हंपी – जिथे गूढ भूतकाळ जिवंत होतो

0
3266

उत्तर कर्नाटकातील छोटे शहर असलेले हंपी हे एकेकाळी विजयनगर साम्राज्यातील सर्वात ताकदवान शहर होते. एकेकाळी अतिशय श्रीमंत आणि संपत्तीने ठासून भरलेल्या या शहरात जगभरातील लुटारूंनी स्वाऱ्या केल्या आणि लुटून नेले. काही जणांसाठी हे शहर दगडांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनांची अनुभूती देणारे, तर कित्येकांसाठी आधुनिक भारताच्या शहरी आयुष्यापासून दूर, एका वेगळ्याच काळात नेणारे आहे.

पुराण आणि शिलालेख

प्राचीन विजयवाडा साम्राज्याचे अवशेष आजही हंपीत पाहायला मिळतात. इथली चौव्या शतकातली शिल्पे त्यावरील बारीक कोरीवकामासाठी प्रसिद्ध आहेत. हे कोरीवकाम पराभूत राजे आणि सुंदर राण्या, या जमिनीला कसणारे शेतकरी, पुरुष व स्त्रिया, त्यांचे प्रेम, देवदासी यांची कहाणी सांगणारे आहे.

५०० ऐतिहासक शिल्पे मिरवणारं हंपी प्रत्येकवेळेस तुम्हाला आश्चर्यचकित करतं.

Vitthala Complex - Hampi

  • विथला टेंपल कॉम्प्लेक्स – १६व्या शतकात बांधल्या गेलेल्या विथला मंदीरात नक्षीदार खांबावर उभा असलेला सभामंडप आणि दगडाचा रथ पाहायला मिळतो. या सभा मंडपातील भव्य ग्रॅनाइट खांबांवर भरपूर शिल्पे पाहायला मिळतात. परिसरात वसलेला दगडी रथ हंपीच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक मानला जातो. याचे मुख्य  कर्षण आहेत, ते सांगितिक खांब, ज्यांवर टकटक केल्यास संगीत ऐकू येते.Virupaksha Remple - Hampi
  • विरूपाक्ष मंदीर – सातवे शतक ए. डी.मध्ये बांधलेले हंपीतील सगळ्यात जुनं मंदिर कोणत्याही डागडुजीशिवाय आजही दिमाखात उभे आहे. याचे प्रवेशद्वार प्रसिद्ध हंपी बाजारातून जाते.

Hazara Rama Temple Complex - Hampi

  • हजारा राम मंदिर कॉम्प्लेक्स – १५व्या शतकाच्या सुरुवातीला विजयनगरचा राजा देवराय दुसरा यांनी हे मंदिर बांधले होते. येथील हजारो कोरीवकाम आणि शिलालेखांवर रामायणाची कहाणी प्रतीत केलेली असल्यामुळे त्याला हजारा राम असे नाव पडले.The Lotus Mahal - Hampu

  • कमळ महाल – हे भव्य बांधकाम जनानखान्याचा भाग आहे, जो विजयनगरच्या साम्राज्यातील राणीवंशासाठी राखीव होता. हंपी शहरातील अद्भुत वास्तूंमध्ये याचा समावेश असून आश्चर्य म्हणजे हंपीवर झालेल्या लुटारूंच्या स्वाऱ्यांमध्ये ते जसेच्या तसेच तगले.

प्रवासासाठी मार्गदर्शन – हॉस्पेट हे हंपीपासून सर्वात जवळ असलेले रेल्वे स्थानक असून ते शहरापासून १३ किमी लांब आहे. तिथे जाण्यासाठी टॅक्सी किंवा कॅब घेता येते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here