Simplifying Train Travel

इतर ताज

ताज महाल हे भारतीय स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. तो बांधण्यासाठी 20 हजार अरेबी स्थापत्यकार, नियोजनकार आणि कामगार 21 वर्ष खपत होते. ताज महाल हा कोणत्याही देशासाठी प्रतिष्ठेचा वारसा असतो आणि भारतात तर असे आणखी ताज पाहायला मिळतात.

इतर ताजबद्दल जाणून घेऊया

Humayun’s Tomb

हुमायुनची कबर, दिल्ली – ताज महालाच्या आधी 60 वर्ष अकबराने आपले वडील हुमायून यांच्या स्मरणार्थ ही वास्तू बांधली. त्यात मध्य आशियाई आणि पर्शियन स्थापत्यशैलीचा संगम साधण्यात आला आहे. चारबाग किंवा पर्शियन उद्यान असलेली ही भारतातील पहिली कबर आहे.

Itimad-ud-Dawlah Tomb

इतिमाद- उद- दावलाहची कबर, आग्रा – छोटा ताज नावाने ओळखली जाणारी ही कबर नूर जहां यांचे वडील मिर्झा घ्यास बेग यांची आहे. लाल विटा आणि पांढऱ्या संगमरवरापासून बांधण्यात आलेली ही वास्तू ताज महालाआधी एक दशक बांधली गेली आहे. आग्रा कँटोनमेंट रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर ही वास्तू पाहायला मिळते.

Bibi ka Maqbara

बिबी का मकबरा, औरंगाबाद – ताज महालाचे बांधकाम पूर्ण होण्याआधी 45 वर्ष ही अद्भुत वास्तू बांधली गेली होती. अझम शहा यांनी आपली आई दिलरस बानू बेगम यांच्या स्मरणार्थ बांधलेली ही वास्तू बरीचशी ताजसारखी दिसते. ताज महालाचे मुख्य स्थापत्यकार यांचे पुत्रअता- उल्लाह यांनी या वास्तूचे रेखाटन केले आहे.

Bulandshahr Taj

छोटा ताज, बुलंदशहर – निवृत्त पोस्टमास्तर फैझल हसन काद्री यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ही वास्तू बांधली आहे. कासर कलान गावात 50 किलोमीटरपासून असलेल्या बुलंद शहरात वसलेली कबर ताज महालाची छोटी आवृत्ती आहे.

ताज महालाबाबत प्रत्येकालाच माहीत आहे, पण या काही वास्तूही तितक्याच अद्भुत आणि आवर्जून भेट देण्यासारख्या आहेत!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत