डाकिया डाक लाया – भारताचे असामान्‍य पोस्‍टल अफेअर!

0
1675

स्‍वातंत्र्यापूर्वी देशात स्थापन झालेल्या विशिष्‍ट पोस्‍टल प्रणालींचा भाग म्‍हणू आज आपल्‍या देशामध्‍ये जगातील सर्वात मोठे पोस्टल नेटवर्क आहे. पण, हे कौतुक इथेच थांबत नाही. भारतातील पोस्ट-ऑफिसेससंदर्भातील असामान्य बाबींची खूपच मोठी आहे.

  • भारताचे पहिले फ्लोटिंग पोस्‍ट ऑफिस!

दल सरोवर, जम्मू व काश्मीर

Floating Post Office - Dal Lake, Srinagar

जम्मू व काश्मीरमधील श्रीनगरच्या खास आकर्षणांपैकी एक म्हणजे, दल सरोवर. हे सरोवर त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. या सरोवराच्या वैशिष्ट्यांपैकी आणखी एक शिरोमणी म्हणजे हेच भारताचे पहिले फ्लोटिंग पोस्ट ऑफिस आहे! हे परंपरागत पोस्ट ऑफिस पूर्वी नेहरू पार्क पोस्ट ऑफिस म्हणून ओळखले जात होते. २०११ मध्ये त्याचे नाव बदलण्यात आले.

मोठ्या हाऊसबोटमधील या पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टाच्या तिकिटांचे संग्रफालय आहे. यात राज्याच्या डाक विभागाचा इतिसाह पोस्टाच्या तिकिटांमधून उलगडतो. इथे एक दुकानही आहे. त्यात पोस्टाचे स्टॅम्प आणि पिक्चर पोस्टकार्डस्, ग्रीटिंग कार्डस्, स्‍थानिक वस्‍तू, स्‍टेशनरी, काश्‍मीरवरील विविध पुस्‍तके अशा अनेक वस्तूंची विक्री केली जाते. फ्लोटिंग पोस्‍ट ऑफिसमधून पोस्‍ट करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक वस्‍तूवर वापरण्‍यात येणारे सील अनोखे आहे. यावर दिनांक व पत्त्याबरोबरच दाल सरोवरामध्‍ये शिकारा वाहून नेणाऱ्या बोटमनचे डिझाइन आहे.

Floating Post Office

  • जगातील सर्वात उंचीवर असलेले पोस्‍ट ऑफिस

हिक्किम, हिमाचल प्रदेश

Hikkim Post Office

१५,५०० फूट उंचीवर असलेले हिक्किमचे पोस्‍ट ऑफिस हे जगातील सर्वात उंचीवर असलेले पोस्‍ट-ऑफिस आहे. ५ नोव्‍हेंबर १९८३ रोजी हे पोस्‍ट ऑफिस सुरू झाले आणि तेव्‍हापासून रिंचेन शेरिंग हे शाखा पोस्‍टमास्‍तर आहेत. हिक्किम हे हिमाचल प्रदेशाचे लाहौल व स्पिटी जिल्‍ह्यामधील गाव आहे. हिमवृष्‍टीमुळे हे पोस्‍ट ऑफिस वर्षातून सहा महिने बंद राहते.

Hikkim Post Office

जवळपासच्या मठांमधील भिक्‍खूंना विदेशी तीर्थयात्रेसाठी आवश्यक पासपोर्टही याच पोस्ट ऑफिसमधून मिळतात. येथे स्‍थानिक शेतक-यांची बचत खाती आहेत आणि जिज्ञासू पर्यटक येथे पोस्‍टकार्डस् पाठविण्‍यासाठी येतात.

  • भारताबाहेरील भारतीय पोस्‍ट ऑफिस

दक्षिण गंगोत्री पीओ, अंटार्क्टिका

dAKSHIN-gANGOTRI-po1 (1)

अंटार्क्टिकाच्या दक्षिणी महाद्विपाकडील तिसऱ्या भारतीय मोहिमेदरम्यान २४ फेब्रुवारी, १९८४ रोजी हे पोस्ट ऑफिस सुरू झाले. हे पोस्ट ऑफिस म्हणजे मल्टिपल सपोर्ट सिस्टम आहे. या पोस्ट ऑफिसमध्ये आईस-मेल्टिं प्लांट, प्रयोगशाळा, स्टोरेज व मनोरंनाच्या सुविधा उपलबध आहेत.

काही काळातच म्ह्णजे २६ जानेवारी १९८८ रोजी दक्षिण गंगोत्री पीओ गोवा येथील पोस्ट विभागांतर्गत स्थापन करण्यात आले. १९८७ मध्ये सातव्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेचे सदस्य म्हणून अंटार्क्टिकाला गेलेले, वैज्ञानिक जी. सुधाकर राव हे पोस्ट ऑफिसचे पहिले मानद पोस्टमास्तर बनले. पण, १९९० मध्ये अंटार्क्टिकामधील दक्षिण गंगोत्री पीओचा अर्धा भाग बर्फाखाली गेल्यामुळे ते पोस्ट ऑफिस संपुष्टात आले.

Dakshin Gangotri PO

अंटार्क्टिकाच्या बर्फात पुरल्या गेलेल्या पोस्ट ऑफिस इमारतीच्या स्मरणार्थ हे स्टॅम्प प्रसिद्ध करण्यात आले.

आपल्या देशातील लोक संपन्न संस्कृतीने नटलेले आहेत. देशाच्या प्रत्येक कानाकोप-यात अनेक अद्भुत ठिकाणे आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश या मानासह, भारत उगवत्या ता-याप्रमाणे आपली चमक दाखवित आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here