हिमालयाच्या रोमांचक दृष्टीक्षेपासाठी लोकप्रिय रोपवेज

0
79

हिमाचलच्या हिरव्यागार ढाळांच्या आणि शांत अशा छोट्या शहरांच्या आकाशीय दृष्टीक्षेपासाठी एखाद्या केबल कारवरील जॉयराइड कदाचित सर्वोत्कृष्ट मार्ग आहे. यामुळे केवळ थरारच निर्माण होत नाही तर यामुळे अत्यंत दूरच्या पर्वतीय रांगा आणि खाली हिरव्यागार दऱ्यांचे नयनरम दृश्य देखील नजरेस पडते. सध्या, त्या राज्यात तीन प्रसिद्ध रोपवेज आहेत आणि प्रत्येकात पर्यटकांच्या संख्येत वाढच दिसून येत आहे.

परवानू टिंबर ट्रेल

Parwanoo Timber Trail
चंडीगढपासून सुमारे 30 किमी अंतरावर, परवानूच्या पलीकडे हिमालयन एक्स्प्रेस हायवेवर परवानू टिंबर ट्रेल दिसून येते. हा रोपवे दोन नजीकच्या पर्वतशिखरांना जोडत कौशल्या नदीवरून जातो. हा राइड टिंबर तरेल हाईट्स रिसोर्ट या हिमालयातील सुंदर रिसोर्टकडे संपतो.
– एकेरी राइड: 8 मिनिटे
– दर: रु. 625 (प्रौढ), रु. 500 (मुले)
– वेळ: सकाळी 9:00 ते सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत.
– कालका रेलहेड – 6 कि.मी.
– रस्त्याद्वारे: चंदिगढ आयएसबीटी, सेक्टर 43

सोलांग व्हॅली रोपवे

Solang Valley Ropeway
मुख्य मनालीपासून एक 14 किमीचा प्रवास तुम्हाला सोलांग दरीकडे घेऊन जाईल, जिथे केवळ एक नेत्रदीपक दृश्यच आढळत नाही, तर रोपवे आणि स्मूथ स्की स्लोप्स देखील उपस्थित आहेत. सोलांग रोपवे-कम-स्की सेंटर जमिनीवरून 1600 फूट उंचीवर आहे आणि 1.3 किमी लांब आहे. हे सोलांग नल्ला ते अफाट अशा बर्वा शिखराला जोडते.
एकेरी राइड: 10 मिनिटे
– दर: रु. 450
– वेळ: सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत.
– जोगिंदर नगर रेल्वे स्टेशन – 175 कि.मी.
– मनालीहून एक स्थानिक बस पकडावी

नैना देवी रोपवे

Naina Devi Ropeway
हा थरारक असा रोपवे घुनवालपासून सुरु होतो आणि तुम्हाला नैना देवी मंदिराकडे घेऊन जातो. देवीची पूजा केल्यानंतर, तुम्ही पायऱ्यावरून उतरू शकता किंवा अगोदरच एक परतीचे तिकीट बुक करू शकता आणि उंचीवरून गोविंद सागर तलावाचे विहंगम दृश्य नजरेत कैद करू शकता.
– एकेरी राइड: 20 मिनिटे
– दर: रु. 35
– वेळ: सकाळी 8:00 ते सायंकाळी 7:00 वाजेपर्यंत.
– सर्वात नजीकचे रेल्वे स्टेशन आनंदपूर साहिब रेल्वे स्टेशन आहे
– रस्त्याद्वारे: चंदिगढ आयएसबीटी, सेक्टर 43″

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here