ईशान्य भारतातील 6 वन्यजीवन अभयारण्ये

0
2593

निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ईशान्य भारतातील जनजीवन अतिशय साधे आणि अनोख्या परंपरांचे पालन करणारे असून पर्यटकांसाठी हा परिसर एखाद्या खजिन्यासारखा आहे. ईशान्य भारतात एकूण 63 राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्ये आहेत.

त्यातील काही वन्यजीव अभयारण्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे –

Keibul Lamjao

कैबूल लमाजो राष्ट्रीय उद्यान, मणीपूर – मणीपूरच्या बिशनपूर जिल्ह्यात लोकताक तळ्यावर वसलेले हे तरंगते उद्यान आहे. या उद्यानात मैना, चंडोल असे सुंदर पक्षी हायला मिळतात. हे ठिकाम इंफाळ आणि गुवाहाटीपासून जवळ आहे.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ – डिसेंबर ते एप्रिल

Pobitora Wildlife

पोबितारा वन्यजीव अभयारण्य, आसाम – आसामच्या मोरिगाव जिल्ह्यात, गुवाहाटीपासून 30 किमी अंतरावर वसलेल्या पोबितारा अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर एकशिंगी गेंडे पाहायला मिळतात. त्याशिवाय इथे हरणे, चित्ते, जंगली अस्वल आणि जंगली म्हैसही पाहायला मिळते.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ– फेब्रुवारी ते मे

Balphakram National Park

बालफाख्रम राष्ट्रीय उद्यान, मेघालय – मार्बल्ड कॅट्स, लाल पांडा, वाघ, बार्किंग हरीण, जंगली म्हैस इत्यादी प्राणी पाहायला मिळतात. हे ठिकाण राज्याची राजधानी शिलाँगपासून जवळ आहे.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ– फेब्रुवारी ते जून

Phawngpui

फॉन्गपुई राष्ट्रीय उद्यान, मिझोराम – बर्मापासून जवळ मिझोरामच्या ब्लू माउंटन नावाच्या परिसरा वसलेले फॉन्गपुई ऐझ्वालपासून 300 किमी अंतरावर आहे. चित्ते, सेरो, पहाडी शेळी, लंगूर आणि एशियाटिक काळे अस्वल, पक्ष्यांच्या दुर्मीळ जाती येथे पाहायला मिळतात. सिलचर रेल्वे स्थानकापासून हे उद्यान जवळ आहे.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ – नोव्हेंबर ते एप्रिल

Ntangki National Park

नात्गंकी राष्ट्रीय उद्यान, नागालँड – नागालँडच्या पेर्णे जिल्ह्यात हे ठिकाण वसलेले आहे. येथून सर्वात जवळचे स्थानक म्हणजे दिमापूर रेल्वे स्थानक. या उद्यानात दुर्मीळ हॉलॉक गिबन माकडे, सोनेरी लंगूर, धनेश पक्षी, सुस्त अस्वले, मॉनिटर लिझार्ड, काळा करकोचा असे पक्षी- प्राणी पाहायला मिळतात.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ – नोव्हेंबर ते मार्च

Trishna Wildlife

तृष्णा वन्यजीव अभयारण्य, त्रिपुरा – झाडांच्या दुर्मीळ जाती, हरणे, हॉलॉक गिबन, सोनेरी लंगूर, कॅप्ड लंगूर आणि तितर पक्षी इथे पाहायला मिळतात.