परिणामकारक स्वच्छता राखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे:

0
1608
Marathi food blog

आपल्या भागीदार रेस्टोरंटससह रेलयात्री ट्रेनवर आरोग्यदायक आहार पुरविण्याचे वचन देते. त्यांनी स्वयंपाकघरात स्वच्छतेची मानके राखण्यासाठी पालन करावयाची एक स्वच्छतेची तपासणी सूची बनविली आहे.

साठवणूक

Marathi Blog

तुम्ही खरेदी करत असलेली उच्च गुणवत्तेची उत्पादने स्वस्त नसतात. त्यामुळे, त्यांना योग्य रीतीने साठवून ठेवल्यास तुमचा माल शुद्ध राहतो आणि आणि त्याचा जास्तीत जास्त वापर केला जाऊ शकतो.

पहिल्या मालाचा पहिला वापर: उत्पादनाची शेल्फलाइफ आणि वापराची अंतिम तारीख त्या पदार्थाची गुणवत्ता राखण्यास महत्त्वाचे असतात. माल साठविताना, सर्वात नव्या वस्तू फ्रीजच्या आत मागील बाजूस ठेवा.

सर्व गोष्टींना लेबल लावा: खाद्यपदार्थांच्या पकेजीसवरील तारखांचे कोड्स लहान अक्षरात असतात, त्यामुळे त्यांना साठवून ठेवताना त्यांच्यावर मोठ्या अक्षरात तारखा लिहून ठेवा.

मांसाची उत्पादने सर्वात खालील रकान्यात ठेवा.

पदार्थ हवाबंद डब्यांमध्ये साठवून ठेवले पाहिजेत.

कोल्ड स्टोरेज: साठविण्याचे रेफ्रिजरेटर्स 0-8 अंश सेल्सियस दरम्यान तापमान राखण्यास सक्षम असले पाहिजेत.

खाद्यपदार्थ बनविणे

स्वयंपाकघराच्या आरोग्यदायक प्रमाणांना निर्धारित करण्यामध्ये स्वच्छ खाद्यपदार्थ बनविणे एक महत्त्वाचा घटक असतो.

पदार्थ वेगळे करणे: संचय केल्यावर किंवा बनविल्यावर कच्चे आणि तयार पदार्थ वेगवेगळे ठेवा, जेणेकरून एकमेकांपासून प्रदूषित होणे टाळले जाऊ शकेल. पदार्थ बनविण्यापूर्वी त्यांना व्यवस्थित धुवून घेण्याची खात्री करा.

शिजविणे आणि गोठविणे: पदार्थ व्यवस्थित शिजवा जेणेकरून त्यातील हानिकारक जीवाणु नष्ट होतील. मटण किंवा कोंबडी शिजविण्यापूर्वी त्यांना सर्वप्रथम डिफ्रस्ट केले पाहिजेत. तुम्ही त्वरित वाढू शकता किंवा वाढेपर्यंत पदार्थ गरम असल्याचे तपासत राहू शकता. पदार्थ अगोदरच बनवायचे असतील, तर त्यांना थंड करा आणि पटकन गोठवा. 2 तासांच्या आत गोठविले गेले नाही तर ते पदार्थ फेकून द्या.

पॅकेजिंग

पॅकेजिंग एकंदर खाद्यपदार्थाच्या अनुभवाचा एक महत्त्वाचा भाग आहे

गरम आणि थंड पदार्थ वेगवेगळे ठेवा: ट्रेनमधील डिलिव्हरी स्टाफने पदार्थ योग्य तापमानावर राखण्यासाठी वेगवेगळे गरम व थंड रोधित बॅग्ज वापरले पाहिजेत.

नोंद करा: रेल यात्री अत्याधुनिक थर्मोसमधून दूध, सुप्स, चहासारख्या पेयांसाठी पॅकेजिंग पुरविते.

साईड डिशेश बाजूला ठेवा: ग्राहकांच्या पात्रांना त्यांच्या स्वतःच्या पात्रांमध्ये ठेवत गळती होण्याची शक्यता कमी करा.

नोंद करा: रेल यात्री पदार्थ ‘वाऊ मील बॉक्स’ या एका न सांडणाऱ्या पॅकमध्ये पुरविते.

कर्मचारी वर्गाची स्वच्छता:

रेस्टोरंटच्या स्वयंपाकघरातील कर्मचारी वर्गाने वैयक्तिक स्वच्छतेच्या चांगल्या प्रमाणाचे अवलंबन करणे अतिशय महत्त्वाचे असते. तसेच, स्वयंपाकघरात धुम्रपान करणे, खोकणे, शिंकणे किंवा तीव्र गंधाचा परफ्युम वापरणे टाळा. पदार्थ बनविताना हातमोजे घालायला विसरू नका.

पेस्ट कंट्रोल आणि कचऱ्याची हाताळणी

कीटक किंवा कुरतडणाऱ्या प्राण्यांना टाळण्यासाठी स्वयंपाकघराचा परिसर स्वच्छ ठेवा.

रेस्टोरंटच्या इमारतीत आणि स्वयंपाकघरात वरचेवर पेस्ट कंट्रोल करवून घ्या.

सर्व कचरा कीटकमुक्त डब्यांमध्ये गोळा केला पाहिजे.

खाद्य पदार्थाच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य व्यवस्था करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here