अलाहाबादमधील कुंभमेळ्याची तुम्हाला कधीही माहिती नसलेली 8 तथ्ये

0
1875
Kumbh-2019

2019 मधील या जानेवारी महिन्यात सर्व रस्ते तुम्हाला उत्तरप्रदेशमधील प्रयागराज (अलाहाबाद) येथे घेऊन जातील. या पवित्र शहरामध्ये त्रिवेणी संगमावर 15 जानेवारी ते 4 मार्च 2019 पर्यंत कुंभमेळ्याचा सोहळा आयोजित केला जाईल. आपल्यापैकी प्रत्येकानेच लहानपणापासून “कुंभमेळा” मधील गर्दीसंबंधीच्या कथा ऐकल्या आहेत. एवढी गर्दी असते की तुम्ही सहज हरवू शकता. यावर्षी, अलाहाबाद अर्ध कुंभमेळ्याचे यजमानपद भूषवित आहे (जो 6 वर्षांतून एकदा आयोजित केला जातो). त्यामुळे या विशेष सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी लाखो हिंदू भक्त यात्रा करतील अशी तुम्ही अपेक्षा करू शकता. “जगातील सर्वांत मोठी धार्मिक यात्रा परिषद” अशी कुंभमेळ्याची विक्रमी नोंद आहे. अशी अपेक्षा आहे की या कुंभमेळ्यातदेखील हीच परंपरा पुढे चालू ठेवली जाईल. पान जर तुम्ही फक्त एवढाच विचार केला असेल की लाखो भक्तांचे एकत्र येणे ही कुंभमेळ्याची केवळ एकच अद्वितीय गोष्ट आहे, तर तुम्ही खाली उल्लेख केलेल्या तथ्यांना जाणून घेऊन आश्चर्यचकित व्हाल. चला तर मग तर खालील तथ्ये वाचून काढा.

कुंभमेळ्याचे ट्रेन तिकीट बुक करा

#1: पौराणिक कथा

Marathi blog on Kumbh

 

‘कुंभ’ या शब्दाचा अर्थ ‘अमृताने भरलेले एक भांडे’ (अमरत्व देणारे अमृत) असा होतो. असे मानले जाते की देव आणि राक्षसांनी केलेल्या समुद्र मंथनामध्ये, अमृताने भरलेला कुंभ वर आला. त्या दोघांनाही अमृत हवे होते. ब्रम्हदेवाच्या सूचनेनुसार एका देवाने हे अमृत पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र राक्षसांनी संघर्ष केला आणि तो कुंभ त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात झटापट झाली आणि ते जीवनामृत अलाहाबाद, इंदूर, नाशिक आणि हरिद्वार अशा चार ठिकाणी पडले. आता ही ठिकाणे पवित्र कुंभमेळ्याची स्थाने झाली आहेत.

एक दंतकथा अशी सांगितली जाते की ऋषी दुर्वासांनी क्रोधित होऊन देवांना शाप दिला. यामुळे देवतांची शक्ती कमी झाली आणि राक्षसांनी (असुरांनी) पृथ्वीवर भयानक हल्ले चढविण्यास सुरूवात केली. म्हणून ब्रम्हदेवाने देव आणि राक्षस यांना असा सल्ला दिला की मंथनातून अमृत बाहेर काढा आणि त्यांनी तसे केले. परंतु ही प्रक्रिया घडत असताना असुरांना असे समजले की देव स्वतःजवळच अमृत ठेवतील. त्यामुळे त्यांनी देवांसोबत 12 दिवस संघर्ष केला आणि त्यादरम्यान अमृताचे थेंब या चार ठिकाणी पडले. त्यामुळे तेथील नद्या पुन्हा अमृतात रूपांतरित झाला असा चमत्कार घडल्याचे बोलले जाते. प्रयागराजमधील पवित्र गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम हेच ते ठिकाण आहे असे मानले जाते.

अलाहाबादमध्ये हॉटेल बुक करा.

#2: पहिला ऐतिहासिक उल्लेख

Kumbh-Mela-History

कुंभमेळ्याची पहिली नोंद प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्युएन त्सांग याने केली आहे असे आढळून येते. त्याने राजा हर्षवर्धन यांच्या राजवटीत भारत दौरा केला होता. त्याच्या लेखनामध्ये असा उल्लेख आहे की राजा हर्षवर्धनने धार्मिक विधी आयोजित केला होता जिथे प्रयागच्या दोन पवित्र नद्यांच्या संगमामध्ये हजारो भक्तांनी डुबकी घेतली.

अलाहाबादसाठी बसमध्ये तिकीट बुक करा.

#3: तुम्ही @कुंभमेळ्याला केव्हा जावे

कुंभमेळा काही ठराविक तारखांना होतो जेव्हा पवित्र नदीच्या पाण्याचे रूपांतर अमृतामध्ये होईल असे मानले जाते. म्हणून कुंभमेळ्याची तारीख ठरवण्यापूर्वी (अर्ध किंवा महा कुंभ मेळा) सूर्य, चंद्र आणि गुरूची स्थिती लक्षात घेतली जाते. सामान्यतः, जेव्हा ग्रह परिपूर्ण स्थितीमध्ये असतात तेव्हा म्हणजेच अलाहाबादमध्ये कुंभमेळा माघ महिन्यामध्ये होतो. या सोहळ्यादरम्यान पवित्र नदीमध्ये डुबकी घेतल्यास भक्तांची सर्व पापे धुवून जातात असे मानले जाते. या वर्षीच्या शुभ तारखा 14, 27 जानेवारी आणि 6 , 15 , 17 , 21 25 फेब्रुवारी अशा आहेत.

