ट्रँक्वेबारच्या डॅनिश शहरावर ओझरती नजर

0
1346
Marathi blog

तामिळनाडूच्या किनाऱ्यावर एक अल्पपरिचित असे शहर आहे, जेथे एकेकाळी डॅनिश लोकांचे शासन होते हे तुम्हाला माहित आहे काय? आज थरंगबंडी नावाने ओळखले जाणारे ट्रँक्वेबार 15 वर्षांपूर्वी डॅनिश लोकांचा प्रांत होता. सोळाव्या शतकाच्या आरंभी डॅनिश लोकांचे दक्षिण भारतीय राज्ये आणि आजच्या श्रीलंकेशी घनिष्ट असे व्यापार संबंध होते. तथापि, भरभराट होणाऱ्या या व्यापारावर इतर वसाहती ताकदींचा परिणाम होऊ लागला. आपल्या व्यापाराला मजबूत करण्यासाठी, डॅनिश जनरल ओवे जेडे तंजावर नायक राज्याच्या राजांना भेटला आणि किनारी गावात डॅनिश वसाहत स्थापण्याची अनुमती मागितली. राजांनी होकार दिला आणि डॅनिश लोकांना आपल्या शहरांप्रमाणेच ट्रँक्वेबार निर्माण केले. हे लोकांच्या नजरेपासून दूर असलेले मासेमारीचे गाव आज तामिळनाडूमधील एक उभरते पर्यटन केंद्र झाले आहे आणि प्रवाशांना भारतात डॅनिश लोकजीवनाचा अनुभव देत आहे!

ट्रँक्वेबारमध्ये भेट द्यावयाची स्थळे

ट्रँक्वेबार टाऊन गेटवे

Marathi travel blog
ट्रँक्वेबार शहर किंग्ज स्ट्रीटवर वसलेले आहे, जो थरंगबंडीचा मुख्य रस्ता आहे. येथील स्थानिक लोक या द्वाराला “गेटवे ऑफ ट्रँक्वेबार” असे संबोधतात आणि मागील काही वर्षांपर्यंत या शहराच्या प्रवेशासाठी हे मुख्य द्वार होते. मुख्य गेटवे डॅनिश लोकांनी बनविलेले होते, पण नंतर याला नष्ट करण्यात आले. आधुनिक काळातील या गेटवर डॅनिश वास्तुशिल्प शैली आढळून येते. या सफेद गेटवेवर शीर्षभागी “अन्नो 1792” असे कोरलेले आहे, याचा अर्थ या गेटवेचे बांधकाम 1792 मध्ये झाले आहे असे आहे.

डॅन्सबर्ग किल्ला


या ठिकाणीच ट्रँक्वेबारमधील डॅनिश लोकांचे शासन सुरु झाले. डॅन्सबर्ग किल्ला किंवा स्थानिकांच्या अनुसार डॅनिश किल्ला असणाऱ्या या किल्ल्याचे बांधकाम 1620 मध्ये झाले होते. हा किल्ला बंगालच्या खाडीच्या किनाऱ्यावर वसला होता आणि तेथून सागराचे विहंगम दृश्य दिसते. या किल्ल्यात स्तंभांची रचना आणि उंच छतांच्या सोबत अद्वितीय अशा वास्तुशिल्पाची रचना आहे. या किल्ल्यात दोन मजले आहेत, पण डॅन्सबर्ग किल्ल्यातील बहुतेक खोल्या कुलुपबंद असतात. आजदेखील, एक तोफ समुद्राच्या दिशेने रोखून ठेवलेली दिसून येते! ट्रँक्वेबारमधील डॅनिश लोकांच्या काळाचा अनुभव घेण्यासाठी या किल्ल्यास भेट देणे अगत्याचे आहे. येथे असताना डॅनिश वस्तुसंग्रहालयाला भेट देण्यास विसरू नका, ज्यात ट्रँक्वेबारच्या डॅनिश इतिहासातील अनेक प्राचीन वस्तू आहेत.

न्यू जेरुसलेम चर्च


किंग्स स्ट्रीटवर असलेला न्यू जेरुसलेम चर्च हा वास्तुशिल्पाचा एक अद्भुत नमुना आहे. जेरुसलेम चर्च नाव असलेली आरंभीची चर्च इमारत एका डॅनिश मिशनरीद्वारा 1707 मध्ये बांधली गेली होती. एका भीषण त्सुनामीने 1715 मध्ये या चर्च इमारतीस ध्वस्त केले होते. परिणामी मोठ्या निवासासह भव्य अशा वास्तुकलेसह नवे जेरुसलेम चर्च बांधण्यात आले. ही सफेद इमारत डॅनिश व भारतीय अशा मिश्र वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे.

ट्रँक्वेबार सागरी वस्तुसंग्रहालय


डॅनिश लोकांना श्रेष्ठ नौकावाहक समजले जात असे आणि हे वस्तुसंग्रहालय त्यांच्या उपकरणांचे प्रदर्शन करते. यात जुन्या डॅनिश बोटी, मासेमारीच्या बोटी ते ट्रँक्वेबारचे जुने नकाशे अशा अनेक गोष्टी सामील आहेत. इतिहासातील नौकानयन काळातील पुस्तकांच्या महान अशा संग्रहासोबत, ट्रँक्वेबार सागरी वस्तुसंग्रहालयात एक विशेष फोटो-व्हिडियो शोचे आयोजन केले जाते, ज्यात ट्रँक्वेबारमधील 2004 च्या त्सुनामीच्या परिणामांचा दाखविले जाते. या वस्तुसंग्रहालयास भेट देण्यासाठी भारतीयांसाठी 5 रुपयांचे प्रवेश शुल्क आहे.

ट्रँक्वेबार समुद्रकिनारा


भारतातील हा एक सर्वाधिक रोमँटिक समुद्रकिनारा असून, तुमच्या जोडीदाराच्या हातात हात घालून मोकळेपणाने फिरण्यास अत्यंत रम्य आहे. हा किनारा अत्यंत स्वच्छ असून याला कॅज्युरिनाच्या झाडांनी सुशोभित केलेला आहे. येथून बंगालच्या उपसागराचे विहंगम दृश्य दिसते. ट्रँक्वेबार समुद्रकिनाऱ्या एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे, प्राचीन डॅनिश नोबलमॅनचा बंगला असून त्याला आता हेरिटेज हॉटेलमध्ये बदलण्यात आले आहे.

ट्रँक्वेबार म्हणा किंवा थरंगबंडी, यात भारतीय इतिहासाच्या एका खास भागाच्या स्मृति राखून ठेवलेल्या आहेत. चेन्नईच्या व्यस्त जीवनापासून आणि पुडुचेरीपासून थोड्याच अंतरावर असलेले थरंगबंडी तामिळनाडूच्या पर्यटन आकर्षणाचा एक चुकवू नये असा भाग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here