प्रवासात खाण्यासाठी आरोग्यदायी सूचना

0
2590

द्वारा: फराह आफरीन, एक सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ

प्रवाशांची सामान्यपणे ही तक्रार असते की ते प्रवासात आरोग्यदायी खाणे खाऊ शकत नाहीत. चांगली बातमी ही आहे की थोडीशी योजना केल्यास, तुम्ही प्रवासात पौष्टिक आणि पोट भरेल असे जेवण करू शकता. खाली काही सूचना दिल्या आहेत, ज्या प्रवासात तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकतील.

हलका आरोग्यदायी अल्पाहार

हलका आणि आरोग्यदायक अल्पाहार आरोग्यास हानिकारक पदार्थ टाळण्यासाठी, प्रवासात चघळण्यासाठी एक चांगला प्रथिनयुक्त अल्पाहार ठेवणे सोयीस्कर ठरेल. या पर्यायांमध्ये अनेक पदार्थ आहेत जसे चणे, शेंगदाणे, चिवड्यासह चुरमुरे, पुदिना चटणी किंवा सॉससह खाकरा, फळे आणि काबुली चण्याच्या चटणीसह भाज्या. यात चांगला भाग म्हणजे आता रेलयात्रीच्या आरोग्यदायी मेनूमध्ये तुम्हाला अनेक हलके खाद्य पदार्थ मिळू शकतात. इडली, पोहा, सँडविचेस किंवा उपमा मागवा आणि आपल्या आरोग्याशी तडजोड न करता आनंदी आणि हलके रहा.

मिश्रबिया, प्रथिनांचा आहार

बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, अळशीच्या बिया, तीळ यांच्यासारख्या सुक्या मेव्यात आणि मिश्र बिया प्रथिनांनी समृद्ध असतात आणि तुम्हाला उर्जायुक्त ठेवतात. त्यांना झिप लॉक पाऊचमध्ये भरा आणि सोबत वाटल्यास त्यात बेदाणे, सुकलेल्या बेरीज, सुकलेली अंजिरे आणि इतर सुका मेवा देखील मिसळू शकता.

फळे सोबत ठेवा

Marathi food blog

जेव्हा तुम्ही सफरचंद, संत्रे, द्राक्षे, पीयर किंवा तुमच्या आवडीचे अन्य कोणतेही फळ सोबत नेता तेव्हा प्रवासातील खाणे आटोपशीर बनते. तसेच, हे आरोग्यास हानिकारक असे शर्करायुक्त पदार्थ खाण्याच्या लालसेवर नियंत्रण देखील आणतात.

सुटसुटीत अल्पाहार

असा पदार्थ निवडा जो कमी गुंतागुंतीचा असेल आणि खाण्यास सुटसुटीत असेल. जसे, चीज सँडविच, पनीर रोल, पीनट बटर सँडविच, अख्ख्या गव्हाच्या ब्रेडवरील स्प्रेड ऑन, . सुटसुटीत असे अल्पाहार तुम्ही तुमच्या ट्रेनवर कोणत्याही वेळी रेलयात्रीकडे मागवू शकता.

उकडलेली अंडी

travel food

हे शिजविण्यास सोपे, प्रथिनांनी समृद्ध आणि यात इसेन्शियल अमायनो अॅसिड्स असतात, जे रक्तातील साखर स्थिर करतात आणि तसेच, उर्जेची पातळी वाढवितात आणि वजन नियंत्रणात मदत करतात. अंडी तशीच्या तशीच खा किंवा त्यात भाज्या किंवा वनौषधी मिसळून एग रोल/एग सँडविचेस बनवा.

ताजे पदार्थ

तुम्ही जर वातानुकूलित कोचमध्ये प्रवास करीत नसाल, तर लवकर खराब होणारे आणि लवकर खराब न होणारे पदार्थ शोधा आणि कोरडे कारले आणि पोळ्या, भरलेली भेंडी आणि चपाती, डाळ भरलेली पोळी किंवा डाळ/बेसन चिल्ला, मिसी रोटी आणि दही (हव्या असलेल्या पकमध्ये सहज उपलब्ध असते). किंवा हे पदार्थ घरून नेण्याची कटकट कशाला, जेव्हा तुमच्या हातात रेलयात्रीचे आरोग्यदायक मेनू असते? आत्ताच मागवा!

भरपूर पाणी प्या

travel tips in Marathi

पाणी आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे असते, त्यामुळे सोबत पाण्याची बाटली ठेवणे विसरू नका. प्रवास डिहायड्रेशनमुळे बिघडू देऊ नका.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here