रेल्वेमध्ये शुद्ध शाकाहारी जेवण बुक करा

#4: वेदनांहून महत्वपूर्ण असा विश्वास

सहसा याचे आयोजन थंडीच्या महिन्यांत केले जाते, जेव्हा विशेषतः उत्तर भारतामध्ये नद्या गोठतात. भक्तांची इच्छाशक्ती त्यांना पहाटेच्या वेळेस या पवित्र नदीमध्ये डुबकी घ्यायला लावते. आणि देवावरील विश्वासामुळे हजारो भक्त आनंदाने नदीमध्ये डुबकी घेतात व होणाऱ्या वेदना सहनही करतात. पहिले शाही स्नान मकर संक्रांतीला होते आणि याचा शेवट 4 मार्च 2019 ला होतो. (पुढील महिन्यातील पौर्णिमा) यादरम्यानच्या पौर्णिमा, अमावस्या आणि वसंत पंचमीला स्नानाच्या तारखा असतील.

अलाहाबादला जाण्यासाठी आऊटस्टेशन कॅब बुक करा.

#5: नागा साधूंचा जनमानसांत येण्याचा काळ

indian saints in kumbh

कुंभमेळा तुम्हाला नागासाधूंना पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देतो, ज्यांनी सर्व भौतिक गोष्टी, ऐहिक सुख आणि चैनीच्या जीवनशैलीचा त्याग केला आहे. ते शंकराचे कट्टर भक्त आहेत आणि ते सहसा कुंभमेळा वगळता लोकांसमोर येत नाहीत. कुंभमेळ्यादरम्यान ते मोठ्या संख्येने व गटा-गटांनी अलाहाबाद आणि इतर कुंभमेळ्यांच्या ठिकाणी येतात. साधू त्यांच्या हत्याऱ्याने (जसे काठी आणि तलवार) युद्ध कौशल्य दाखवतानाही दिसू शकतात. त्यांना होणाऱ्या त्रासदायक वेदना त्यांचा सर्वोत्तम भूतकाळ दर्शवितो. जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही त्यांचे विचार, विचारधारा आणि तत्त्वज्ञान याबाबत त्यांना प्रश्न विचारू शकता आणि याबाबत चर्चा करण्यात त्यांना आनंदच होईल. नागा साधूंव्यतिरिक्त, हिंदू पंथातील इतर पवित्र पुरुषसुद्धा या सोहळ्याला भेट देतात. या काही पंथांमध्ये कल्पवासी (जे दिवसातून तीन वेळा स्नान करतात) आणि ऊर्ध्ववहुर (जे आपले संपूर्ण शरीर कठोर तपस्यांमध्ये झोकून देतात) पंथाचा समावेश होतो.

अलाहाबादच्या बसमध्ये तिकीट बुक करा.

#6: सर्वात मोठा सोहळा


प्रत्येक वेळेस जेव्हा कुंभमेळा भरतो, तेव्हा असे दिसून येते की पूर्वीचा विक्रम मोडीत निघतो. उपरोक्तपणे असे म्हटले जाते की पृथ्वीवरील मानवाचा सर्वात मोठा शांततेने एकत्र येण्याचा हा सोहळा आहे. 2013 ला अलाहाबादमध्ये पार पडलेल्या सोहळयात आतापर्यंतच्या सर्वात जास्त उपस्थितीची विक्रमी नोंद झाली आहे. 2013 च्या कुंभ मेळ्यामध्ये 120 दशलक्ष लोक एकत्र आले होते. अलाहाबाद यावर्षी हा विक्रम मोडू शकेल का? हे केवळ येणारा काळच सांगेल.

#7: एकमेवाद्वितीय असे हनुमाचे मंदिर पाहण्याची संधी

अलाहाबादमध्ये कुंभमेळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे हनुमान मंदिर पाहण्याची संधी होय. हे एक अद्वितीय असे मंदिर आहे, जे वर्षभरातील बहुतांश काळ गंगा नदीच्या पाण्यात बुडालेले असते. अशी हिंदू मान्यता आहे की हनुमानाच्या पायाला स्पर्श करण्यासाठी गंगा नदीने पाण्याची पातळी वाढवली आणि त्यामुळे मंदिर पाण्यामध्ये बुडालेले असते. परंतु कुंभमेळ्यादरम्यान मंदिर पाण्याबाहेर येते. या अद्वितीय मंदिरामुळे तुम्ही हनुमानाच्या बसलेल्या स्थितीमधील मूर्तीचे दर्शन घेऊ शकता. (जी 20 फूट उंच आहे)

#8: एक मोठी आर्थिक उलाढाल

देशामध्ये जिथे अजूनही बेरोजगारी एक मोठी समस्या आहे, अशा वेळी कुंभमेळा खूप लोकांना तात्पुरते उत्पन्नाचे साधन निर्माण करून देतो. 2013 च्या कुंभ मेळ्याच्या अंदाजानुसार जवळजवळ 6,50,000 रोजगार उपलब्ध झाले होते आणि त्या सोहळ्यामधून 12,000 कोटी रुपयांचे रोजगार (उत्पन्न) उपलब्ध झाले होते. ही खूप जणांसाठी एक आनंदाची बातमी असेल!

तुम्ही या अद्वितीय धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्याची योजना करत आहात? तर मग, त्रासमुक्त यात्रेची योजना करण्यासाठी रेलयात्री (RailYatri) च्या सर्व सेवा तुम्हाला मदत करतील. आमच्या सेवांवर एक नजर टाका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here