अस्सल राजस्थानी जेवणाची चव घेण्यासाठी या ५ ठिकाणांना भेट द्या

0
754

जयपूरला जाऊन अस्सल राजस्थानी जेवणाची चव चाखली नाहीत तर तुमची भेट पूर्ण झाली, असं नाही म्हणता येणार. राजस्थानी पदार्थांच्या अनोख्या चवी आणि स्वादामुळे खाद्यप्रेमींना स्वर्गीय अनुभव मिळतो! म्हणूनच, पुढच्या वेळी जयपूरला गेलात की या प्रसिद्ध खाण्याच्या ठिकाणांना भेट द्या आणि काही अस्सल राजस्थानी पदार्थांचा आस्वाद घ्या.

Rawat Mishtan Bhandar

रावत मिष्टान्न भंडार

हे ठिकाण त्यांच्या कांदा आणि दाल कचोरीसाठी प्रसिद्ध आहे. रावत मिष्टान्न भंडारमध्ये दररोज साधारण १०,००० हून अधिक कचोर्‍या विकल्या जातात. त्यांची कांदा कचोरी तर पर्यटकांमध्ये फारच लोकप्रिय आहे. जयपूर रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडपासून हे दुकान अगदी जवळ आहे.

पत्ता : पोलोव्हिक्टरी सिनेमाच्या समोर, स्टेशन रोड, सिंधी कँप

1135 AD

११३५ एडी

या ठिकाणी तुम्हाला सर्वाधिक लोकप्रिय आणि अस्सल राजस्थानी पदार्थ मिळतील. अंबर फोर्टमधील हे दुकान जयपूर शहरापासून ११ किमी. अंतरावर आहे. इथे गेलात तर लाल मास, पनीर आफ्ताब, सुला बिर्यानी आणि जंगली मासची चव नक्की घ्या.

पत्ता : २रा मजला, जलेब चौक, शीला माता मंदिर, अमेर पॅलेस, अमेर.

Tapri Central

टपरी सेंट्रल

पारंपरिक खाद्यपदार्थांना फ्युजन पद्धतीने सर्व्ह करणं, ही टपरी सेंट्रलची खासियत आहे. त्यांचे चीज पुचका, पेस्तो खाकरा पिझ्झा, इश्पेविअल वडा पाव हे पदार्थ फारच लोकप्रिय आहे. त्यांच्याकडे अनेक प्रकारचे चहाही मिळतात. ते चुकवून अजिबातच चालणार नाही.

पत्ता : बी४ ई, ३रा मजला, सुराना ज्वेलर्स, सेंट्रल पार्कसमोर, पृथ्वीराज रोड, सी स्कीम.

Chokhi Dhani

चोखी धानी

चोखी धानी हे मोकळ्या आकाशाखाली चालवलं जाणारं रेस्तरॉं आहे. इथे तुम्हाला भारतातील गावांचा एक रांगडा अनुभव घेता येईल. शुद्ध तुपासोबत दाल बाटी चूरमा असं सगळं एकाच भांड्यात वाढल्या जाणार्‍या पदार्थापासून अनेक उत्कृष्ट पारंपरिक राजस्थानी पदार्थ इथे मिळतात. जेवणासोबतच इथे घोडेस्वारी, चक्रव्यूह, लोकनृत्य आणि लाइव्ह पपेट शोसुद्धा पाहता येईल.

पत्ता : चोखी धानी व्हिलेज, १२ माईल्स टॉंक रोड, व्हाया वाटिका.

Spice Court

स्पाइस कोर्ट

राजस्थानी खाद्यसंस्कृतीतील काही चमचमीत आणि मसालेदार पदार्थ इथे चाखता येतील. त्यांच्याकडे दाल बाटी चुरमाचा त्यांनी खास बनवलेला ‘खिमा बाटी’ हा प्रकार मिळतो (यात मसालेदार खिमा भरलेले चार बॉल्स असतात). त्यांच्याकडे मिळणारं जंगली मासही एकदा चाखायला हवंच.

पत्ता : हरी भवन, ऍक्रोल हाऊस, जेकब रोड, सिव्हिल लाइन्स.

या सगळ्या ठिकाणी खाण्याची मजा घेत असताना आस्थेची ऊब असणार्‍या राजस्थानी पाहुणचाराकडेही लक्ष असू द्या. ‘पधारो म्हारे देस’!

 

Originally written by Puneet Sharma. Read here.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here