काही अपरिचित आरएससी तिकिटांच्या नियमांवर एक नजर

3
5597

तुम्हाला रोमांचकारी कथानक असलेल्या रहस्यमय कादंबऱ्या वाचणे आवडते काय? जर असेल, तर भारतीय रेल्वेच्या नियम आणि नियमनांच्या संदर्भात वाचताना तुम्हाला काहीशी तशीच जाणीव होईल. यात शंका नाही, की ट्रेनच्या सामान्य प्रवाशांच्या मनात हजारो प्रश्न असतील. आरएससी (रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) नियम. आरएसीच्या नियमांबद्दल सांगणारे हजारो साईट्स असले तरी देखील, अशी अनेक धूसर क्षेत्रे आहेत ज्याविषयी प्रवाशांना मुळीच माहिती नाही. रेलयात्रीमध्ये अशा काही प्रश्नांची उत्तरे देऊन आम्ही ट्रेनच्या प्रवाशांची मदत करू इच्छितो. आणि लक्षात घ्या, आम्ही यांना शक्य तितके सोपे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत.

आरएससी आरक्षणाच्या अंतर्गत एका सामान्य एक्सप्रेस ट्रेनमध्ये किती जागा आरक्षित असतात?
RAC-Quota

एका सामान्य एक्सप्रेस ट्रेनमध्ये 142 तिकिटे आरएससी आरक्षणाच्या अंतर्गत येऊ शकतात. स्पष्ट करू द्या (तुमच्या समजुतीसाठी, आपल्या संदर्भासाठी स्लीपर कोच घेऊया): सामान्यपणे कोणत्याही एक्सप्रेस ट्रेनमध्ये 12 स्लीपर कोचेस असतात. प्रत्येक 12 स्लीपर कोचमध्ये 72 सीट्स असतात, ज्यामुळे एकूण उपलब्ध जागा 864 (72X12) असतात. एका एक्सप्रेस ट्रेनमध्ये आरएससी आरक्षणाच्या अंतर्गत एकूण आरक्षित बर्थ्स 71 असतात. आता, यातील प्रत्येक बर्थ दोन लोकांमध्ये विभागून दिलेली असते, यामुळे एकूण आरएससीची संख्या रीतीनुसार 142 (71X2) इतकी होते.

आरएससी तिकिटावर प्रवास करण्याचा तुम्हाला अधिकार असतो काय?

RAC-Ticket-Journey

95% पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये तुम्ही खात्री करू शकता की जरी तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर बर्थ विभागावे लागले, तरी तुम्ही प्रवास करणारच आहात. तुम्हाला माहित असेलच, जर तिकीट कन्फर्म झाले नाही किंवा त्या ट्रेनवर सीट्स रिकाम्या नसतील तर, आरएससी आरक्षणाच्या अंतर्गत दोन लोकांना साईड लोअर बर्थचे सीट्स दिले जातात, जे त्यांना विभागावयाचे असतात. पण अशा एका प्रसंगी तुम्ही कदाचित प्रवास करू शकणार नाहीत. ते कसे काय, ते खाली वाचा.

आरएससी तिकिट वेट-लिस्टमध्ये हलविले जाऊ शकते काय?

RAC-to-Waiting-list

होय, हे क्वचितच घडते, पण एक आरएससी तिकिट वेट-लिस्टमध्ये हलविले जाऊ शकते. जर त्या ट्रेनचे काही कोचेस उपलब्ध नसतील आणि सीट्सची कमतरता असेल, तर असे पाऊल उचलले जाऊ शकते. समजा, एका ट्रेनमध्ये 12 स्लीपर कोचेस आहेत आणि त्यांच्यापैकी एका कोचमध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आणि त्याला प्रवासाला घेऊन जाऊ शकत नसेल. मग, कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना एका कमी कोचमध्ये सामावून घ्यावे लागेल. अशा दुर्मिळ घटनांमध्ये एखाद्या आरएसी तिकिटाची पदावनती होऊ शकते.

आरएससी तिकिटांमध्ये कोणत्याही कॅटेगरीज असतात काय?

वरवर पाहता नसतात, परंतु आएससी तिकिटांमध्ये एक आपत्कालीन आरक्षण सामील असते. या आपत्कालीन आरक्षणामध्ये व्हीआयपीज, रेल्वे स्टाफ इ.साठी तिकिटे बुक केली जातात, जे काही प्रसंगी कन्फर्म न झालेले असू शकतात. सहसा या तिकिटांना कन्फर्मेशनसाठी रांगेत असल्यास सामान्य आरएसी बुकिंग्जच्या समोर प्राधान्य दिले जाते.

