Simplifying Train Travel

कन्फर्म्ड ट्रेन तिकिटे मिळविण्याचे 5 मार्ग

तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्यांसाठी योजना करताना तुमच्यासमोर असलेले सर्वात मोठे आव्हान म्हणजे एक कन्फर्म्ड ट्रेन तिकीट मिळविणे असते. 120 दिवसांचा अॅडव्हान्स बुकिंगचा कालावधी आणि ऑनलाईन तिकिटांच्या बुकिंगची सुलभता यांच्यामुळे संपूर्ण वर्षभर तिकिटांची कमतरता जाणवते. जेव्हा कुटुंबांकडे आरक्षणाची पुष्टी नसते, तेव्हा त्यांना त्यांच्या प्रवासाच्या योजनांचे वेळापत्रक बदलावे लागते किंवा प्रवासाच्या योजनाच रद्द कराव्या लागतात. तथापि, आमचे अप तुम्हाला अत्यंत व्यस्त काळात एक कन्फर्म्ड तिकीट मिळविण्यासाठी लागणारे आवश्यक असे संशोधन करण्यास मदत करेल.

कन्फर्म्ड तिकीट मिळविण्यासाठी 5 पायऱ्या-

1. स्टेशन्सदरम्यानच्या ट्रेन्स ओळखा:

Up-to-Date-with-Train-Options

प्रत्येक कुटुंबात एक व्यक्ती प्रवासाची योजना करणारी असते, जी जावयाच्या संभाव्य ट्रेन्सच्या संभावित यादीविषयी सहयोग्यांशी आणि मित्रमंडळीशी चर्चा करते. भारतीय रेल्वे या गर्दीस सामावून घेण्यासाठी विशेष ट्रेन्स सोडते. तुम्हाला मार्गासह ट्रेन्सची संपूर्ण यादी (सामान्य आणि विशेष) मिळू शकते. या व्यतिरिक्त, तुम्ही एखाद्या विशिष्ट प्रवासाला सेव्ह करून ठेवले, तर रेलयात्री अॅप त्या विशेष ट्रेनच्या घोषणेसाठी सूचित करत राहील.

2. आठवड्याच्या कमी गर्दी असलेल्या दिवसांना ओळखा:

Time-and-Date

रेलयात्री येथील माहिती विश्लेषणाची टीम सर्व रेल्वे प्रवाशांसाठी एक रोचक अशी अंतर्दृष्टी घेऊन आली आहे. माहितीत असे दर्शविले आहे की शुक्रवार आणि रविवार आठवड्याचे सर्वाधिक गर्दीचे दिवस असतात, याची खात्री करा की निघण्यासाठी किंवा परतण्यासाठी हे दोन दिवस टाळले जातील. आठवड्याचे दिवस निवडा, जेव्हा मागणी फार कमी असेल.

3. पर्यायी लहान स्टेशन्सबद्दल बुध्दिमत्ता:

Popular-Destinations

बहुतेक लोक असे मानतात की प्रत्येक स्टेशनवर लोकांची संख्या सारखीच असते. पण सत्य असे आहे की असे काही स्टेशन्स आहेत, जिथे तुमच्या निघण्याच्या स्टेशनवरून फार मोठ्या प्रमाणात प्रवासी जातात. मोठ्या स्टेशन्ससाठी तिकिटे मिळणे कठीण असते, तर तुमच्या गंतव्यस्थानी सहजपणे पोहोचू शकाल अशा लहान स्टेशन्ससाठी तिकिटे मिळणे सोपे असते.

4. संभावना शोधा:

Popular-Sections

तुम्ही भूतकाळात अनेक वेळा फिरला असाल, तर तुम्हाला माहित असेल की सर्व स्टेशन्सवर चढणारे आणि उतरणारे लोक किती असतात. तुमच्या मार्गात काही विशिष्ट स्टेशन्स असतात जिथे अधिक प्रवासी उतरतात आणि काही असे स्टेशन्स असतात, जिथे चढणारे प्रवासी जास्त असतात. तुम्ही या प्रवृत्तीविषयी संशोधन करू शकला, तर कन्फर्म्ड तिकीट मिळण्याची फार मोठी शक्यता निर्माण होते. रेलयात्री ही माहिती लाखो रेल्वे प्रवाश्यांमधून प्राप्त केलेल्या आकडेवारीतून प्रस्तुत करते.

5. कन्फर्मेशनच्या संभावनेवर खात्री ठेवा:

Ticket-Confirmation Probability

असे काही प्रसंग असतात, जेव्हा तुम्हाला कन्फर्म्ड तिकीट मिळूच शकत नाही. तुम्हाला वेटिंग लिस्टवर तिकिटे बुक करावी लागतात. पण वेटिंग लिस्टवर तिकिटे बुक करताना तुम्ही रेलयात्री अॅपसह कन्फर्मेशनच्या शक्यतेला देखील पडताळू शकता. ही संभावना अनेक घटकांच्या आधारावर काढलेले असते, जसे तिकिटांसाठी मागणी, तिकिटे रद्द होण्याची भूतकाळातील आकडेवारी, चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाश्यांची आकडेवारी, . जेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये रेलयात्री अॅप असते, तेव्हा प्रवासाच्या अनेक संभावना शक्य असतात. आमच्या अॅपच्या अनेक वैशिष्ट्यांचा वापर करत तुमच्या निवडीच्या गंतव्यस्थानासाठी तुम्ही विनाकटकट प्रवास करू शकाल.


One thought on “कन्फर्म्ड ट्रेन तिकिटे मिळविण्याचे 5 मार्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत