अद्भुत गंगा आरती पाहण्यासाठी जास्त माहित नसलेली 5 ठिकाणे

0
210

गंगा आरती म्हटल्यावर आपल्या मनात सर्वप्रथम वाराणसी हेच ठिकाण येते. सुंदर अशा गंगा आरतीसाठी वाराणसी प्रसिध्द असतानाच, इतरही शहरे आहेत जेथे अशाच अनुभवाची अनुभूती होते.

श्री राम घाट, उज्जैन, मध्य प्रदेश

Shri Ram Ghat
क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेला, श्री राम घाट हा उज्जैनमधील पुरातन स्नान घाटांपैकी एक आहे. तो हरसिध्दी घाटाला लागूनच आहे. दिवसाच्या वेळी नदीमध्ये डुबकी मारणे पावन मानले जाते. संध्याकाळी येथील पंडित लांबलचक झगे घालून लखलखत्या दिव्यांनी आरती करतात.
जवळचे रेल्वेस्थानक: उज्जैन रेलवे स्थानक

गांधी घाट, पटना, बिहार

Gandhi Ghat
गांधी घाटावर धर्मगुरू 51 दिव्यांनी आरती करतात. याची सुरूवात शंख फुंकून आणि ईश्वरी सुवासिकता निर्माण करण्यासाठी उदबत्त्या पेटवून होते. आरती ही मुख्यत: आठवड्याच्या शेवटी केली जाते. पर्यटक BSTC च्या बोटी बुक करून आरतीला उत्तमरीत्या पाहू शकतात.
जवळचे रेल्वेस्थानक: पटना

संगम घाट, अलाहाबाद, उत्तर प्रदेश

Sangam Ghat
या घाटाला गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्या एकत्र मिळतात. भक्तगण येथे पावन स्नान करून संध्याकाळच्या गंगा आरतीसाठी थांबू शकतात. रंगीबेरंगी झगे घातलेले धर्मगुरू, उदबत्त्या पेटवून, प्रखर दिवे प्रज्वलित करून पूजाअर्चना करतात. परिसर ईश्वरी अनुभवयुक्त व्हावा यासाठी पार्श्वभूमीमध्ये स्त्रोत केले जाते.
जवळचे रेल्वेस्थानक: अलाहाबाद

परमार्थ निकेतन आश्रम, ऋषीकेश, उत्तराखंड

Parmath Niketan Ashram
ही आरती म्हणजे दृढता आणि आध्यात्मिकता, काही भूमिकांनी युक्त असते. येथील आरती आश्रमातील रहिवासी करतात. ते भक्तीपर गीते गातात, प्रार्थना, हवन करतात तसेच दिवेही प्रज्वलित करतात. घाटावर बरीच गर्दी होते, म्हणून लवकर पोहोचण्याचा सल्ला दिला जातो.
जवळचे रेल्वेस्थानक: हरिद्वार

हर-की-पौरी, हरिद्वार, उत्तराखंड

Parmath Niketan Ashram
भटकंती प्रेमींचा हरिद्वार येथे होणार्‍या गंगा आरती म्हणजे “सर्वात परस्पर प्रभावकारी उद्यम” असा विश्वास आहे. इथल्या आरतीमध्ये सर्वकाही असते – भरगच्च गर्दी, झगाधारी धर्मगुरू, साधू, विविध देवांच्या मूर्ती, लाऊड स्पीकर्स, घंटानाद, भक्तीपर भजने, जळणार्‍या उदबत्त्या, फुले, आणि प्रखर अग्नीसुध्दा!
जवळचे रेल्वेस्थानक: हरिद्वार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here