आरएसी तिकिटांचे कन्फर्मेशन नेहमी अनुक्रमांकातच होते काय?

नाही, सर्व प्रसंगी नाही! जसे तुम्ही आरएसीमधील आपत्कालीन आरक्षणात पाहिलात. त्यामुळे, जिथे आरएससी 1 सर्वात प्रथम कन्फर्म झाले पाहिजे, तिथे क्वचित वेळी आरएसीच्या खालून क्रमांकाची तिकिटे आपत्कालीन आरक्षणामुळे कन्फर होऊ शकतात.

तुमच्याकडे आरएसी तिकिट असल्यास, तुम्हाला नेहमी खालील बर्थ सीट्स दिले जातात काय?

हा एक सामान्य नियम आहे; तथापि, अशा काही विशेष घटना घडू शकतात, जिथे कन्फर्म झालेल्या तिकिटांचे कॅन्सलेशन मोठ्या प्रमाणावर झाल्यास, प्रवाश्याला मधले किंवा वरील बर्थ दिले जाऊ शकते. हे क्वचितच घडते.

आरएससी तिकिटांवरील काही प्रवाशांना स्वतंत्र बर्थ्स कसे मिळालेले दिसून येतात?

Solo-berth

काही वेळा तुम्ही पाहू शकता की आरएसीचे तिकीट असलेल्या एखाद्या प्रवाश्याला एक स्वतंत्र बर्थ मिळालेले असते, जिथे सामान्य विभागणी नसते. असा सुखद धक्का अशा वेळी मिळतो, जेव्हा त्या प्रवाशाला दिलेले असे तिकीट अखेरच्या क्षणी कन्फर्म होते आणि फेरवाटपासाठी वेळ नसतो.

तिकिटात दोन आरएसी नंबर्स का दिसून येतात, उदा. आरएससी 15/आरएसी 9?

अनेक लोकांचा अशा स्थितीमुळे गोंधळ उडतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही बुकिंगची प्रक्रिया सुरु केली तेव्हा तुम्ही आरएसी 15 वर होता, पण त्या प्रक्रियेदरम्यान आणखी 6 तिकिटे कॅन्सल झाली, त्यामुळे तुम्ही आरएसी 9 या सध्याच्या स्थितीवर पोहोचला.

तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर (सारखाच पीएनआर असलेल्या) प्रवास करीत आहात आणि आरएसी 3 आणि 4 अहित, तर सीट्स एकत्र असतील काय?

आरएसी तिकिटे एखादे कॅन्सलेशन झाल्यावरच कन्फर्म होते. त्यामुळे, तुमच्या तिकीटाची प्रगती कॅन्सलेशन्सवर अवलंबून असते. तथापि, भारतीय रेल्वे सहसा एका पीएनआरला एकाच जागी सामावून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्हाला एकाच जागी विभागून जावे लागेल.

आरएसी तिकिटांच्या कन्फर्मेशनच्या शक्यतेचे अनुमान केले जाऊ शकते काय?

Family-travel 

होय, याचे निश्चितच अनुमान केले जाऊ शकते आणि हीच गोष्ट आम्ही रेलयात्री येथे करतो. पण अशा विश्लेषणासाठी, गर्दी, कन्फर्मेशनचा इतिहास आणि त्या ट्रेनच्या वक्तशीरपणाची कामगिरी इत्यादींचे तपशीलवार विश्लेषण गरजेचे असते.

3 COMMENTS

  1. आपण फारच सोप्या पध्दतीने RAC म्हणजे नक्की काय व त्याचे नियम समजावून सांगितले आहेत, तरी अश्याच प्रकारे बाकीचे नियम पण विस्तृतपणे पोस्ट कारावे.
    धन्यवाद

  2. आपण आरएसी बाबत खुपच चांगली माहिती दिलित त्या बद्दल धन्यवाद. आपण अजुन चांगली माहिती दिली तर बरे होईल. उदाहरणार्थ ः शिएसटीएम ते मँगलोर अशी सुपरफास्ट ट्रेन आहे आणि त्या ट्रेन मध्ये कनफमँ टिकिट असलेले २० प्रवासी आहेत व ते रत्नागिरी व कुडाळ येथे ऊतरणारे आहेत तर त्या २० प्रवासी तिकीटांचे आपण काय करता ?

  3. तूम्ही आर एसी च्या टिकीट व त्यांच्या नियमा बदल खूपच छान माहिती दिलेली आहे. त्या बदल तूमचे खुप आभार मानतो. धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here