तुमचा दीर्घ आठवडा अखेर मजेदार बनविण्यासाठी स्थाने

0
661

एका मोठ्या आठवडा अखेर कुठे जायचे हे ठरविताना गोंधळ उडतोय? तुमच्या शहराच्या जवळच सुट्या घालविण्यासाठी एवढी सगळी ठिकाणे असताना का घाबरता! मग, खाली दिलेल्या स्थानांपैकी एक निवडा आणि बॅग पॅक करायला लागा.

दिल्ली

सांगला खोरे

Sangla Valleyचित्रात शोभेल असे हे किन्नौर जिल्ह्यामध्ये वसलेले खोरे आहे. याच्या सुप्त सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी आपल्याला शिमल्याला तळ ठोकावे लागेल. शिमल्याहून बसेस आणि खासगी कॅब्स सहज मिळू शकतात, जे थेट तुम्हाला विलक्षण खेडी, फळबागा, घनदाट वृक्ष आणि बर्फाच्छादित पर्वतांनी सजलेल्या या सुंदर खोऱ्यात घेऊन जातात.

पर्यटन आकर्षणे: कामरू किल्ला, सांगला कांडा, बास्पा नदी, रकछम, चितकुल आणि ब्रीलेंगी गोम्पा.
सर्वात नजीकचे रेल्वे स्थानक: शिमला

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स

Valley of Flowers
नेपाल आणि तिबेटच्या सीमेवर असलेले हे स्थान पावसाळ्यात त्याच्या संपूर्ण सौंदर्याने नटून समोर येते. या खोऱ्यात 300 पेक्षा जास्त फुलांची झाडे आणि औषधी वनस्पती आहेत.

पर्यटन आकर्षणे: नंदा देवी राष्ट्रीय उद्यान, हेमकुंड साहिब, हिमालयन ट्रेक
सर्वात नजीकचे रेल्वे स्थानक: हरिद्वार

कोलकाता 

देऊळ

Deul
स्वतःला बोलापूरनजीक अजय नदीच्या तीरावर वसलेल्या देऊळ येथे बंगालच्या गौरवशाली इतिहासात, निसर्गरम्य सौंदर्यात आणि खेडवळ मोहकतेत बुडवा. येथे संस्कृती, परंपरा आणि इतिहासाचे सुरेख जतन दिसून येते. 300 वर्षे जुने मंदिरापासून निसर्गापर्यंत शोध न घेतलेल्या अरण्यातील पायपीट तुम्हाला अद्भुत अनुभव देईल.

पर्यटन आकर्षणे: टेराकोट्टा मंदिर, कवी जयदेवचे घर, आजार नदीचे तीर आणि गढ जंगल
सर्वात नजीकचे रेल्वे स्थानक: बोलापूर-शांतीनिकेतन

उत्तर बंगाल

North Bengal
समसिंग आणि सुन्तलेखोलासारख्या छोट्या खेडी, सुंदर वृक्ष आणि बर्फाच्या ढगांचा आनंद लुटण्यासाठी पावसाळ्यात उत्तर बंगालच्या पर्वतांना भेट द्या.

पर्यटन आकर्षणे: समसिंग, सुन्तलेखोला, गजोलडोबा, कॉरोनेशन ब्रिज आणि दुधिया.
सर्वात नजीकचे रेल्वे स्थानक: नवी जलपाइगुडी

मुंबई

खोपोली

Khapoli
खोपोली हे सह्याद्री पर्वतांच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. या ठिकाणी तलाव, धबधबे, निसर्गदृश्य आणि वास्तुशैलीनुसार बनविलेली सुंदर मंदिरे आहेत.

पर्यटन आकर्षणे: झेनिथ धबधबा, कलोते तलाव, अष्टविनायक मंदिरे आणि इमेजीका
सर्वात नजीकचे रेल्वे स्थानक: लोणावळा

कामशेत

Kamshet
कामशेत भारतातील 10 शीर्ष रोमांचक स्थानांपैकी एक आहे. समृद्ध अशा बागा, शांततापूर्ण तलाव आणि उंचसखल पर्वत तुमच्यासाठी तरोताजा होण्यास आणि पुनरुज्जीवित होण्यासाठी एकदम योग्य ठिकाण ठरतात.

पर्यटन आकर्षणे: वडीवली तलाव, ढाक बाहिरी किल्ला, राजमाची, ड्युक्स नोज आणि माणिकगड
सर्वात नजीकचे रेल्वे स्थानक: लोणावळा

चेन्नई

ट्रँक्वेबार

Tranquebar
हे लहान समुद्रकिनारचे शहर त्याच्या सांस्कृतिक वारशाच्या इमारती, वास्तुशिल्प, आणि इतिहासाशी संबंध यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. ट्रँक्वेबारची एक भेट तुम्हाला डच वसाहतीच्या शासनाचे एक चित्र तुमच्या नजरेसमोर उभे करते.

पर्यटन आकर्षणे: फोर्ट डान्सबोर्ग, न्यू जेरुसलेम चर्च, डॅनिश म्युझियम, मसिलमानी नाथार कोइल, झिओन चर्च, कराईकल आणि थिरूकडाईयुर
सर्वात नजीकचे रेल्वे स्थानक: मयिलाधुत्राई

मुन्नार

Munnar
केरळच्या इदुक्की जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम भागात वसलेले, मुन्नार हे एक आकर्षक छोटेसे हिल स्टेशन आहे. या शहरास असाधारण असे धबधबे, सरोवर आणि वनांचे सौंदर्य लाभले आहे.

पर्यटन आकर्षणे: अट्टुकल धबधबा, मुटटापेट्टी सरोवर, एराविकुलम राष्ट्रीय उद्यान, वालारा धबधबे, लक्कम धबधबा, राजमाला वन्य अभयारण्य आणि मारायूर.
सर्वात नजीकचे रेल्वे स्थानक: अलुवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here