शिमल्यातील ५ हेरिटेज इटरीज

0
497

सिमला म्हणजे मोठमोठी झाडं आणि मॉल रोडवरची शॉपिंग, असं तुम्हाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. सिमल्यात अनेक चांगली खाण्याची ठिकाणंही आहेत. पण, अनेकांना ती माहीत नाहीत. म्हणूनच, तुमच्यातील खवय्याची तृष्णा शांत करायची असेल तर या लोकप्रिय ठिकाणी भेट द्या आणि अगदी स्थानिकांसारखा इथल्या पदार्थांचा आस्वाद घ्या.

Mehru Halwai

मेहरु हलवाईकडील मावा मिठाई

मॉलरोडच्या दिशेने वरच्या बाजूला जाताना मेहर चंद ऍण्ड ब्रदर्स (मेहरु हलवाई नावाने प्रसिद्ध) हे दुकान दिसतं. त्यांच्याकडील मावा मिठाई फारर प्रसिद्ध आहे. १९०२ साली सुरू झालेलं हे दुकान अगदी जुन्या दुकानांपैकी एक आहे. इथे सगळ्या मिठाया आणि पदार्थ शुद्ध तुपात बनवल्या जातात. काहीशी गिचमिड पण तरीही व्यवस्थित दिसणार्‍या या दुकानाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे बदाम आणि कोकोनट पावडरसोबत दिली जाणारी मावा बर्फी.

Baljees Restaurant

दुपारचं जेवण घ्या बालजीसमध्ये

खाद्य संस्कृतीचा वारसा असणार्‍या या ठिकाणाची सुरुवात १९४५ मध्ये झाली. इथे अगदी राजेशाही आणि सुंदर सजावट करण्यात आली आहे. काचेची भांडी, टेबल क्लॉथ, टापटीप ड्रेसमधले वेटर्स… प्रत्येक बारीकसारीक गोष्टीकडे इथे अगदी नीट लक्ष दिलं जातं. मशरुम दो प्याजा आणि बटर नान मागवा, तुम्ही नक्कीच बोटं चाटत रहाल. जेवण संपल्यानंतर गरमागरम गुलाबजाम खायला मात्र विसरू नका.

Taka Bench

टाक्का बेंचचे गोलगप्पे

टाक्का बेंचचे मालक बिहारी लाल शर्मा सिमल्यातील सर्वोत्कृष्ट गोलगप्पे (पानीपुरी) बनवतात. स्टेट लायब्ररी आणि प्रसिद्धा ख्रिस्त चर्चच्या मागेच हे दुकान आहे. बिहारी लाल शर्मा १९४८ पासून स्थानिकांना आणि पर्यटकांना आंबटगोड चवीचे गोलगप्पे चवीने खायला घालताहेत. त्यांनी फ्रूटचाट विक्रेता म्हणून व्यवसायाची सुरुवात केली होती. कालांतराने सर्वोत्कृष्ट गोलगप्पे बनवण्यासाठी ते प्रसिद्ध झाले.

Sita Ram & Sons

सिता राम ऍण्ड सन्समधले छोला भटुरा

सिता राम ऍण्ड सन्समधील प्रसिद्ध छोले भटुरेवर आंबटगोड चटणी असते. दोन भटुरे अवघ्या ४० रुपयाला मिळतात. या दुकानाची स्थापना १९५३ साली झाली. ही तशी छोटी जागा आहे. त्यामुळे, तुम्हाला बसायला जागा मिळेलच, याची शक्यता जरा कमी आहे. अर्थात, आसपास असलेल्या बाकड्यांवर बसून या छोले भटुर्‍यांचा आस्वाद घेता येईल.

Aunty's Kitchen

आंटीज किचनमधील अस्सल चायनीज

मिडल बझारच्या चिंचोळ्या रस्त्यावर आंटीज किचन वसलं आहे. गेली ४१ वर्षं या व्यवसायात गुंतलेलं कुटुंब चविष्ट चायनीझ पदार्थ बनवत आहे. सध्या किम नावाच्या महिलेकडे या स्टॉलची मालकी आहे. तसं हे दुकान अगदी छोटं आहे. पण, संपूर्ण सिमल्यात त्यांचे चाहते आहेत. अतिशय रुचकर गार्लिक सूपसोबत वाढले जाणारे वेज मोमोज किंवा थुपका तुम्हाला इतरत्र कुठेही मिळणार नाहीत.

मग, सिमल्यात स्वत:ला ट्रीट देण्यासाठी सज्ज आहात का?

 

Originally written by Yashpal Sharma. Read here.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here