तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत असे सुविधा ट्रेनचे नियम

0
1850
Marathi Blog

जरी या ट्रेन्स प्रवास सुखकर करण्याच्या उद्दिष्टाने सुरू करण्यात आल्या असल्या तरी त्यांचे नियम मात्र बरेचदा प्रवाशांसाठी समस्या निर्माण करतात. त्यामुळे, सुविधा ट्रेन्ससह तुमची सहल ठरवण्यापूर्वी खाली नमूद केलेले नियम वाचा आणि सहजपणे प्रवास करा.

बुकिंग कालावधी

हंगामी गर्दीच्या कालावधीत कन्फर्म तिकीट नसणाऱ्या प्रवाशांसाठी या ट्रेन्स एक सुटकेचा निश्वास ठरणे हेदेखील त्यांचे एक उद्दिष्ट आहे. त्यामुळेच सुविधा ट्रेन्सची तिकिटे कमाल 30 दिवस आधी आणि किमान 10 दिवस आधी बुक केली जाऊ शकतात. तिकिटे ऑनलाईन तसेच काउंटरवरूनदेखील बुक केली जाऊ शकतात.

तिकिटाचे शुल्क आणि सवलत

सुविधा रेल्वेमध्ये बदलत्या शुल्क धोरणाचा अवलंब करण्यात आला आहे ज्यामध्ये प्रत्येकी 20% बर्थ विकले गेल्यावर शुल्क वाढते. पण कमाल शुल्क तात्काळ शुल्काच्या तिप्पट शुल्कापेक्षा जास्त असणार नाही. जर एखाद्या विशिष्ट सुविधा रेल्वेसाठीची तिकिटे विकली गेली नाहीत तर ती फिजिकल बुकिंग काउंटर्सकडे बुकिंग करता दिली जातील. स्त्रिया, मुले किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणत्याही विशेष सवलती नाहीत.

ट्रेन विविधता

सुविधा ट्रेन्सचे तीन मुख्य प्रकार आहेत. पहिल्या श्रेणीमध्ये पूर्णतः AC असलेल्या ट्रेन्स, कमीत कमी थांबे अशा या राजधानी रेल्वेच्या धर्तीवरील रेल्वे आहेत. दुसऱ्या श्रेणीमध्ये दुरांतोच्या धर्तीवर AC आणि नॉन AC अशा मिश्र कोचेस, कमीत कमी थांबे यांचा समावेश आहे. तृतीय श्रेणीच्या रेल्वेमध्ये अध्येमध्ये थांबे आहेत तसेच यात एक्सप्रेस रेल्वेप्रमाणे AC आणि नॉन AC कोचेसही आहेत. तिकिटाचे शुल्क आपण जी सुविधा रेल्वे श्रेणी निवडू त्यानुसार कमीजास्त होईल.

ओळखपत्रे बाळगणे आवश्यक

तुम्ही सुविधा रेल्वेमध्ये चढण्यापूर्वी तुमच्याजवळ स्वतःचे ओळखपत्र असल्याची खात्री करा. सर्व प्रवाशांसाठी फोटो ओळखपत्र आवश्यक आहे आणि प्रवासामध्ये त्याची पडताळणी केली जाईल. जर एखादया प्रवाशाकडे वैध ओळखपत्र नसेल, तर त्याला/तिला रेल्वेमधून खाली उतरण्यास सांगितले जाऊ शकते.

रद्द करण्याचे नियम

जर तुम्हाला सुविधा रेल्वेची तिकिटे रद्द करायची असतील तर रेल्वे निघण्याच्या निर्धारित वेळेच्या किमान 6 तास आधी किंवा चार्ट तयार केला जाण्याच्या आधी, जे आधी घडेल त्यापूर्वी रद्द करणे आवश्यक आहे. तिकीट रद्द केल्यावर फक्त 50% पैसेच परत केले जातील. तिकिटांचा परतावा तिकीट एकदा का यशस्वीपणे रद्द केल्याबर थेट बँक किंवा क्रेडिट कार्डमध्ये जमा केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here