Simplifying Train Travel

मोबाइल फोटोग्राफीसाठी टिप्स

फोटो काढल्याशिवाय प्रवास अपूर्ण वाटतो. आठवणी अविस्मरणीय करण्याचा तो सगळ्यात चांगला मार्ग असतो. तुमच्याकडे डीएसएलआर नाही? काळजी करू नका. खाली दिलेल्या टिप्सच्या मदतीने तुमचा स्मार्टफोन कॅमेरा तुमची नक्कीच मदत करेल.

Tips for mobile photography

योग्य क्षणासाठी तयार राहा – मोबाइल कॅमेरा होम स्क्रीनवर ठेवा, कारण चांगला क्षण हातातून पटकन निसटू शकतो. तुमची पॉवर बँकही तयार ठेवा आणि वेळोवेळी फोनची बॅटरी तपासा, म्हणजे चांगले फोटोग्राफ्स काढायची संधी चुकणार नाही.

Tips for mobile photography

फोटो एडिटिंग अप्लिकेशन – फोटोशॉप, स्नॅपस्पीड, लाइन कॅमेरा, कॅमेरा ३६०, रेट्रिका हे अॅप्लिकेशन्स वापरून तुमचे फोटो अधिक सुंदर बनवा.

Tips for mobile photography

वेगळे अँगल्स निवडा – वेगवेगळे अँगल्स आणि फ्रेम्‍स निवडून फोटो काढा. वेगवेगळे कलर फिल्टर्सही वापरता येतील.

Tips for mobile photography

स्मार्टफोनला अतिरिक्त लेन्स जोडा – अतिरिक्त लेन्सची तुमच्या फोटोग्राफीसाठी कशाप्रकारे मदत होऊ शकते? यामुळे एकप्रकारे तुमच्या फोनला चष्मा मिळेल, ज्याच्‍या मदतीने फोटोज जास्त स्पष्ट व जिवंत वाटतील.

सगळ्यात शेवटचे आणि महत्त्वाचे…

प्रवास करा, नव्याचा शोध घ्या आणि तुमच्या आठवणी जपा.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत