मुंबईचे ५ परंपरागत उपहारगृहे

0
996

मुंबईकरांना स्‍वादिष्‍ट खाद्यपदार्थ खायला आवडताता, याबाबत कोणतीच शंका नाही. वडापाव व पावभाजी यांसारख्‍या रस्‍त्‍यांवरील खाद्यपदार्थांपासून ते फाइन डायनिंग हॉटेलपर्यंत, भारताच्‍या आर्थिक राजधानीमध्‍ये खाद्यपदार्थांचे अनेक पर्याय उपलब्‍ध आहेत. जर तुम्‍ही मुंबईला भेट देणार असाल, तर प्रसिद्ध उपहारगृहांना भेट देऊन आपल्‍या स्‍वादिष्‍ट चवीची पूर्तता करा. मुंबईमध्‍ये अनेक उपहारगृहे आहेत, ज्‍यांच्‍यामधील स्‍वादिष्‍ट खाद्यपदार्थांची चव तुम्‍हाला दीर्घकाळापर्यंत स्‍मरणात राहिल. तर मग, या स्‍वादिष्‍ट खाद्यपदार्थांचा आस्‍वाद कुठे घेता येईल? पुढे वाचा, तुम्‍हाला समजेलच.

Pancham Puriwala

१. पंचम पुरीवाला: जर तुम्‍हाला तुमच्‍या दिवसाची सुरूवात स्‍वादिष्‍ट पदार्थांसह करायची असेल, तर पंचम पुरीवालामध्‍ये तुमचे स्‍वागत आहे. १८५३ मध्‍ये स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या, पंचम पुरीवालामध्‍ये तुम्‍हाला आलू भाजी व पुरीच्‍या स्‍वादिष्‍ट प्‍लेटचा आस्‍वाद घेता येऊ शकतो. चव खूपच स्‍वादिष्‍ट आहे. जरी पुरेशी जागा नसली, तरी पंचमच्‍या पु-यांचा स्‍वाद दररोज प्रचंड जमावाला आकर्षून घेतो. छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून ३०० मीटर अंतरावर असलेले, हे स्‍थळ मुंबईमधील अल्‍पोपहाराकरिता अत्‍यंत उत्‍तम असे आहे.

K. Rustom Ice Cream

२. के. रुस्‍तम आइस्‍क्रीम: के. रुस्‍तम आइस्‍क्रीमहे शहरामधील सर्वात लोकप्रिय आइस्‍क्रीम पार्लर आहे. पण, तुम्‍हाला माहित आहे का: हे आइस्‍क्रीम पार्लर १९५३ मध्‍ये लहान आइस्‍क्रीम पार्लरसह केमिस्‍ट दुकान व जनरल प्रोव्हिजन स्‍टोअर म्‍हणून सुरूवात करण्‍यात आले होते. काही वर्षांमध्‍येच, पूर्ण आइस्‍क्रीम पार्लरचे रूप देण्‍याकरिता केमिस्‍ट दुकान बंद करण्‍यात आले. त्‍यांचे आइस्‍क्रीम सँडविचेस् खूपच स्‍वादिष्‍ट आहेत. तुम्‍हाला प्रश्‍न पडला असेल, काय आहे हे, तर ते आहे कुरकुरीत वेफर्सच्‍या दोन लहान तुकड्यांमध्‍ये ठेवण्‍यात आलेला आइस्‍क्रीमचा (मेनूमधून कोणताही फ्लेवर निवडू शकता) मोठा तुकडा आणि हे सँडविचेस् थंड सर्व्‍ह केले जातात. काही स्‍वादिष्‍ट आइस्‍क्रीम सँडविच फ्लेवर्स आहेत रम एन रैसिन, पीच चॉको नट व वॉलनट क्रंच. के. रूस्‍तमचे रॅस्‍पबेरी व मँगो डिलाईट आइस्‍क्रीम्‍स सुद्धा लोकप्रिय आहेत. हे प्राचीन इराणीयन आइस्‍क्रीम पार्लर छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून ३ किमी अंतरावर असलेल्‍या चर्चगेट येथे स्थित आहे.

Cafe Leopold

३. कॅफे लिओपोल्‍ड: तेलाचे दुकान म्‍हणून १८७१ मध्‍ये स्‍थापन करण्‍यात आलेला, कॅफे लिओपोल्‍ड हा शहरामधील सर्वात जुना कॅफे आहे. २००८ मध्‍ये मुंबईवर झालेल्‍या अतिरेकी हल्‍ल्‍यामध्‍ये कॅफेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तरीदेखील घटनेच्‍या ४ दिवसांमध्‍येच ते पुन्‍हा सुरु झाले. जर तुम्‍ही विचार करत असाल की, कॅफे लिआपोल्‍डमध्‍ये सायंकाळच्‍या वेळी फक्‍त कॉफीसह स्‍नॅक्‍सचा आस्‍वाद घेता येईल, तर तुम्‍ही चुकीचा विचार करत आहात. हा परंपरागत कॅफे अनेक स्‍वादिष्‍ट खाद्यपदार्थ प्रदान करतो. त्‍यांच्‍या चायनीज डिशेस् व पास्‍ता विशेषत: लोकप्रिय आहेत. कॅफे लिओपोल्‍ड भारतीय पर्यटकांसोबतच विदेशी पर्यटकांमध्‍ये सुद्धा अत्‍यंत लोकप्रिय आहे. कॅफे छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून ५ किमी अंतरावर आहे.

Sardar Pav Bhaji

४. सरदार पावभाजी: जर तुम्‍ही मुंबईला भेट देत असाल, तर तुम्‍ही पावभाजीची चव नक्‍की घेतली पाहिजे. जर तुम्‍ही स्‍वादिष्‍ट पावभाजीचा आस्‍वाद घेऊ इच्छिता, तर सरदार पावभाजी हे तुमचे गंतव्‍य स्‍थान आहे. ते अत्‍यंत स्‍वादिष्‍ट व बटरयुक्‍त पावभाजी सर्व्‍ह करतात. त्‍यांची पावभाजी अत्‍यंत खमंग व स्‍वादिष्‍ट असते. या उपहारगृहाची विशेष डिश म्‍हणजे अमूल पावभाजी. सूत्रांनी आम्‍हाला सांगितले की येथे स्‍वादिष्‍ट पावभाजी तयार करण्‍याकरिता २०० किग्रॅहून अधिक अमूल बटरचा वापर केला जातो. या डिशव्‍यतिरिक्‍त इतर स्‍वादिष्‍ट डिशेस् आहेत मसाला पावभाजी व कॅरेमल कस्‍टर्ड. सरदार पावभाजी सेंटर मुंबई सेंट्रल रेल्‍वे स्‍थानकापासून ८०० मीटर अंतरावर आहे आणि ते सकाळी २ वाजेपर्यंत सुरु असते.

Bademiya

५. बडेमिया: हा प्रसिद्ध मुंबई स्‍ट्रीट फूड सेंटर १९४६ मध्‍ये सुरू करण्‍यात आला. जर तुम्‍हाला स्‍वादिष्‍ट कबाबचा आस्‍वाद घ्‍येयाचा असेल, तर बडेमिया हे उत्‍तम गंतव्‍य स्‍थान आहे. उत्‍तम मुघलाई पाककला डिशेस् सर्व्‍ह करण्‍याकरिता त्‍यांनी अनेक पुरस्‍कार व सन्‍मान प्राप्‍त केले आहेत् बडेमियामध्‍ये गेल्‍यानंतर, तुम्‍ही चिकन टिक्‍का रोल, बैदा रोटी, चिकन बिर्याणी, मटण भुना किंवा खीमा यांचा आस्‍वाद नक्‍की घ्‍या. कुलाबामध्‍ये (छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून ५ किमी अंतरावर) स्थित, हे रेस्‍टॉरण्‍ट रात्री खूप उशिरापर्यंत सुरु असते.

 

Originally written by Aakash Karnani. Read here.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here