अस्सल महाराष्ट्रीयन थालीसाठी मुंबईत कुठे जायचे

0
650

एकदा, कॅलरीज मोजायचे थांबवा आणि तळलेल्या आणि वाफविलेल्या अल्पाहाराच्या विभिन्न प्रकारांना चाखून पहा आणि गोड पदार्थांचा आस्वाद घ्या. मुंबईत अस्सल महाराष्ट्रीयन थाळी देणाऱ्या काही हॉटेल्सवर येथे नजर टाकण्यात आली आहे.

चेतना रेस्टॉरंट

Chetana Restaurant
काला घोडानजीक असलेले हे एक आयटीडीसीद्वारा मान्यताप्राप्त रेस्टॉरंट आहे, जे 1946 मध्ये एक सँडविच/कॉफी कॉर्नर म्हणून सुरु झाले आणि आता 80 लोक बसू शकतील असे भोजनालय झाले आहे. अस्सल शाकाहारी गुजराती, राजस्थानी आणि महाराष्ट्रीयन पाककृती येथील वैशिष्ट्ये आहेत.

थाळीमधील पदार्थ
ताजे ताक/भाजलेल्या जीरांपासून बनविलेले मसालेदार पाणी प्या.
2 भाज्या
1 कडधान्यांच्या डाळीची वाटी
निवडीनुसार भारतीय पोळ्या (बाजरीची भाकरी/भाकरी/फुलका)
कढी: दह्यामध्ये बनविलेला मसालेदार-गोड रस्सा
आमटी
भात
खिचडी: भात आणि कडधान्यांचे पौष्टिक मिश्रण
सलाड/चटणी/लोणचे
त्या दिवसाच्या मिठाईच्या मेनुंमधून एक निवडा
विशेषता: भरलेली वांगी, वाळाचे बर्डे, पुरणपोळी, उकडीचे मोदक आणि गुलाब जामून
पत्ता: 34, के. दुबाश मार्ग, काला घोडा, मुंबई

सुजाता उपहार गृह

Sujata Uphar Griha
सुजाता उपहार गृह हे विख्यात उपहारगृह अगोदर बी. तांबे या नावाने प्रसिद्ध होते, जिथे गिरगावमधील बहुतेक महाराष्ट्रीयन लोक लज्जतदार मेनूचा स्वाद घेण्यासाठी हटकून जातात.

थाळीमधील पदार्थ
2 भाज्या: रोजच्या विशेष पदार्थांमध्ये वांगे, सुकी भाजी, डाळिंबी (फरसबी घालून बनविलेली किंचित गोड अशी नारळ असलेली आमटी), काजू मटर, झुणका (भाकरीसह वाढला जाणारा चण्याच्या पीठाने किंवा बेसनने बनविलेला एक मसालेदार पदार्थ)
भात
2 पोळ्या
आमटी: मसालेदार, गोड आणि आंबट असा डाळ असलेला पदार्थ
पापड
दही
विशेषता: आमटी, डाळिंबी, हिरव्या वाटण्याची उसळ, झुणका
पत्ता: 277. मॅप्ला महल, जेएसएस रोड, गिरगाव, ठाकूरद्वार

मामा काणे’ज स्वच्छ उपहारगृह

Mama Kane's
या यादीतील पुढील ठिकाण आहे मामा काणे’ज स्वच्छ उपहारगृह, जे आता 106 वर्षांचे झाले आहे. ते दादर पश्चिममध्ये ठीक स्टेशनच्या समोर आहे.

थाळीमधील पदार्थ
राईस प्लेट
डाळ
2 भाज्या (सामान्यपणे एक सुकी भाजी आणि एक रश्यासहित)
5 पुऱ्या / 2 पोळ्या
ताक किंवा कढी
लोणचे / चटणी
पापड
लिंबाची काप
विशेषता: थालिपीठ, मिसळ, बटाटा, कोकम सरबत आणि पियुष
पत्ता: 222, स्मृति कुंज, सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम

मी मराठी

Mee Marathi
मी मराठीच्या दोन शाखा आहेत – एक बोरिवली पश्चिममध्ये आणि दुसरी विले पार्ले पूर्वेस आहे. अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ चाखावयाचे असतील तर या जागी भेट देणे अनिवार्य आहे.

थाळीमधील पदार्थ
2 भाज्या
मसाला डाळ
दही / रायता
भाकरी
भात
पत्ता – शॉप नं. 5, अल्फा अपार्टमेंट, श्री पार्लेश्वर रोड, विले पार्ले पूर्व
पत्ता – शॉप नं. 7, विराजदीप अपार्टमेंट, चंदावरकर रोड, बोरिवली पश्चिम

दिवा महाराष्ट्राचा

Diva Maharashtracha
दिवा महाराष्ट्राचा, माहीम आणि अंधेरी पश्चिम येथे दोन शाखा असून, हे जगातील पहिले आयएसओ आणि एमटीडीसीद्वारा प्रमाणित रेस्टोबार म्हणून प्रसिद्ध आहे.

थाळीमधील पदार्थ
कोकम सरबत / पन्हे स्वागत पेय
स्टार्टर्स निवडीनुसार, ज्यात वाटणा बटाटा पटिस/काजू कोथिंबीर वडी/मिश्र भाजी काजू रोल/अळू वडी/पनीर करंजी असतील.
2 सुक्या भाज्या (फरसबी सुकी भाजी, मुगाची सुकी भाजी, बटाटा सुकी भाजी, हिरव्या वाटण्याची सुकी भाजी, कोबीची सुकी भाजी, भरलेली वांगी/पनीर आणि हिरव्या वाटाण्याचे शागोती/हिरव्या वाटाण्याची उसळ/कॉलिफ्लॉवर वाटाणा बटाटा पातळ भाजी)
1 मुख्य थाळी (मसालेदार मिश्र उसळ/व्हेज कोल्हापुरी/पतोडी/पनीर कोल्हापुरी/मिक्स व्हेज आंबट)
डाळ (साधे वरण/आंबट गोड वरण/डाळ मेथी वरण/खोबरे जिरे वरण)
भाताची निवड (भात/मटर पुलाव/मसाला भात/व्हेज पुलाव/जीरा राईस)
मिठाई (शेवयाची खीर/आईसक्रीम/पुरणपोळी/दुधी हलवा/खर्वा)
विशेषता: मसाला भात, पुरणपोळी, दुधी हलवा
पत्ता – टी.एच. कटारिया मार्ग, शिवाजी पार्क, माहीम (गोवा पोर्तुगीज रेस्टोरंटच्या बाजूस)
पत्ता – एसव्हीपी नगर, 4 बंगलोज, व्हर्सोव्हा टेलिफोन एक्स्चेंजजवळ, अंधेरी लोखंडवाला, अंधेरी पश्चिम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here