भारतात विस्तृत व विकसित होणारे एअरलाइन्स नेटवर्क आहे. मात्र, परिवहनाचे साधन म्हणून ट्रेन्सना अधिक प्रमाणात प्राधान्य दिले जाते आणि जर तुम्हाला ट्रेनमध्ये खिडकीजवळचे आसन मिळाले, तर तुम्हाला सुंदर सरोवर पाहण्याची संधी मिळू शकते!
ट्रेनमधून पाहता येतील अशा काही सरोवरांची यादी पुढीलप्रमाणे:
वाडेपल्ली सरोवर, वारंगल, तेलंगणा
केझीपेट जंक्शन ते वारंगल रेल्वेमार्गावर तुम्हाला डाव्या बाजूला वाडेपल्ली सरोवर पाहायला मिळू शकतो. या सरोवराजवळील सूर्यास्त खूपच सुंदर दिसतो. तुम्ही सायंकाळच्या वेळी सरोवराजवळून जात असाल, तर निसर्गरम्य दृश्यासाठी कॅमेरे तयार ठेवा!
मार्ग: सिकंदराबाद – विशाखापट्टणम
उत्तम वेळ: सायंकाळी
तिकिट खर्च: ६० रुपये
चिल्का सरोवर, गंजम, ओडिसा
चेन्नईकडून हावडाकडे प्रवास करताना भव्य चिल्का सरोवर पहायला मिळते. खल्लीकोटेया लहानशा स्टेशनातून कलिजाईकडे जाण्यासाठी ट्रेन एक छोटे वळण घेते. याच ठिकाणी चिल्का
सरोवराचे विहंगम दृश्य पहायला मिळते.
मार्ग: चेन्नई – हावडा
उत्तम वेळ – सायंकाळी लवकर
तिकिट खर्च: ५० रुपये
पाल्क स्ट्रेट, पामबन आयलँड, तामिळनाडू
पामबन बेटावरील रामेश्वरम शहराला मुख्य भारतभूमीसोबत जोडणारा पामबन पूल २ किमी लांबीचा आहे. येथे सुरक्षिततेच्या कारणामुळे ट्रेन खूपच हळू चालते. त्यामुळे प्रवाशांना समुद्र
सफरीचा आनंद घेण्याकरिता मुबलक वेळ मिळतो.
मार्ग: चेन्नई – रामेश्वरम
उत्तम वेळ: सुर्योदयाची वेळ
तिकिट खर्च: १५० रुपये
दुधसागर धबधबा, मडगाव, गोवा
बेळगाव व मडगाव दरम्यान प्रवास करत असताना, ट्रेन कास्टल रॉक स्टेशनसारख्या किल्ल्यामध्ये प्रवेश करते. येथे तुम्हाला उजव्या बाजूला अद्भुत दुधसागर धबधब्याचे
दृश्य पाहायला मिळेल. जर तुम्ही पावसाळ्यादरम्यान (जून-जुलै) प्रवास करत असाल, तर तुम्हाला धबधब्याचे सर्वोत्तम दृश्य पाहायला मिळेल!
मार्ग: बेळगाव – मडगाव
उत्तम वेळ: सुर्योदयाच्या वेळी
तिकिट खर्च: १५० रुपये
गंगा‚ वाराणसी‚ उत्तर प्रदेश
तुम्ही मुघल सराईकडून वाराणसीकडे प्रवास करत असाल, तर तुम्हाला डफरिन ब्रिज (सध्या हा पूल मालविया ब्रिज म्हणून ओळखला जातो.) पाहायला मिळेल. या २ किमी लांबीच्या पुलावरून ट्रेन जाताना वाराणसी शहर व तेथील पवित्र घाटांचे विहंगमय दृश्य पाहायला मिळते.
मार्ग: नवी दिल्ली – पटणा
उत्तम वेळ: सकाळी
तिकिट खर्च: १५० रुपये