पर्यटक अनेक स्थानिक कुटुंबे आणि मणिपाल विद्यापीठाच्या भरपूर विद्यार्थ्यांना पाहू शकतात. किनाऱ्याला जाण्याचा मार्ग तोंडाला पाणी सुटणाऱ्या आणि खिशाला परवडणाऱ्या स्ट्रीट फूडच्या दुकानांनी भरलेला आहे, जिथे तुम्हाला ताज्या सागरी खाद्यान्नांचा स्वाद मिळू शकतो. भरपूर प्रमाणातील दर्जेदार रेस्टोरंट्स असलेल्या मालपेला भेट देणे खवैय्यांसाठी एक पदार्थांसाठी सहलीचा प्रवास ठरू शकतो. किनाऱ्यालगत सर्वत्र पर्यटकांना बसण्यासाठी आणि थंडगार वाऱ्याच्या झुळूकाचा आनंद लुटण्यासाठी बेंचीस लावलेले आहेत. पण तुम्हाला खरोखरच शिथिल व्हायचे असेल, तर तुम्हाला मनुष्य-निर्मित वाळूने बनविलेल्या लहान झोपड्या बुक कराव्या लागतील.

सेंट मेरीज आयलंड- 

Beaches in south India

मालपेच्या किनाऱ्यावर वसलेले हे सेंट मेरीज आयलंड हा अरबी समुद्रातील चार लहान बेटांचा एक संच आहे. मालपे किनाऱ्यापासून या बेटांवर नियमितपणे फेरीसेवा उपलब्ध असते. या फेरीज सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालतात. ही 7 किलोमीटर लांबीची फेरी राईड तुम्हाला 100 रुपयांना पडेल. ही बेटे त्यांच्या स्तंभाकार बसाल्टिक लावारसाच्या विशिष्ट भौगोलिक निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. ही बेटे प्रचंड खडकांच्या घडणासह नारळाच्या झाडांनी भरलेली असल्याने शोध मोहिमांसाठी अत्यंत उचित जागा बनली आहे.

कौप समुद्रकिनारा-

Beaches in south India

कौप हे पर्यटकांना फारसे माहित नसलेली स्वर्गतुल्य जागा आहे, पण त्या भागातील स्थानिक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लोकप्रिय आहे. हा निःशब्द किनारा उडुपी शहरापासून सुमारे 12 किमी अंतरावर वसलेला आहे. हा उडुपी आणि मंगळूर दरम्यानच्या मार्गावर, एनएच-66 (अगोदरचा एनएच-17) च्या बाजूला आहे. मालपेच्या तुलनेत येथील समुद्र काहीसा खवळलेला असतो. येथे खडकाळ किनारा आहे आणि भरतीदरम्यान पाण्यात जाऊन कोणतेही धाडस करण्याचा सल्ला दिला जात नाही. या किनाऱ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सण 1901 मध्ये बांधलेला दीपगृह आहे. तेव्हापासून आजवर तो खंबीरपणे उभा आहे. हा दीपगृह सुमारे 89 फूट उंच आहे आणि जर तुम्ही याच्या पायऱ्या चढून वरपर्यंत जाऊ शकला, तर तुम्ही सभोवतालच्या नयनरम्य दृश्याने संमोहित होऊन जाल. सभोतालाची दाट हिरवळ आणि नारळाच्या झाडांच्या रांगा छायाचित्रकारासाठी मेजवानीच असेल. किनाऱ्यालगत कॉंक्रीटचे बेंचीस ठेवलेले आहेत ज्यावर बसून समुद्राच्या धीरगंभीर ध्वनीचा आणि किनाऱ्याला आदळणाऱ्या लाटांच्या मनोहर दृश्याचा आनंद घेऊ शकता.

नजीकचे रेल्वे-स्थानक: उडुपी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here