भारतातील ट्रेनच्या प्रवाशांचे 10 मनोरंजक प्रकार

0
1150
Fun on train

ट्रेनच्या प्रवासावर जाणे म्हणजे बॉलीवूडच्या सिनेमापेक्षा कमी नाही, ज्यात सुमारे सर्व काही असते- मनोरंजन, विनोद, नाट्य आणि काहीवेळा अॅक्शन देखील असते. अशा काही वेळा असतात, जेव्हा ट्रेनमध्ये आपणाला विविध पात्रे आढळतात, जे आपला प्रवास सुखकर करतात किंवा सहसा त्रासदायकच बनवितात. आता आपण ट्रेनच्या प्रवाशांच्या या यादीवरून एक नजर फिरावूया. आम्हाला खात्री आहे तुम्हाला असे लोक भेटलेच असतील, केव्हातरी, कुठेतरी.

* डब्बा-वाला –

Food on train

आपल्या डब्यात खाणे भरून येतात, काही लोक तर प्रत्येक तासासाठी लागेल एवढे खाणे घेऊन आलेले असतात. ते घरगुती पदार्थांचा स्वाद येईल आणि निरंतर खाण्याचा आवाज आपल्या नकांना आणि कानाला पोहोचेल याची खात्री करतात. या व्यतिरिक्त, त्यांची मुले सर्व फेरीवाले खुश राहतील याची काळजी घेत असतात.

* किशोर कुमार –

Music on train

आपणा सर्वांना संगीत आवडते. नाही का? पण हे लोक, यांना संगीत फार म्हणजे फार म्हणजे फारच आवडत असते. ते केवळ त्यांच्या फोन्सवर निरंतर संगीत ऐकण्याने संतुष्ट नसतात, तर ते देखील एवढ्या मोठ्याने गाणे गाण्यास मुळीच संकोच करत नाहीत, की त्यांचे सहप्रवासी देखील त्यांच्या असामान्य संगीत ज्ञानाचा आनंद लुटू शकतील.

* सीबीआय वृत्तीचे लोक –

cbi folks 3

तुम्ही ट्रेनमध्ये चढता आणि काही देखणे लोक तुमच्या समोरच्या जागेवर बसलेले असतील. ते ‘हलो, तुम्ही कुठे चाललात?” सारख्या प्रश्नाने संभाषणाला सुरुवात करतील आणि हळूहळू तुमच्या वैयक्तिक जीवनाकडे येतील. भारतीय ट्रेनमध्ये अशा प्रकारचा एक गप्पिष्ट निश्चितच असतो, जो संपूर्ण प्रवासात संपूर्ण उर्जेसह गप्पा मारतील

* घोरणारे वीर –

snory glory

अशा प्रकारचे लोक खास करून त्यांच्या खालच्या बर्थऐवजी वरील बर्थची मागणी करतील, आणि झोपून राहतील, संपूर्ण दिवस, संपूर्ण रात्र, संध्याकाळ आणि अनेक शतकांपर्यंत. भांडणारी कुटुंबे, ओरडणारी मुळे किंवा अंताक्षरीच्या कर्णकर्कश फेरी अशा घोरणाऱ्या वीरांच्या झोपेचे काडीचेही नुकसान करू शकत नाहीत.

* मालवाहक –

Luggage Over dosers

या लोकांकडे एवढे सारे सामान असते की ते एक नवी संस्कृती उभी करू शकतील. सभोवताली असलेली प्रत्येक इंच जमीन त्यांच्या सामानासाठी पार्किंगची जागा बनून जाते. काहीवेळा तुम्हाला असे वाटेल की त्यांना घरातून बाहेर काढले तर नाही ना आणि ते नवे जीवन जगण्यासाठी निघाले आहेत!

* एक दुजे के लिये –

romantic couples on train

तुम्हाला असे लोक ट्रेनच्या प्रवासात हटकून मिळतील. ते आजूबाजूला पाहूच शकत नाहीत आणि एकमेकांमध्ये गुंतून असतील. त्यांच्या गुलुगुलू गोष्टी आणि “बेबी तुला आणखी काही हवंय काय?”ची सत्रे अंत्यहिन असतात आणि का नाही? ट्रेनचा प्रवास एक रोमँटिक प्रकरण बनले पाहिजे, नाही का?

*”ये सीट मुझे दे दे ठाकूर”-

Ye seat mujhe de de thakur

असे लोक त्यांच्या ट्रेनच्या प्रवासातील सुमारे संपूर्ण वेळ त्यांच्या सहप्रवाशांशी जागेसाठी सौदा करण्यात वेळ घालवतील, जेणेकरून ते त्यांच्या लोकांच्या समुहासोबत बसू शकतील. एकमेकांच्या जवळ जागा मिळविण्यात अपयश आल्यास, ते सहप्रवाशाला “थोडे अॅड्जस्ट” करायला सांगतील, जेणेकरून ते आपल्या लोकांमध्ये शिरून बसू शकतील; कारण त्या लोकांशिवाय त्यांचा ट्रेनचा संपूर्ण प्रवास त्यांच्यासाठी निश्चितच प्राणघातक ठरू शकेल!

या गटातील दुसऱ्या प्रकारचे प्रवासी “जुगाडिस्ट्स” तिकीट नसलेले प्रवासी असतात. तुम्ही अशा लोकांना नेहमी टीटीईसह किंवा एखाद्या सीटसाठी सहाप्रवाशाशी सौदा करताना पाहू शकता.

* हॉट-शॉट कार्पोरेट्स –

Hotshot Corporates on train

हे जणू तुमच्या डोळ्यांसमोर एक संपूर्ण कार्पोरेट ऑफिस उघडून बसलेले पाहिल्यासारखे असते. चार्जिंग पॉइंटवर कब्जा करणारे, हे कार्पोरेट हॉट-शॉट्स त्यांच्या लॅपटॉप्ससह असतील, ज्यात मोठ्याने गाणे वाजत असेल किंवा त्याच्या सहप्रवाशासाठी एखादा सिनेमा चालत असेल. त्यांच्यात त्यांच्या लॅपटॉप्सवर काही प्रेझेंटेशन्स टाईप करत, मोठ्या आवाजात त्यांच्या महागड्या स्मार्टफोन्सवर कामाशी संबंधित चर्चा होत असेल.

* 440-व्होल्टचे वादी –

440 volt debators

राजकारण, देश, भ्रष्टाचार, बेरोजगारी असा कोणताही विषय घ्या, ते तुमच्या ज्ञानाला आव्हान देतील. कोणताही विषय निवडा आणि ते त्यावर कोणत्याही खडाजंगीसाठी तत्पर असतील!

* साहसी पुरुष –

Daredevils on train

हे लोक आपल्या जागेवर शांतपणे बसू शकत नाहीत आणि ते ट्रेनच्या दरवाजाकडे जाण्यासाठी तुम्हाला वारंवार त्रास देतील. ताज्या हवेसाठी आणि बाहेरील परिदृश्यासाठी ते दरवाजाजवळ लटकून कोणताही धोका पत्करतील.

आम्हाला खात्री आहे तुम्हाला अशा लोकांचा सामना करावा लागला असेल, ज्यांनी तुम्हाला वैताग आणला असेल. पण काहीही असो, ट्रेनच्या लांबच्या प्रवासात विरंगुळा देणारे हेच खरे मनोरंजक असतात आणि त्यासाठी आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here