बीर बिलिंग: फक्‍त पॅराग्‍लाईडिंगच नाही!

0
1354

बर्फाच्‍छादित धौलाधार पर्वतरांगांमध्‍ये स्थित, बीर बिलिंग हे हिमाचल प्रदेशाच्‍या रत्‍नांपैकी एक आहे, जे जगातील दुसरे सर्वात उंच जम्पिंग स्‍पॉट असण्‍यासाठी ओळखले जाते. या सुंदर व विलक्षण शहराचे खास आकर्षण आहे पॅराग्‍लाईडिंग. पण, बीरमध्‍ये पाहण्‍यासारखे आणि करण्‍यासारखे बरेच काही आहे.

बौद्ध क्षेत्र

Bir Buddhist Monastery

बीरमध्‍ये बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणात दिसून येतो. सुंदर मठ व स्‍तूप हे पवित्र स्‍थळ आहेत, जे या स्‍थानाच्‍या सौंदर्यतेमध्‍ये अधिक भर करतात. शहरामध्‍ये तिबेटी निर्वासित नागरिकांची मोठी वसाहत आहे, ज्‍याला स्‍थानिक लोक कॉलनी म्‍हणतात.

  • ड्रायकुंब डोझिन ठेक्‍चो लिंग मठ
  • पलयुल चोखोर्लिंग मठ
  • डीअर पार्क इन्स्टिट्यूट
  • तिबेटी हँडीक्राफ्ट्स सेंटर
  • ट्रेकिंग ट्रेल

ट्रेकिंग ट्रेल

Bir Trekking Trails

बीर बिलिंगच्‍या प्रत्‍येक कोप-यामध्‍ये लहान-लहान ट्रेक्‍स व ट्रेल्‍स दिसून येतात. बीरमधील ट्रेकिंग ट्रेल्‍स उंच डोंगर व अरुंद बर्फाच्‍छादित ट्रेल्‍समधून जातात. पर्यटक बीरच्‍या शांतपूर्ण व सौंदर्यपूर्ण वातावरणाचा आनंद घेतात.

  • प्रसिद्ध ट्रेल्‍स: बीर हे ट्रेक्‍सचे आरंभस्‍थळ आहे, जे बारा बंगाल, घोर्णाला व लडाख प्रांताच्‍या जांस्‍कर घाटीपर्यंत पोहोचते. या प्रांतामधील इतर लहान व लांब ट्रेक्‍स हनुमानगड, चंबा घाटी, बरोट घाटी आणि राज गुंडाच्‍या सुंदर गावापर्यंत पोहोचतात.
  • शॉर्ट हाईक्‍स: शॉर्ट हाईक्‍स तुम्‍हाला चोगनच्‍या चहाच्‍या मळ्यांमध्‍ये घेऊन जाते किंवा आसपासच्‍या परिसरामधील सुंदर, लहान खेड्यांमध्‍ये लहानसा फेरफटका मारण्‍यास घेऊन जाते.
  • ततानी ट्रेक: या घाटीमधील आणखी एक उत्‍तम ट्रेक म्‍हणजे ततानी. इतर स्‍थळांपेक्षा (बारा बंगाल व्‍यतिरिक्‍त) या स्‍थळाला अधिक मागणी आहे, कारण ग्रेडियन्‍ट खूपच घसरट आहे आणि ट्रेकची लांबी ६ किमीपेक्षा कमी नाही. ट्रेकची सुरूवात हायड्रो प्रकल्‍पापासून होते आणि शेवट ततानीच्‍या गरम पाण्‍याच्‍या झ-यांमध्‍ये होतो.

प्राचीन गावे

Villages of Bir

घनदाट गुंडा वनाच्‍या (बीरपासून १६ ते १७ किमी अंतर दूर) मध्‍यभागी वसलेले राज गुंडा व कुलर गुंडा ही सुंदर गावांची जोडी शहरातील दररोजच्‍या रेटोरटी व घाईत असलेल्‍या जीवनापासून दूर आहे. उत्‍साही पर्यटक या गावांमध्‍ये २ ते ३ दिवस ट्रेक करू शकतात. घाटीचे दृश्‍य खूपच विहंगम असून येथील वन्‍यजीवन सुद्धा सुंदर आहे.

रात्रीच्‍या चांदण्‍याखाली कॅम्पिंग

Camping in Bir

बीरचे हरित उतार हे रात्रीच्‍यावेळी चांदण्‍याखाली कॅम्‍प करण्‍याची इच्‍छा असणा-या लोकांसाठी अगदी परिपूर्ण असे स्‍वर्ग आहे. हरित गवताचा थर असलेल्‍या सपाट जागेवर कॅम्‍प उभारण्‍याकरिता ५ मिनीटांपेक्षा अधिक वेळ लागत नाही. शेकोटीभोवती जाम सत्राचे आयोजन करण्‍याची इच्‍छा आहे का, तर हे ठिकाण त्‍याकरिता अगदी परिपूर्ण आहे!

सनसेट स्‍पॉट

Bir Sunset Point

सनसेट स्‍पॉटने त्‍याच्‍या दृश्‍यासह अनेक पर्यटकांना अचंबित केले आहे. २,४०० मीटर उंचीवर स्थित, लोकप्रिय पॅराग्‍लाईडिंग साइट जमिनीपासून अनेक हजारो फूट उंचीवर आहे, जेथे कांग्रा घाटीमधील सनसेट पॉइन्‍ट आहे. जर तुम्‍ही रात्रभर कॅम्‍पसाठी आला असाल, तर भल्‍या पहाटे डोंगरामधून उगवता सूर्य पाहण्‍याची सुरेख संधी तुम्‍हाला मिळेल.

बीरला कसे यावे?

  • रेल्‍वे: बीरपासून ५ किमी अंतरावर असलेले अहजू (कांग्रा मार्गे पठाणकोट व जोगिंदर नगर दरम्‍यान चालवल्‍या जाणा-या रेल्‍वेमार्गावरील स्‍थान) येथे जवळचे रेल्‍वे स्‍थानक आहे.
  • रस्‍ता: रस्‍तामार्गे बीरला पोहोचण्‍याकरिता एनएच२० वरून बीर रोडकडे वळण घ्‍या. ते साधारणपणे बाजीनाथ व जोगिंदर नगर यांच्‍यादरम्‍यान आहे.

 

Originally written by Yashpal Sharma. Read here.