ओडिशातील अभयारण्ये

0
625

ओडिशा हे निसर्गाने लपवून ठेवलेल्या खजिन्यातील सर्वात मौल्यवान रत्न आहे. उन्हाळी सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही काही सुंदर पण अपरिचित अभयारण्यांची माहिती देत आहोत.

Wildlife destinations of Odisha

  • सात्कोशिया जॉर्ज अभयारण्य – या अभयारण्यातील विविध प्रकारच्या वनस्पती आणि झाडे वन्यप्रेमी पर्यटकांना आकर्षित करतात. त्याशिवाय, इथे मगरी व घडियालही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. पर्यटकांना हत्ती, चित्ता, धनेश आणि अस्वलेही पाहाता येतात.

Wildlife destinations of Odisha

  • भितरकनिका वन्यजीव अभयारण्य – हे भारतातील दुसऱ्या क्रमाकांच्या सर्वात मोठ्या खारफुटीच्या जंगलाचा भाग आहे. मगरींचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भितरकनिकामध्ये खाऱ्या पाण्यातल्या मगरी, पांढऱ्या मगरींपासून किंग कोब्रा साप व भारतीय अजगरही पाहायला मिळतात.

Wildlife destinations of Odisha

  • सिम्लीपाल राष्ट्रीय उद्यान – २००९ पासून युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व्हचा भाग असलेले सिम्लीपाल राष्ट्रीय उद्यान हे निसर्गाची अद्भुत नगरी आणि आकर्षक स्थळ आहे. रॉयल बेंगाल वाघ, चित्ता, सांभर, हरणे आणि मोर इथे पाहायला मिळतात.

Wildlife destinations of Odisha

  • गाहिरमाला समुद्री अभयारण्य – हे ओडिशाचे एकमेव समुद्री अभयारण्य असून ऑलिव्हर रिडले कासवांचे प्रजनन स्थान आहे. ही कासवे पॅसिफिक समुद्रापासून प्रवास करून गाहिरमालाच्या किनाऱ्यावर येथे प्रजननासाठी येतात.

Wildlife destinations of Odisha

  • देब्रीगढ वन्यजीव अभयारण्य – देब्रीगढ वन्यजीव अभयारण्य हे ऐतिहासिक अभयारण्यांपैकी एक म्हणून ओळखले जात असून घनदाट जंगलामुळे ते एकेकाळी राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे लपण्याचे ठिकाण होते. येथे वाघ, चित्ते, तर आणि भारतीय ससे पाहायला मिळतात. या अभयारण्यात चार शिंगी सांबरांच्या जातीही पाहायला मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here